कडकनाथ कोंबडी पालन – भाग १

0

कडकनाथ कोंबडी पालन हा व्यवसाय मुख्यतः परसबागेतील व्यवसाय म्हणून ओळखला जातो. हा व्यवसाय छोट्या प्रमाणात केल्यास आवश्यक त्या वेळेस पक्षी विकून घरखर्च भागविता येतो. परसबागेमध्ये कडकनाथ कोंबडीचे संगोपनकमी खर्चात कमी वेळेत महिला घरबसल्या सहज करू शकतात. सध्या कडकनाथ कोंबडीचे मांस काळे असल्यामुळे तसेच कोंबडीची व अंड्यांची विक्री किंमत जास्त असल्यामुळे खाण्यासाठी म्हणून अजून लोकांमध्ये ते जास्त प्रचलित नाही. दिवसेंदिवस लोक आरोग्य व आहार याबाबतीत जागरूक होत आहेत.त्यामुळे भविष्यात कडकनाथ पक्ष्यांना मोठी मागणी मिळू शकते.

कडकनाथ हि कोंबडी आपल्या देशात मध्य प्रदेशातील आबुआ आणि धार जिल्हा, राजस्थानमधील उदयपुर, बन्सवारा, डुंगरपुर भाग तसेच गुजरात लगतचे जिल्हे मिळून अंदाजे ८०० चौरस मैलांच्या आदिवासी प्रदेशात स्थानिक लोकांकडे आढळतात.

 

कडकनाथ कोंबडीची बाह्य वैशिष्ठे

१)कडकनाथ कोंबडी पूर्णतः काळ्या निळसर काळ्या रंगाची असल्यामुळे व तिचे मांस काळे असल्यामुळे काळमासी/ काळीमासी म्हणून सर्वांना ज्ञात आहे.

२) काळे मांस देणारी भारतातील कोंबड्यांची एकमेव जात आहे.

३) एक दिवसाच्या पिल्ल्याचा रंग निळसर ते काळा असतोआणि पाठीवर अनियमित गडद पत्ते असतात.

४) या कोंबड्यांचे पंख, नखे, चोच, पाय, तुरा,जीभ व सर्व अवयव काळ्या रंगाचे असतात. काळा रंग हा मेलानिन नावाच्या रंगद्र्व्यामुळे येतो.

५) या कोंबड्यांची रोग प्रतिकार क्षमता उत्तम असून कोंबड्या काटक असतात व रोगांना सहजासहजी बळी पडत नाहीत.

६) कोणत्याही वातावरणात ह्या कोंबड्या तग धरू शकतात.

७) ह्या कोंबड्या उंच असतात.

  

कडकनाथ कोंबड्यांची उत्पादन विषयक गुणवैशिष्ठ्ये

  • एक दिवसाच्या पिल्लाचे वजन – २५ ते ३० ग्रॅम
  • २० आठवड्याच्या पक्षाच्या शरीराचे वजन – ९२० ग्रॅम
  • पक्षी वयात येण्याचा कालावधी – १८० दिवसानंतर
  • नराचे वजन – १.५ ते १.७ किलो
  • मादीचे वजन – १.२ ते १.४ किलो
  • अंडी देण्याचे प्रमाण – ८० – १३० दिवस

( संगोपन पद्धतीनुसार)

  • ४० आठवड्यानंतर मिळणाऱ्या अंड्याचे वजन – ४३ ग्रॅम
  • पक्षाच्या अंड्याची गर्भधारण क्षमता – ५५ %
  • अंडी उबवणूक क्षमता – ५२%

 

 

 

कडकनाथ कोंबड्यांच्या अंडी व मांसाचे औषध गुण वैशिष्ठ्ये

या कोंबड्यांचे मांस दिसण्यास काळे असले तरी ते चविष्ट तसेच औषधी असल्याचे मानले जाते. या कोंबडीच्या मांसामध्ये वअंड्यामध्ये लोहाचे प्रमाण जास्त असते. तसेच यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अतिशय कमी आहे. त्यामुळे हृदयरुग्णांना कडकनाथ कोंबडीचे मांस उपयुक्त असते. कडकनाथ कोंबड्यांची अंडी व मांस रक्तदाब, डोकेदुखी, दमा, मूत्रपिंडाची सूज, पांढरा कोड, त्वचारोग आणि नपुंसकता इत्यादी रोगांवर गुणकारी आहे. मांसाचा रंग मेलानिन रंगद्र्व्यामुळे काळा असतो.

कडकनाथ कोंबडीच्या मांसातील पोषणतत्वे    

१) कडकनाथ कोंबडीच्या मांसामध्ये २५% प्रथिने तर इतर जातीच्या कोंबड्यांमध्ये १८ ते २० % प्रथिने असतात.

२) मांसामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण १८४.७५ मि. ग्रॅम / १०० ग्रॅम तर हेच प्रमाण इतर कोंबड्यांमध्ये २१८.१२मि. ग्रॅम / १०० ग्रॅम इतके असते.

३) कडकनाथ कोंबड्यांच्या मांसामध्ये स्निग्ध पदार्थाचे ( फॅट ) प्रमाण ०.७३ ते १.०५ % तर हेच प्रमाण इतर जातीच्या कोंबड्यांमध्ये १३ ते २५ % इतके असते.

४) १८ आवश्यक अमिनो आम्लाचे व संप्रेरकांचे प्रमाण मांसामध्ये जास्त असते.

५) लिनोलिक आम्लाचे प्रमाण २४ % तर इतर जातींमध्ये हे प्रमाण २१ % असते.

या पुढील भागात अधिक जाणून घेऊयात कडकनाथ कोंबडी संगोपनाविषयी.

 

https://krushisamrat.com/%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A8/

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.