बहुतेक शेतकरी पिकांची अन्नद्रव्याबाबतची गरज व जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्याचे प्रमाण लक्षात न घेताच रासायनिक खतांचा वापर करतात. त्यामुळे अन्नद्रव्यांचा संतुलित वापर होत नाही. खर्च वाढून अपेक्षित उत्पादन मिळत नाही. म्हणून पिकांना लागणाऱ्या कोणत्या अन्नद्रव्यांची किती प्रमाणात जमिनीमध्ये कमतरता आहे. तसेच पिकांचे अपेक्षित उत्पादन येत नाही असे लक्षात येताच जमिनीच्या सुपीकतेबाबतची चाचणी करून घ्यावी. म्हणजे अन्नद्रव्यांचे प्रभावी वापर करून शेतीमध्ये भरघोस वाढ करून चांगला नफा कमवता येईल.
पिकांच्या अवशेषांचे रासायनिक पृथःकरण केले असता त्यात सुमारे ९० मूलद्रव्ये सापडतात; परंतु ही सर्वच मूलद्रव्ये पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असतातच असे नाही. आवश्यक अन्नद्रव्यांची कसोटी म्हणजे :-
१) त्या अन्नद्रव्यांची कमतरता भासल्यास पिकांची वाढ पूर्ण होत नाही.
२) कमी पडणारे अन्नद्रव्ये पिकांना दिल्यास त्यांची वाढ पूर्ण होते. फुले व फळे येऊन पिकांचा जीवनक्रम पूर्ण होतो.
३) तसेच या अन्नद्रव्यांचा पीक पोषण, जैविक व रासायनिक क्रियेत प्रत्यक्ष भाग असतो.
वरील कसोट्यांच्या आधारे असे दिसून आले आहे कि, पिकांच्या वाढीस १६ अन्नद्रव्ये आवश्यक आहेत. कर्ब, हायड्रोजन व ऑक्सिजन पिकांना भरपूर प्रमाणात आवश्यक असून ती हवा व पाण्यामधून मिळतात. उरलेली १३ अन्नद्रव्ये जमिनीतून मिळतात. यापैकी नत्र, स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये पिकांना जास्त प्रमाणात लागतात म्हणून त्यांना प्रमुख अन्नद्रव्ये म्हणतात.
कॅल्शिअम, मग्नेशियम व गंधक मध्यम प्रमाणात लागतात म्हणून त्यांना दुय्यम अन्नद्रव्ये आणि लोह, जस्त, तांबे, मॅगनीज, मॉलीबडेनम व क्लोरीन ही कमी प्रमाणात लागतात म्हणून त्यांना सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणतात.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
https://whatsapp.heeraagro.com
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!