लिलीच्या
अनेक जाती प्रचलित असल्या तरी महाराष्ट्रात खालील प्रकार जास्त प्रचलित आहेत.
१) अमर लिली :
या प्रकाराला बेलाडोना लिली असेही नाव आहे. या प्रकारातील जाती उन्हामध्ये किंवा विरळ सावलीत वाढणाऱ्या आणि बहुवर्षायु आहेत. या प्रकारातील जाती रोग आणि किडींना जास्त प्रतिकारक आहेत. या प्रकारातील काही जाती कुंडीत लावण्यासाठी तर काही जाती जमिनीत लावण्यास योग्य आहेत. या प्रकारातील जातींना लांब दांड्यावर भोंग्याच्या आकाराची फुले येतात. अशी फुले फुलदाणीत ठेवण्यास योग्य असतात. फुले लाल, पिवळी, सफेद अशा विविध रंगांची असतात. स्नोव्हाईट लियो, ज्युपिटर, स्टार ऑफ इंडिया, ब्लॅक प्रिन्स आणि पिंक इंदोरा या प्रकारच्या जाती अमर लिली या प्रकारात येतात.
२) स्पाईडर लिली :
लिलीच्या या प्रकारातील जाती अत्यंत कणखर आहेत. या प्रकारातील लिली
बांधावर लावल्या तरी चांगली फुले येतात आणि कंद पुढील पावसळ्यापर्यंत जमिनीत तग
धरून राहू शकतात. पांढऱ्या रंगाची फुले कळीच्या अवस्थेत तोडून हारासाठी आणि
सजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर वापरली जातात.
३) टायगरी लिली :
या
प्रकारातील लिलीला लांब दांड्यावर पिवळसर लालसर रंगाची फुले येतात. पाकळ्यांवर
गर्द तपकिरी रंगाचे ठिपके असतात. या प्रकारातील फुले फुलदाणीत ठेवण्याकरिता योग्य
असतात.
४) डे लिली :
या
प्रकारातील लिलीला लांब दांड्यावर पांढऱ्या, पिवळ्या आणि गुलाबी रंगांची फुले येतात. या
प्रकारातील फुले फुलदाणीत ठेवण्याकरिता योग्य आहेत.
५) झिपरँथस लिली :
या
प्रकारातील जाती बुटक्या असून जमिनीलागत वाढतात. या प्रकारातील दलदलीच्या जागी तग
धरून राहतात. या प्रकारातील जाती इमारतीच्या सभोवती सुशोभनासाठी लावण्याकरिता
योग्य आहेत. या प्रकारातील लिलीला पिवळ्या आणि फिकट गुलाबी रंगाची फुले येतात.
६) फायरबॉल लिली :
नावाप्रमाणे लालभडक रंगाचा फुलांचा गोलाकार गेंद हिरव्या पानांवर अत्यंत आकर्षक दिसतो. कुंडीत अथवा जमिनीत लावून परिसर सुशोभनासाठी हा प्रकार उत्तम आहे.
हि माहिती आपण www.krushisamrat.com वर वाचत आहात.
अभिवृद्धी आणि लागवड पद्धती :
लिलीची
अभिवृद्धी बियांपासून, पानाच्या बेचक्या तील कंद (बल्बिल) आणि जमिनीत वाढणाऱ्या लहानमोठ्या
कंदांपासून करता येते. जमिनीतील मोठ्या कंदाभोवती लहान कंद (स्केल) वाढतात. या
लहान कंदापासूनही लिलीची लागवड करता येते.
खते आणि पाणी व्यवस्थापन :
लागवडीपुर्वी एकरी ८ ते १० टन चांगले कुजलेले शेणखत आणि १०० किलो कल्पतरू सेंद्रिय खत द्यावे. नंतर दीड ते दोन महिन्यांनी ५० ते ७५ किलो कल्पतरू खत जमिनीच्या प्रकारानुसार खुरपणीनंतर द्यावे.पिकाला जरुरीपुरते परंतु नियमितपणे ७ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यास जमिनीतील कंद सडतात. म्हणून पिकाला पाणी देताना पिकामध्ये पाणी साचून राहणार नाही याची खबरदारी घ्यावी.
उपाय :
पिकाला योग्य प्रमाणात अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. पाण्याचा ताण पडू देऊ नये.
तणांचे नियंत्रण :
हरळी अथवा लव्हाळा यासारख्या बहुवर्षायु तणांच्या बंदोबस्तासाठी सुरूवातीलाच खोल नांगरट करून आणि तणांच्या काश्या अथवा गाठी वेचून जाळून टाकाव्यात. जमीन चांगली तापू द्यावी. पांढरी फुली, एकदांडी यांसारख्या तणांच्या नियंत्रणासाठी आवश्यकतेप्रमाणे खुरपणी करावी.
हि माहिती आपण www.krushisamrat.com वर वाचत आहात.
कंदांची काढणी आणि साठवण :
लिलीच्या फुलांची काढणी केल्यानंतर काही दिवसांनी झाडाची पाने पूर्णपणे सुकतात. या वेळी जमिनीतील कंद काढून घ्यावेत. कंदांची प्रतवारी करावी. नंतर कंदांना प्रोटेक्टंट पावडर किंवा बुरशीनाशक चोळावे आणि कंद हवेशीर जागेत थंड ठिकाणी ठेवावेत. शीतगृहात कंद २ ते ३ महिने साठवून ठेवता येतात.
महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास साभार सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.