अवकाळी पाऊस झाल्याने शेतीचे मोठे नुकसान
हिंगोली : जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यात कैऱ्या गळून पडल्या. अनेक ठिकाणी झाडे उन्मळली. महावितरणचे खांब पडले. सायंकाळी झालेल्या गारपीट, अवकाळी पावसाने पिके, फळबागांचे मोठे नुकसान झाल्याने प्रशासनाने तहसीलकडून शेती नुकसानीचा अहवाल मागविला आहे.
गोरेगाव : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव परिसरात ४ एप्रिल रोजी सायंकाळी जोरदार तब्बल दीड तास गारांसह पाऊस पडला. यामुळे तयार झालेला कांदा बियाणे पिकाच खूप नुकसान झालं. या वादळमुळे मोठी झाडे कोसळली. तसेच आंब्याच्या कैऱ्या पडून खूप नुकसान झाले आहे. शिजवून वाळू घातलेल्या हळदीचे अचानक झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.
अवकाळी पाऊस झाल्याने कनेरगाव वीज खंडित
कनेरगाव नाका : ४ एप्रिल रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कनेरगाव, फाळेगाव देवठाणा भोयर कानरखेडा बु., कानरखेडा खु., मोप आदी भागातील शेतकºयांचे केळीचे तसेच सत्र्यांच्या बागाचे व आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
फाळेगाव येथील डॉ. सारडा यांच्या शेतातील शाळेची संरक्षक भिंत कोसळली असून शेतातील आंब्याचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत सुरळीत नव्हता. त्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला अन् विहिरीवर जावून पाणी आणावे लागले.
अवकाळी पाऊस झाल्याने] करवाडीत बकर्यांचा मृत्यू
नांदापूर : कळमनुरी तालुक्यातील नांदापूरअंतर्गत असलेल्या करवाडी येथे ४ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून वादळी वारे पाऊस सुरू झाला. वाºयामुळे शेतकºयांनी एकच धावपळ सुरू झाली. शेतकरी केशव भुगाजी कºहाळे हे काल शेतामध्ये शेळ्या चारत होते. अचानक वारे आणि पाऊस सुरू झाला आणि बकºयाचा जागीच मृत्यू झाला. या शेतकºयाचे अंदाजे तीन ते चार हजारांचे नुकसान झाले.