राज्यात तुरीला चांगले दिवस ; मिळतोय 8200 ते 9300 रुपयांपर्यंतचा भाव

0

राज्यात तुरीला चांगले दिवस आले आहेत. कारण तुरीला शासकीय हमीभावापेक्षा अधिक दर मिळत आहे. हमीभाव 5800 असला तरी राज्यातील सर्व बाजार समितीमध्ये 8200 ते 9300 रुपयांपर्यंत तुरीला भाव मिळत आहे.

यंदाही झालेल्या अतिपावसामुळे तुरीचे पीक जळले आहे. परिणामी, उत्पादनात मोठी घट झाली. कोरडवाहू जमिनीत एकरी एक क्‍विंटल; तर बागायती जमिनीत एकरी दोन ते तीन क्‍विंटलचा उतारा आहे. सध्या हमीभाव प्रतिक्‍विंटल 5800 रुपये भाव मिळत आहे. पुढे शासकीय भावापेक्षा अधिक भाव मिळण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

मात्र, व्यापाऱ्यांकडून मागणी वाढल्याने बाजारात दर तेजीत आहेत. वाढलेले दर बाजारात तूरडाळ खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशावर ताण पडणार आहे. कारण काही दिवसांपूर्वी मिळणारी तूरडाळ 80 ते 85 रुपये किमतीची डाळ आता 125 रुपये प्रती किलो झाली. आता तुरीला दहा हजार रुपये दर मिळाला तर तूरडाळ 150 पर्यंत जाईल हे मात्र नक्की.

Leave A Reply

Your email address will not be published.