लवंगचे फायदे

1

प्रस्‍तावना :

मसाले पिकाल लवंग हे एक पीक अतिशय महत्‍वाचे स्‍थान असलेले किमती पीक आहे. भारतात जास्तकरूनहे पीक केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्‍यात जास्त प्रमाणावर घेतले जाते. लवंगाचा वापर अन्‍न पदार्थांना स्‍वाद व चव देण्यासाठी तसेच अनेक प्रकारच्‍या औद्योगिक उत्‍पादनात लवंग तेलाचा उपयोग होतो. टूथपेस्‍ट, दातदुखी वरील औषधे, पोटातील आजारावर औषधे तसेच छान प्रतीची अत्‍तरे, सुवासिक साबण व व्‍हॅनिला तयार करण्‍यासाठी लवंग तेलाचा उपयोग केला जातो. लवंगापासून 17 ते 15 टक्‍के तेल मिळते.

हवामानातील साधर्म्‍यामुळे केरळ प्रमाणेच महाराष्‍ट्रातील कोकण भागत लवंग लागवडीस चांगलाच भाव भेटत आहे. कोकण कृषि विद्यापीठाने विद्यापिठांतर्गत असणा-या विविध संशोधन केंद्रावर लवंगेची लागवड केली जाते. आणि त्‍यामध्‍ये पिकांची वाढ व उत्‍पन्‍न समाधानकारक असल्‍याचे दाखवून दिले आहे. शेतक-यांना लवंग लागवडीसाठी प्रोजेक्ट देत आहेत. आणि त्‍यासाठी लवंग रोपांचे वाटप केले जात आहे.

आपण मसाल्‍यात पदार्थ वापरत ती लवंग म्‍हणजे लवंगाच्‍या झाडावरची कळी होय. परीपूर्ण पक्व ऊन्‍हात वाळविल्‍या की, लवंग तयार होते. परंतु त्‍या तशाच वाढू दिल्‍यास त्‍यांचे फूलांमध्‍ये रूपांतर होते आणि नंतर फळात म्‍हणजेच एकेकाळीपासून एक लवंग किंवा एक फळ निर्माण होते. लवंगाचे झाड नेहमी हिरव्यागार पानांनी भरलेले आपल्या पहायला मिळते. साधरणपणे उंची १२-१३ मीटर असते. खोडाची साल पिवळसर, धुरकट, तसेच कोमल असते. या झाडाच्या बुंध्याला खाली चारही बाजूस नाजूक व खाली वाकणाऱ्या फांद्या असतात. पाने मोठ मोठी व अंडाकृती असतात. लवंगाचे फुल निळसर तांबडे अश्याप्रकारचे असते. तेच सुकवून लवंग बाजारात आणतात. लवंगला नऊ वर्षांनी फुलांचा बहार येतो. लवंगचा वापर जास्त स्वयंपाकात व मसाल्यात उपयोग केला जातो.

लवंग लागवड :

सोभंय (चौफुलीवर) दीड ते दोन वर्षांचे रोप लावावे. लागवडीसाठी 75 x 75 x 75 सें.मी. आकाराचे मोठ मोठी खड्डे करून त्यामध्ये दोन टप शेणखत, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट मातीत मिश्रण करून खड्डे भरून रोपटी लावावे. लवंग झाडांना मातीमधील ओलावा हवा, पण दलदल किंवा कोरडी जमीन ठेवू नये. झाडांना जास्तीत जास्त सावली करावी.

 

हवामान व जमीन :

लवंगसाठी उष्‍ण दमट हवामान लागते. समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंत ते येऊ शकते. 20 ते 30 अंश सें.ग्रे. तापमान 1500 ते 2500 मि.मि पाऊस आणि 60 ते 95 टक्‍के आर्द्रता या पिकास चांगली आहे. कडकसूर्याच्‍या उष्‍णतेमुळे पाने व खोडावर करपण्‍याची क्रिया होऊन झाडांच्‍या वाढीवर दुष्पपरिणाम होतो.

