• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, April 13, 2021
  • Login
Krushi Samrat
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
Krushi Samrat
No Result
View All Result
Home शेती

कोकमचे औषधी गुणधर्म

Team Krushi Samrat by Team Krushi Samrat
May 27, 2019
in शेती
1
कोकमचे औषधी गुणधर्म
Share on FacebookShare on WhatsApp

कोकमचा उपयोग खूप पूर्वीपासून आहारीय पदार्थाबरोबरच औषधी म्हणूनही करतात. आमटी, भाजीत याचा उपयोग केला जातो. तर अनेक आजार बरे करण्यासाठी औषध म्हणूनही याचा वापर केला जातो. कोकमला मराठीत आमसूल तर संस्कृतमध्ये साराम्ल, इंग्रजीमध्ये कोकम तर शास्त्रीय भाषेत गार्सिनिया इंडिकाया नावाने ओळखले जाऊन कोकम ही वनस्पती गटिफेरी या कुळातील आहे. याची झाडे केरळ, कर्नाटक व कोकणामध्ये पुष्कळ प्रमाणात असतात. याचे फळ जांभळट लाल रंगाचे असते. हे फळ सुकल्यानंतरच त्याचा कोकम किंवा आमसूल म्हणून वापर करतात. याच फळांचा रस काढून त्याचे सरबत, सोलकढी बनविली जाते. कोकमच्या बीमधून तेलही काढले जाते. हेच तेल खाण्यासाठी व औषध म्हणूनही वापरतात.

औषधी गुणधर्म

कोकममध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, तंतूमय पदार्थ व क जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार कोकम हे रक्तपित्तशामक, दीपक, पाचक व ग्राही गुणधर्माचे आहे. कोकमची साल स्तंभन कार्य करते तर बीयांचे तेल स्तंभन व व्रणरोपक आहे.

उपयोग

० चरकाचार्याच्या मते चिंचेपेक्षा कोकम हे जास्त औषधी गुणधर्मयुक्त व शरीरास गुणकारी आहे.

० कोकम पाण्यात टाकून त्याचा काढा करून प्यायल्यास अपचन दूर होते.

० कोकममध्ये पाणी घालून त्याचा कल्क बनवावा व हा कल्क पाण्यात टाकून त्यात वेलची, खडीसाखर घालून सरबत बनवावे. हे सरबत प्यायल्याने आम्लपित्त, दाह, तृष्णा, उष्णतेचे विकार दूर होतात.

० कोकमचा कल्क, नारळाचे दूध, कोिथबीर व थोडे ताक एकत्र करून त्याची सोलकढी बनवून जेवणासोबत प्यावी. यामुळे घेतलेल्या अन्नांचे पचन व्यवस्थित होते.

० अतिसार, संग्रहिणी आणि रक्ताचे जुलाब हे पोटात मुरडा येऊन होत असतील तर कोकमच्या कुस्करुन गाळलेले पाणी प्यावे.

० अंगावर पित्त उठले असल्यास कोकमचा कल्क संपूर्ण अंगास लावावा.

० पोटात कळ येऊन आव पडत असल्यास कोकमचे तेल भातावर घालून तो भात खावा.

० हातापायांची उष्णतेमुळे आग होत असेल तर कोकमचे तेल संपूर्ण अंगाला चोळावे. यामुळे उष्णता कमी होऊन दाह कमी होतो.

० हिवाळ्यात थंडीमुळे जर ओठ फुटत असतील तर कोकमचे तेल कोमट करून ओठांवर लावावे. ओठ मऊ होतात.

० हिवाळ्यामध्ये शरीराची त्वचा कोरडी होऊन भेगा पडत असतील तर कोकमचे तेल गरम करून शरीरावर चोळल्यास भेगा नाहीशा होतात.

० रोजच्या आहारामध्ये कोकमचा नियमितपणे वापर केल्यास अरुची, आम्लपित्त, भूक मंद होणे, अपचन इ. तक्रारी दूर होऊन आहाराचे पचन चांगले होते.

