जळगावमध्ये महाराष्ट्र स्टार्टअप

0

जळगावमध्ये महाराष्ट्र स्टार्टअप यात्रेच्या निमित्ताने विद्यार्थी व व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना स्टार्टअप बद्दल माहिती मिळावी ह्यासाठी G.H. रायसोनी महाविद्यालयात  कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

ह्या प्रसंगी The India Network चे CEO श्री.राहुल नार्वेकर हे विशेष करून दिल्लीवरून जळगावला आले होते. या कार्यक्रमात एक यशस्वी उद्योजक ह्या नात्याने गिरीश खडके (हिरा ॲग्रो इंडस्ट्रीज ) यांनाही आमंत्रित केले गेले होते. सदर प्रसंगी मी उद्योजक म्हणून कसा प्रवास केला आणि कुठल्या गोष्टींचा सामना करीत मी आज नावारूपास आलो तसेच एखाद्या कल्पनेला स्टार्ट-अप चे प्रत्यक्ष रुप कसे देता येते यावर गिरीश यांनी भाष्य केले.  याप्रसंगी राहुल नार्वेकर, कुतूहल फौंडेशनचे संस्थापक महेश गोरडे, बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. तुषार देशपांडे, दैनिक जनशक्तिचे संपादक डॉ. युवराज परदेशी उपस्थित होते.

महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.