लिंबू फळबाग लागवड.

2


जमीन :- हलकी, मुरमाड किंवा मध्यम भारी. पी एच ६.५ ते ८ . चुनखडी युक्त, पाणथळ जमीन नसावी.

हवामान:- फलधारणेसाठी आणि पोषणासाठी जून ते डिसेम्बर उत्तम, मात्र उन्हाळ्यात मागणी व भाव अधिक.

पूर्व तयारी:- माती परीक्षण करून घ्यावे. जमीन खोल नांगरणी करून घ्यावी, १५ बाय १५ किंवा १८ बाय १८ फुटावर तीन फुट लांब रुंद रुंद व खोल खड्डे करावे. त्यात १० किलो शेणखत, ५० ग्राम लिंडेन पावडर, पालापाचोळा भरावा वरच्या थरात माती भरावी.

हि माहिती आपण  www.krushisamrat.com वर वाचत आहात.

लागवड पद्धत:- किमान १०० मिमी पाऊस झाल्यानंतर कलमेचा जोड जमिनीवर राहील अशा पद्धतीने कलम लावावी.

सुधारित वाण:- विक्रम, प्रमालिनी, साई सरबती, फुले सरबती.

खते:- दर वर्षी सप्टेंबर आणि जानेवारीत १० किलो शेणखत, २ किलो सुपर फोस्फेट, २ किलो निंबोळी खत, ५० ग्राम युरिया, ५० ग्राम पोटाश एकत्रित द्यावे. याशिवाय ट्रायकोडर्मा, सूक्ष्म अन्नद्रव्ये काही प्रमाणात द्यावी.

पाणी व्यवस्थापन:- दुहेरी आळे पद्धतीने किंवा ठिबक ने पाणी द्यावे. तापमानानुसार वाफसा आल्यानंतरच पाणी द्यावे.

आंतर पिक:- पाहिली चार वर्षे मुग चावली कांदा, लसून कोबी हरभरा अशी कमी उंचीची पिके घेता येतात.

बहर व्यवस्थापन:- मृग बहार आणि आंबे बहार घेतात. आंबे बहारासाठी ऑक्टोबर / नोव्हेम्वर ताण द्यावा लागतो.

उत्पादन:- पूर्ण वाढ झाल्यानंतर प्रती झाड १०० ते १२५ किलो प्रती वर्ष.

महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास साभार सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

2 Comments
  1. ऋषिकेश उमाळे says

    टिशू कल्चर सागवान बदल माहिती मिळेल का

  2. म तू शेटे says

    मूळ म्हणजे लिंबू लागवड कधी करावी

Leave A Reply

Your email address will not be published.