महाराष्ट्र राज्यात उस पिकांसाठी मोठ्या क्षेत्रात ठिबक सिंचन संच यशस्वीरीत्या कार्यान्वित असून या ठिबक सिंचन पद्धतीचा शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे मुख्य फायदे मिळतात.
1) पाण्याची बचत होते (40 ते 70%)
2) उत्पादनात भरगोस वाढ होते (30 ते 60%)
3) रासायनिक खताचा खर्च, मजुरी व पीकसरंक्षण खर्चात कपात होते. (30 ते
45%)
4) कमी कालावधीत उस परिपक्व होते.
5) फुटवे जोमदार व भरपूर येतात.
महाराष्ट्रातील सर्व ऊस बागायतदारांनी खालील गोष्टीची प्रामुख्याने दखल घेतल्यास उसाचे प्रतीहेक्टरी उत्पादन वाढेल यात शंका नाही.
1) ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी व्यवस्थापन करणे.
2) हंगामनिहाय उस जातीची निवड करणे.
3) पाण्याचा कार्यक्षम वापर, योग्य पीक फेरपालट, सेंद्रिय खतांचा वापर, रासायनिक खतांचा वापर नियंत्रित करून क्षारयुक्त आणि चोपण झालेल्या जमिनीची सुधारणा करून नवीन लागवडीसाठी जमीन खराब होऊ न देणे.
4) उस उत्पादनाचे प्रमुख घटक – बीज प्रक्रिया, औषधे, खते, पाणी, मशागती इ. गोष्टी वेळेवर केल्यास उसाचे प्रतीहेक्टरी उत्पादन वाढून उत्कृष्ट दर्जाचा उस आपण पिकवू शकतो.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.