जालना:
राज्यात दि. 29 डिसेंबर, 2018 या कालावधीत महारेशीम अभियान राबविण्यात येत असून या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हा परिषदेच्या प्रांगणात राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, प्रादेशिक रेशीम कार्यालय, औरंगाबादचे सहाय्यक संचालक दिलीप हाके, रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते आदींची उपस्थिती होती.
राज्यमंत्री खोतकर म्हणाले की, शेतकर्यांमध्ये रेशीम उद्योगाविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने संपूर्ण राज्यात 29 डिसेंबर, 2018 दरम्यान महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये रेशीम विभागांच्या अधिकार्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन रेशीम उद्योगाबाबत शेतकर्यांना माहिती देऊन हा व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करावे. येणार्या काळात रेशीम विभागाचा कायापालट करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असून जालना जिल्हा राज्यात रेशीम उद्योगामध्ये अग्रेसर राहील, याची सर्वांनी समन्वयाने काम करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
याप्रसंगी महा रेशीम अभियान चित्ररथाचे राज्यमंत्री खोतकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. तसेच रेशीम विकास कार्यालयातर्फे काढण्यात आलेल्या घडीपत्रिकेचे विमोचनही करण्यात आले. कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभियानाची वैशिष्ट्ये:
रेशीम शेतीचे फायदे, वैशिष्ट्ये व तंत्रज्ञान गावागावात जाऊन शेतकर्यांपर्यत पोहोचविणे.
संपूर्ण राज्यात एकाच वेळेस रेशीम शेतीचा प्रचार व प्रसिद्धी करणे.
रेशीम शेती करीता शासनाच्या विविध योजना, जसे मनरेगा, खडऊडख, जिल्हा वार्षिक योजनांची माहिती शेतकर्यांपर्यंत पोहोचविणे.योग्य लाभार्थ्यांची निवड करण्यास वाव. तुती रोपाद्वारे तुती लागवड केल्यामुळे तुती बाग जोमाने वाढते व दुष्काळातही तग धरून राहते अभियान लवकरच राबविण्यात आल्यामुळे लाभार्थ्यांना जानेवारी-फेब्रुवारी मध्ये तुती रोपे तयार करण्यास कालावधी मिळतो.गटाने रेशीम शेतीची वाढविणे, सन 2019 मध्ये तुती लागवड करणार्या शेतकर्यांची नोंदणी करणे.