० कोकम तेलाचा उपयोग हा विविध प्रकारचे मलमे बनविण्यासाठी केला जातो.

० कोकमचा उपयोग नियमितपणे आहारात केल्याने आतडे कार्यक्षम होऊन पोट साफ होण्यास मदत होते.

० १० तोळे कोकम पाण्यात भिजत घालावे. नंतर ते कोकम पाण्यात कुस्करून ते पाणी गाळून घ्यावे व त्यात जिरेपूड, साखर घालून ते पाणी प्यायले असता शरीरावर आलेले शीतपित्त दूर होते.

० मूळव्याधीचा त्रास होत असेल व त्यातून रक्त पडत असेल तर कोकमचा कल्क दह्य़ावरच्या निवळीत कालवून ती निवळी प्यावी. यामुळे रक्त पडणे बंद होते.

बहुगुणी कोकम सरबत

इतर कोणत्याही कृत्रिमरीत्या थंडगार केलेल्या शीतपेयांपेक्षा कोकम सरबताचे गुण आणि फायदे निश्चितच जास्त आहेत. कोकम उत्पादनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास कोकणच्या वैभवातही भर पडेल.

शरीरात नियमित पद्धतीने पित्त निर्माण होते आणि त्याचा चयापचय या शरीरांतर्गत व्यवहाराशी संबंध येतो. खाण्यापिण्याच्या नको त्या सवयी, तेलकट, मांसाहारी पदार्थ, मसालेदार पदार्थ, आपल्या कुवतीपेक्षा जास्त खाणे किंवा अनेक अनियमित पद्धतींचा वापर इत्यादी कारणांने पित्ताची अतिरिक्त निर्मिती होते. आनुवंशिकता असेल तर पित्तनिर्मितीस चालना मिळते. आमचा या व्याधीशी संबंध आल्याने आता त्याची विशेषत्वाने जाणीव झाली. परंतु याच पित्त विकारावर अतिशय गुणकारी असं औषधी फळ आहे ते म्हणजे कोकणातील रातांबा ऊर्फ कोकम.

नियमित कोकम सरबताचे प्राशन केल्यास पित्त विकार दूर होण्यास मदत होते. रातांब्यापासून बनवलेले कोकम सरबत हे गुणांनी आणि चवीनेही अतिशय मधुर असते. आता सुरू होणा-या उष्ण दिवसांमध्ये हे सरबत जरूर प्यावे. रातांब्याचे झाड बहुगुणी आहे, म्हणूनच कोकणी आहारात कोकमांच्या सोलांचा म्हणजे आमसुलांचा वापर होतो. तसंच कोकमाच्या आगळाचाही स्वयंपाकात वापर केला जातो. कोकमामुळे अंगात शीतलता आणि माधुर्य वाढून जळजळ, दाह कमी होतो. जगाच्या बाजारात हजारो कोटी रुपयांची कृत्रिम शीतपेयांची निरुपयोगी उत्पादनं खपतात.

कोकम सरबत हे अशा कृत्रिम शीतपेयांना योग्य प्रतिस्पर्धी ठरू शकते. कोकणात कोकमाचे उत्पादन वाढवल्यास त्याचा कोकण प्रांताला फायदा होईल. कोकणातील रातांबा या पिकाचे योग्य प्रकारे जर संवर्धन झाले तर जगाला ते वरदान ठरणार आहे. पित्त विकाराने ग्रस्त असणा-या रुग्णांसाठी कोकम आणि कोकमापासून बनवलेली उत्पादने फायदेशीर आहेत. रातांब्याची हिरवी फळे काठीने झोडून जमिनीवर पाडतात आणि ती कापून त्यात मीठ घालून वाळवतात. त्याऐवजी पिकलेली रातांबा फळे झाडावरच तयार झाली तर ती अधिक मौल्यवान ठरतील. दैनंदिन आहारात कोकम सोलांचा वापर हवा. कोकमाच्या

बियांपासून बनवलेल्या तेलाचाही वापर डोळ्यांची आणि तळपायांची जळजळ कमी करण्यासाठी होतो. पित्त विकाराचे नियंत्रण करण्याची शक्ती कोकमात आहे.

