साखर उत्पादनात महाराष्ट्र अव्वल

0

नवी दिल्ली: भारतीय हवामान खाते व स्कायमेट या खाजगी क्षेत्रातील हवामान अंदाज करणाऱ्या संस्थांमध्ये एल निनोच्या प्रभावाबाबत मतभिन्नता आहे. परिस्थितीमध्ये होणाऱ्या सततच्या बदलामुळे ही संभ्रमावस्था निर्माण होत आहे.

यावर एकूणच व विशेषतः ऊस पिकाखालील क्षेत्र, उसाची उत्पादकता, ऊसाचे उत्पन्न, साखरेचे उत्पन्न, उभ्या ऊसावरील रोग-किडीची अवस्था याबाबत अचूक निदान करण्याची उच्च रेझोल्यूशन आधारित अद्यावत तंत्रज्ञान आय.बी. एम या जगप्रसिद्ध संगणक उद्योगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या हवामान कंपनी सोबत राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाच्या स्तरावरून प्राथमिक माहिती घेण्यात येत आहे. हवामान अंदाज सूत्र निश्चित होण्यात यश आल्यास ते भारतीय ऊस व साखर उद्द्योगाच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. प्रकाश नाईकनवरे यांनी केले आहे.

महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 103.60 लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे.त्यानंतर उत्तर प्रदेशाचा क्रमांक लागतो. तेथे 90.65 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. या वेळेस देशभरात 324 लाख टन साखरेचे उत्पादन होईल असा अंदाजही श्री. प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केला. साखर उत्पादनात तिसरा क्रमांक कर्नाटकाचा असून तेथे 42.90 लाख टन साखरेची निर्मिती झाली तर गुजरात मध्ये 10.30 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. या दोन्ही राज्यात ऊसाचे गळीत प्रत्येकी 408.57 लाख टन व 99.04 लाख टन झाले आहे.

साखर उत्पादनात महाराष्ट्र देशात अव्वल असला तरीही उताऱ्यात उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकावर आहे व त्याचे प्रमाण 11.30 टक्के आहे. महाराष्ट्रात हे प्रमाण 11.20 टक्के आहे तर कर्नाटक व गुजरात मध्ये ते अनुक्रमे 10.50 टक्के व 10.40 टक्के असे आहे.देशभरात साखरेचे उत्पादन महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, बिहार, हरियाणा, मध्य प्रदेश, पंजाब, तामिळनाडू, तेलंगणा व उत्तराखंड या राज्यात प्रामुख्याने होते व या राज्यांमधून सहा महिन्यात तयार होणाऱ्या साखरेची विक्री मात्र वर्षभर संपूर्ण देशभरात होत असते. मात्र गतवर्षीच्या व यंदाच्या विक्रमी साखर उत्पादनामुळे स्थानिक बाजारातील साखर विक्रीच्या दरावर कायम दबाव टिकून राहिल्याचे दिसत आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.