राज्यातील शेतकरी हा नेहमीच संकटात सापडतो. कधी कोरडा दुष्काळ तर कधीओला दुष्काळ, पण यावेळी शेतकऱ्यांना वेगळ्याच संकटाचा सामना करावा लागत आहे. कारण सध्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणत नुकसान असून तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिसकावून घेतला आहे. अकोला जिल्ह्यात परतीच्याने पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. तर कोकणात भात शेतींसह नाचणी आणि वरी कुजून गेली.
शेतीविषयक अपडेट्स व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीन आणि कापूस पिकवला होता. पण पावसामुळे या पिकांचं नुकसान झालं आहे. सोयाबीनच्या पिकाला जागेवर परतीच्या पावसामुळे कोंब फुटले आहे. तर कोकणातील नाचणीच्या पिकांना पुन्हा अंकुर फुटले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. खरिपातील पिकांसह रब्बीत पेरणी केलेल्या पिकांचे देखील नुकसान झाले आहे.
पुणे जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी दिवसभर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. जिल्ह्यात जवळपास सर्वच भागात अतिवृष्टी झाली आहे. पावसामुळे कांदा, भाजीपाला, सोयाबीन, बाजरी, भात पिके उद्ध्वस्त झाली आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातही पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील १८३ गावांतील २८ हजार ३३५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी आता केली जात आहे.