कोकम चे फायदे

१) कोकममध्ये बी कॉम्प्लेक्स, व्हिटामीन सी ही जीवनसत्वे भरपूर प्रमाणात आहेत.

२) हयड्रोसेंट्रिक अॅसिड नावाचा आरोग्यदायी घटक देखील यात आहे.

३) मॅगनिज, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम अशी खनिजद्रव्ये कोकममध्ये आहेत.

४) मधुमेहींसाठी कोकम फायदेशीर आहे. शरीरात इन्सूलिन्सची निर्मिती करून मधुमेह आटोक्यात राहण्यास मदत होईल.

५) कोकम सरबतामुळे पचनसंस्था सुधारते.

६) कोकममध्ये अँटिफंगल आणि अँटिऑक्सिडंट हे दोन गुणधर्म आहेत. ज्यामुळे त्वचा निरोगी राहते.

७) शरीराचे तापमान थंड ठेवण्याचा गुणधर्म कोकममध्ये आहे.

८) कोकम सरबत म्हणजे कार्डिओ टॉनिक आहे. यामुळे कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते.

९) कोकममध्ये असणारा हायड्रो क्रिटिक अॅसिड हा घटक शरीरातील प्रतिकारक्षमता वाढवून वजन कमी करण्यास मदत करतो.

१०) आहारामध्ये कोकमचा नियमित वापर केल्यास पोट साफ होण्यास मदत होते.

कोकम पाण्यात भिजवून ठेवावे. त्यानंतर भिजवलेले कोकम पाण्यात कुस्करून ते पाणी गाळून घ्यावे.

त्यात जिरेपूड आणि साखर घालावी. हे पाणी प्यायल्यानं शरीरावरील शीतपित्त दूर होईल. नियमित कोकम सरबताचे प्राशन केल्यास पित्त विकार दूर होण्यास मदत होते. रातांब्यापासून बनवलेले कोकम सरबत हे गुणांनी आणि चवीनेही अतिशय मधुर असते.

उन्हाळ्यात तर आहारात कोकमाचा अवश्य समावेश करा. त्यासाठी काही खास पर्याय. कोकम करीभूक वाढवण्यास कोकम करी फायदेशीर ठरते. कोकम करी बनवण्यासाठी कोकम पाण्यात भिजत घाला आणि त्याचा रस काढा. चवीनुसार त्यात मीठ आणि साखर घाला. हिंग, लसूण, मिरची आणि कोथिंबीर घाला. एकत्र मिक्स करा आणि प्या.

कोकम सरबत उन्हाळ्यात कोकम सरबत पिणे फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात होणारे डिहाड्रेशनचा त्रासापासून सुटका करण्यासाठी कोल्ड ड्रिंकऐवजी कोकम सरबत घ्या. मीठ, जिरेपूड, धनापूड घालून कोकम सरबत घेणे उपयुक्त ठरेल. कोकम चटणी५-६ कोकम पाण्यात भिजत घालून त्यात मीठ, गुळ, हिरव्या मिरच्या आणि जिरे घालून वाटा. खाण्यासाठी चटणी तयार.

आमटीत किंवा भाजीत कोकम घालादररोज आहारात कोकमाचा समावेश करण्याचा हा सोपा उपाय आहे. फिश करी, भेडींची भाजी, सांबार, आमटी बनवताना त्यात कोकम घाला. सोलकढीसोलकढी प्यायल्याने भूक वाढते. पचन चांगले होते. कोकम पाण्यात मिसळून त्याचा घट्ट रस काढावा. नारळाच्या दूधामध्ये कोकमाचा कोळ मिसळून त्यावर हिंग़, मोहरी, जिरं, मिरची आणि कढीपत्त्याची फोडणी द्यावी. तयार मिश्रण नीट एकत्र करून काहीवेळ फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवावे.

