बनावट कीटकनाशके बनविणार्या, विक्री करणार्यांविरुद्ध कारवाई सुरु
मुंबई
यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट कीटकनाशके व साहित्य बनविणार्या तसेच विक्री करणार्यां विरुद्ध योग्य ती कारवाई सुरु असल्याची माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. यासंबंधीची लक्षवेधी सूचना सदस्य वजाहत मिर्झा यांनी मांडली होती त्यावेळी श्री. खोत बोलत होते.खोत म्हणाले, यवतमाळ जिल्ह्यातील कृषी केंद्रांमध्ये आढळून आलेल्या गंभीर उणिवा व त्रुटींच्या अनुषंगाने त्यांचा बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके विक्रीचा परवाना दि. 5 नोव्हेंबर 2018 पासून परवाना प्राधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, यवतमाळ यांनी रद्द केलेला आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकर्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा योग्य दराने उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा स्तरावर 1 व तालुकास्तरावर 16 अशा एकूण 17 भरारी पथके व तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये कीटकनाशके विक्री केंद्र तपासणीमध्ये आढळून आलेल्या उणिवा व त्रुटींच्या अनुषंगाने 86 प्रकरणात विक्री बंद आदेश देण्यात आलेले असून 17 कृषी सेवा विक्री केंद्राचे परवाने रद्द/निलंबित करण्यात आले आहेत.
तसेच गुणनियंत्रक निरिक्षकांमार्फत व भरारी पथकामार्फत यवतमाळ जिल्ह्यामध्ये घाटंजी, यवतमाळ,राळेगाव, कळंब, पांढरकवडा आणि नेर या तालुक्यामध्ये कृषी निविष्ठा विक्री केंद्राची तपासणी करुन व धाडी टाकून कार्यवाही करण्यात आलेली आहे. याशिवाय शेतकर्यांच्या तक्रारी निवारणाकरिता टोल फ्री दूरध्वनी क्रमांकाची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादीं ची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
https://whatsapp.heeraagro.com
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!