या पिकास सावलीची गरज भासते. लवंगाचे पीक बहूतेक सर्व प्रकारच्‍या जमिनीत घेता येत असले तरी अधिक खोलीच्‍या अधिक निच-याच्‍या आणि सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण अधिक खोलीच्‍या उत्‍तम निच-याच्‍या आणि सेंद्रीय पदार्थाचे प्रमाण अधिक आहे, अशा जमिनी अधिक मानवतात.

भारतात लवंगाची लागवड ज्‍या भागात मोठया प्रमाणात होते. अश्या भागात जवळजवळ प्रत्‍येक महिन्‍यात पाऊस पडतो असतो आणि तापमान कमी असते. त्‍या करता तेथे लवंगाची लागवड उघडयावर केली जाते आणि पाण्याची गरज भासत नाही. आपल्‍याकडे याउलट परिस्थिती आहे. त्‍यामुळे लवंग झाडास उन व वा-यापासून संरक्षण मिळू शकेल अश्या ठिकाणी म्‍हणजे नारळ किंवा सुपारीची बांग, पुर्वेकडे उतार असलेल्‍या डोंगर उतारावर तसेच दोन डोंगरांच्‍या दरीतील भागात पाणीपुरवठयाची सोय उत्तम प्रकारे करून उघडयावर देखील लवंगाची लागवड यशस्‍वीपणे करू शकतो.

नारळ किंवा सुपारीच्‍या बागेत लवंगेची लागवड करण्‍यापूर्वी एक महत्‍वाची गोष्‍ट आपण लक्षात घ्या. ते म्‍हणजे नारळ आणि सुपारीच्‍या झाडांमधील अंतर योग्‍य अंतरावर सुपारीची लागवड असेल अशा ठिकाणी हे आंतरपीक म्‍हणून आपणास घेता येते व चांगले प्रकारचे उत्‍पन्‍न मिळते. लवंग हे मुखशुद्धीसाठी सुद्धा उपयोग केला जातो. तसेच लवंगाचा औषधी बनवण्यासाठी अथवा घरात औषध म्हणून सुद्धा उपयोग केला जातो.

औषधी गुणधर्म:

लवंग हे मसाल्याच्या पदार्थामधील महत्वाचा पदार्थ मानला गेला आहे. काळ्या रंगाची जी खूप जास्त सुगंधी असते तिला आपण खरी लवंग म्हणून ओळखतो. ती उत्कृष्ट मानली जाते. लवंग ही भुरकट रंगाची असते, तेल यंत्राद्वारे काढून घेतले जाते. लवंगामुळे पदार्थाला छान चव येते. भाताला फोडणी देत असता लवंगची चव छान येते. लवंगा मधून काढलेले तेल खूप औषधी असते. तेलाचा वापर बरीच औषध बनवण्यासाठी केला जातो. तसेच ते जंतुनाशक सुद्धा आहे.

लवंगाचे फायदे :

 • प्रवासामध्ये मळमळ होत असेल तर लवंग खावी.
 • लवंगचा वापर हे तिखट, कडवट, थंड, पाचक, रुची निर्माण करते.
 • खोकल्याची चाहूल येत असेल तर लवंग तोंडात ठेवावी.
 • लवंग सर्दीला सुद्धा फरक जाणवते.
 • जास्तच प्रमाणात सर्दी झाली असेल तर पाण्यात दोन लवंग टाकून पाणी गरम करून प्यावे.
 • लवंगाचे तेल डोक्यावर चोळल्याने डोकेदुखी कमी होते.
 • जर सांधेदुखी होत असेल तर लवंगाचे तेल चोळावे म्हणजे सांधेदुखी कमी होते.
 • लवंगही भारतात तसेच आग्नेय आशियात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.

https://krushisamrat.com/benefits-of-strawberry-fruit/

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

1 Comment
 1. Tulshiche fayde

  […] लवंगचे फायदे […]

Leave A Reply

Your email address will not be published.