आता सुरू होणा-या उष्ण दिवसांमध्ये हे सरबत जरूर प्यावे. रातांब्याचे झाड बहुगुणी आहे, म्हणूनच कोकणी आहारात कोकमांच्या सोलांचा म्हणजे आमसुलांचा वापर होतो. तसंच कोकमाच्या आगळाचाही स्वयंपाकात वापर केला जातो. कोकमामुळे अंगात शीतलता आणि माधुर्य वाढून जळजळ, दाह कमी होतो. जगाच्या बाजारात हजारो कोटी रुपयांची कृत्रिम शीतपेयांची निरुपयोगी उत्पादनं खपतात.

कोकम सरबत हे अशा कृत्रिम शीतपेयांना योग्य प्रतिस्पर्धी ठरू शकते. कोकणात कोकमाचे उत्पादन वाढवल्यास त्याचा कोकण प्रांताला फायदा होईल. कोकणातील रातांबा या पिकाचे योग्य प्रकारे जर संवर्धन झाले तर जगाला ते वरदान ठरणार आहे. पित्त विकाराने ग्रस्त असणा-या रुग्णांसाठी कोकम आणि कोकमापासून बनवलेली उत्पादने फायदेशीर आहेत.

रातांब्याची हिरवी फळे काठीने झोडून जमिनीवर पाडतात आणि ती कापून त्यात मीठ घालून वाळवतात. त्याऐवजी पिकलेली रातांबा फळे झाडावरच तयार झाली तर ती अधिक मौल्यवान ठरतील. दैनंदिन आहारात कोकम सोलांचा वापर हवा.

कोकमाची फळे झाडावर लवकर पिकवा

फलधारणा झाल्यानंतर सुमारे 140 दिवसांनी कोकमाची फळे काढणीसाठी तयार होतात. कोकमाची फळे ही काढणीसाठी एप्रिल – मे महिन्यापासून पुढे तयार होऊन बऱ्याचदा पावसात सापडतात. हे लक्षात घेऊन विद्यापीठाने कोकमाची फळे लवकर तयार होण्यासाठी संशोधन केले आहे.

कोकम हे कोकणामध्ये अत्यंत महत्त्वाचे; पण आंबा, काजूच्या तुलनेत दुर्लक्षित पीक आहे. कोकम फळापासून केले जाणारे कोकम सरबत, आगळ, आमसुले हे मूल्यवर्धित पदार्थ संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. कोकम हे हृदय विकारावर, लठ्ठपणावर व आम्लतेवर अत्यंत गुणकारी समजले जाते. कोकमाच्या सालीपासून मूल्यवर्धित पदार्थ तर होतातच; पण कोकमाच्या बीपासून तेल देखील मिळते. हे तेल सर्वसामान्य तापमानात घन राहते आणि या तेलाचा वापर औषधात व अनेक औषधी प्रसाधनांत केला जातो.

कोकमामध्ये नर आणि मादी अशा दोन प्रकारची झाडे आढळतात. कोकमाच्या मादी झाडांनाच फुले व फळे लागतात, तर नर झाडांना फक्त फुले लागतात. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकमाच्या “कोकम अमृता’ व “कोकम हातिस’ या सुधारित जाती विकसित केल्या आहेत. या दोन्ही जातींपासून उत्पन्न जास्त मिळते. फळे मध्यम ते मोठी असल्याने प्रक्रिया उद्योगासाठी चांगली आहेत.

