तुर्की राष्ट्रातील निगडे-नेवसेहीर प्रांत संपूर्ण तुर्की देशाच्या एक-तृतीयांश बटाटा उत्पादक प्रदेश आहे (जवळपास १२ दश लक्ष मेट्रिक टन पेक्षा जास्त). स्प्रिंकलर व ड्रीप इरिगेशन चा वापर मोठया प्रमाणात करून जास्तीत जास्त बटाटाचे उत्पन्न घेतले जात आहे. मागील ६ वर्षापासून तुर्कीच्या शासकीय व इतर वैज्ञानिक संस्थे मार्फत वेगवेगळ्या योजना व उपक्रमांद्वारे पाणीचे उत्तम व्यवस्थापन सांभाळून त्या बद्दल शेतकरी/शेती कामगार यांना योग्य ती माहिती दिली जात आहे.
पारंपारिक शेती पध्दती मध्ये बदल घडवून ड्रीप व स्प्रिंकलरचा जास्तीत जास्त वापर तुर्कीच्या निगडे-नेवसेहीर प्रांतात केला जात आहे. ज्यामुळे अंदाजे ६० दशलक्ष डॉलर पेक्षा जास्तची बचत वेळेत, इंधन व कामगार व्यवस्थापनात होत आहे. बचती-सोबतच सेंद्रिय खतांचे व्यवस्थापनात देखील फायदा होत आहे.
ड्रीप इरिगेशनला प्रोत्साहित करण्यासाठी तर्किश सरकारने सर्वसाधारण संसदीय बैठकीत एक कायदा संमत केला आहे ज्याद्वारे शेतकर्यांना कमीत कमी व्याजदरा वर सरकार द्वारे कर्ज वाटप केले जाईल ज्याचे मुळ उद्देश ड्रीप इरिगेशनला चालना देणे आहे. सदर कायदा संमत झाल्यानंतर त्यावर शेतकर्याची प्रतिक्रिया ही उत्स्फूर्त व उल्लेखनीय असल्याचे शेती विषयक जाणकारांनी सांगितले आहे. ड्रीप इरिगेशनच्या वापरात उल्लेखनीय वाढ होऊन २-३ वर्षात ड्रीप इरिगेशनच्या ओलिताखाली येणारी शेतीची आकडेवारी तब्बल ८ पट्टीने वाढलेली आहे.
ड्रीप इरिगेशन सिस्टीम कमीत कमी पाणी व कमी वेळेत अत्यंत उत्कृष्टपणे पिंकाची योग्य अश्या वाढीसाठी सोयीस्कर व परवळनारी अशी व्यवस्था आहे. ड्रीप इरिगेशन मुले तुर्कीच्या अत्यंत दुर्गम अशा निगडे-नेवसेहीर प्रांतात शेती सधन होऊन अत्यंत मुबलक प्रमाणात पिके घेत आहेत.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!