कोकमाच्या झाडाला जून झालेल्या फांदीला नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात फुले लागतात. कळीपासून फुले उमलण्याचा कालावधी व त्यानंतर फलधारणा यासाठी सुमारे महिन्याभराचा कालावधी लागतो. फलधारणा झाल्यानंतर सुमारे 140 दिवसांनी कोकमाची फळे काढणीसाठी तयार होतात.

कोकमाची फळे ही काढणीसाठी एप्रिल – मे महिन्यापासून पुढे तयार होतात व बऱ्याचदा पावसात सापडतात. कोकमाची फळे लवकर तयार होण्याबाबत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन केले आहे. कोकमाची फलधारणा ज्यावेळेस होते (जानेवारी ते फेब्रुवारी), त्यावेळेस तीन टक्के पोटॅशियम नायट्रेटची (13ः0ः45) फवारणी करावी. पुन्हा ही फवारणी 20 दिवसांनंतर करावी. या फवारणीमुळे कोकमाची फळे झाडावर लवकर पिकतात, त्याचबरोबरीने झाडाचे उत्पन्न देखील वाढते. फळांची प्रत देखील सुधारते.

कोकमाच्या पूर्ण वाढलेल्या एका मादी झाडापासून किमान 30 ते 50 किलो फळांचे उत्पादन मिळेल. कोकमाच्या बाबतीत हंगामाच्या सुरवातीला फळांचा दर जास्त म्हणजे 10 ते 15 रुपये प्रति किलो असतो. जसा हंगाम वाढत जातो, तसा तो कमी कमी होत जातो. पावसाच्या नंतर तर नगण्य किमतीला कोकम फळे विकली जातात. हे लक्षात घेऊन फळे कशा पद्धतीने लवकर पिकतील याकडे लक्ष  देणे आवश्यनक आहे.

https://krushisamrat.com/benefits-of-kokam/

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Tags: Kokam's medicinal propertiesKrushi Samratकृषी सम्राटकोकमचे औषधी गुणधर्म
Team Krushi Samrat

Team Krushi Samrat

Related Posts

जायद सीजन में भिंडी की खेती 
शेती

जायद सीजन में भिंडी की खेती 

March 12, 2021
लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020

ताज्या बातम्या

जायद सीजन में भिंडी की खेती 
शेती

जायद सीजन में भिंडी की खेती 

by Girish Khadke
March 12, 2021
उत्पादन में होगा इजाफा – भूमि की तैयारी के लिए करें इन 6 कृषि यंत्रोंसे
अवजारे

उत्पादन में होगा इजाफा – भूमि की तैयारी के लिए करें इन 6 कृषि यंत्रोंसे

by Girish Khadke
March 12, 2021
लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

by Team Krushi Samrat
October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

by Team Krushi Samrat
October 22, 2020
रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे
शेती

रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे

by Team Krushi Samrat
October 16, 2020
परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास
शेती

परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास

by Team Krushi Samrat
October 16, 2020
खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव
शेती

खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव

by Team Krushi Samrat
October 15, 2020
कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक
शेती

कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक

by Team Krushi Samrat
October 15, 2020
२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित
शासकीय योजना

२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित

by Team Krushi Samrat
October 10, 2020
Prev Next

About us

Krushi Samrat

कृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अवजारे
  • आयुर्वेदिक नुस्खे
  • कायदा
  • कृषीसम्राट सल्ला
  • तंत्रज्ञान
  • प्रेरणा
  • प्रेरणादायक गोष्टी
  • बातम्या
  • यशोगाथा
  • व्हिडिओ
  • शासकीय योजना
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • हवामान
  • हिन्दी

Recent News

जायद सीजन में भिंडी की खेती 

जायद सीजन में भिंडी की खेती 

March 12, 2021
उत्पादन में होगा इजाफा – भूमि की तैयारी के लिए करें इन 6 कृषि यंत्रोंसे

उत्पादन में होगा इजाफा – भूमि की तैयारी के लिए करें इन 6 कृषि यंत्रोंसे

March 12, 2021
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In