कोकम हे कोकणातील प्रमुख पिकांपैकी एक आहे. कोकमासाठी येथील हवामान आणि जमीन पोषक असून कोकमाच्या बागायती उभ्या राहू लागल्या आहेत. यामुळे नगदी पीक म्हणून हे पीक वेगाने पुढे येत आहे. अर्थातच, या पिकासाठीही मेहनत, योग्य नियोजन महत्त्वाचे असून कोकमाची लागवड करताना सुधारित जातींची योग्य प्रकारे लागवड आणि निगा राखल्यास यातून शेतक-यांना चांगले उत्पन्न मिळू शकते. कोकमापासूनही प्रक्रिया केलेल्या पदार्थानाही बाजारात चांगला भाव मिळत आहे. या दृष्टीने भविष्यात कोकणात कोकमाची उलाढाल मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. यासाठी शेतक-यांनी आतापासूनच तयारी करणे आवश्यक आहे.
सुधारित जाती :
कोकण अमृता : डॉ. बा. सा. कोकण कृषि विद्यापीठाने ही मादी प्रकारची जात विकसित केली आहे. पूर्ण वाढलेल्या झाडापासून १४0 किलो फळे प्रतिवर्ष मिळतात. फळे मध्यम आकाराची, जाड सालीची आणि आकर्षक लाल रंगाची असतात. फळे पावसाळ्यापूर्वी पिकतात; त्यामुळे फळांचे नुकसान होत नाही.
कोकण हातीस : डॉ. बा. सा. कोकण कृषि विद्यापीठाने ही मादी प्रकारची जात विकसित केली आहे. पूर्ण वाढलेल्या झाडापासून १५o किलो फळे प्रतिवर्ष मिळतात. या जातीची फळे मोठी, जाड सालीची आणि गर्द लाल रंगाची असतात. मोठ्या आकाराच्या फळामुळे या जातीला मागणी जास्त आहे.
लागवड आणि निगा :
पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन या झाडास उपयुक्त आहे. उष्ण व दमट हवामानात हे पीक चांगले येते. दोन प्रकारची झाडे आढळतात. मृदकाफट कलम पद्धतीचा वापर केल्यास कोकमाचे चांगले उत्पादन मिळते. ‘कोकम अमृता’ ही जात कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. या जातीची लागवड केल्यास शेतक-यांना भरघोस उत्पादन मिळू शकते. या जातीच्या फळांचा रंग लाल असून साल जाड आहे. उत्पन्न १४० किलो प्रति झाड एवढे मिळते.
५0 ग्रॅम २ टक्के फॉलीडॉल पावडर प्रत्येक खडुष्यात टाकावी आणि पावसाच्या सुरुवातीला प्रत्येक खडुष्यात एक वर्षांची निरोगी, जोमदार वाढणारी रोपे किंवा कलमे लावावीत.
विशेषत: कलमे लावल्यानंतर ताबडतोब त्याला काठीचा आधार द्यावा. आधार देऊन सरळ वाढू दिल्याने कलम उभे सरळ वाढते, लवकर उत्पादन देते आणि रोपांपेक्षा लवकर उत्पादन मिळू शकते. कलमाच्या जोडाखाली पहिली दोन वर्षे वारंवार फुटवा वाढतो. तो काढून टाकावा; अन्यथा फुटवा वाढून कलम मरण्याची शक्यता असते. लागवडीच्या पहिल्या वर्षी कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कलमे / रोपांना सावली करावी. बागेमध्ये साधारणत: १o टक्के नर झाडे लावावीत. लागवडीनंतर प्रत्येक झाडाला पहिली किमान दोन वर्षे १o लिटर प्रतिदिन ठिबक सिंचनाद्वारे पाणी द्यावे.
खते :
पहिल्या वर्षी दोन किलो शेणखत, १०० ग्रॅम युरिया, १५० ग्रॅम सिंगल सुपर फॉस्पेट, ५० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. दहाव्या वर्षापासून प्रत्येक झाडास २० किलो शेणखत, १ किलो युरिया, दीड किलो सिंगल सुपर फॉस्फेट , ५०० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश चर पद्धतीने द्यावेत. लागवडीनंतर पहिली दोन वर्षे हिवाळय़ात व उन्हाळय़ात आठवडय़ातून एक वेळ पाणी द्यावे. प्रति झाडास १५ लिटर पाणी द्यावे.
काढणी, उत्पादन व उपयोग :
कोकमामध्ये फळधारणा पाचव्या वर्षापासून सुरू होते. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात फुले लागतात आणि मार्च ते मे महिन्यामध्ये फळे तोडणीस तयार होतात. मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थ साठविण्यासाठी आणि बा उपयोग अमसुले (वाळवलेली रस लावलेली कोकम साल) कोकम आगळ (मिठाचा वापर करून साठवलेला रस) आणि अमृत कोकम (कोकम सरबत) इत्यादींसाठी फैं: केला जातो.
कोकमच्या बियांमध्ये घनस्वरुपातील तेल बटरचा उपयोग सौंदर्यप्रसाधने तसेच औषधांमध्ये, क्रीममध्ये केला जातो. पूर्ण वाढलेल्या कोकम झाडापासून १४0 ते १५o किलो फळे मिळतात.
विशेष काळजी :
कोकम झाडाचे वय वाढते तसे उत्पादन वाढते. त्यामुळे त्याला नियमित खताची मात्रा द्यावी. खत दिल्यामुळे फळे नियमित मिळतात,
कोकमच्या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळेल, याची काळजी द्यावी. त्याच्यावर सावली करणारी आजूबाजूची झाडे कमी केल्यास
कोकमच्या झाडावरील मेलेल्या आणि कमकुवत फांद्या कापून नष्ट कराव्यात. मात्र, कोकममध्ये जमिनीकडे वाढणा-या (जिओट्रोपिक) फांद्यांवर फुले आणि फळे लागतात अशा फांद्या तोडू नयेत.
कोकमच्या झाडाला फळे लवकर तयार होण्यासाठी डॉ. बाळासाहेबसावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे फळधारणा झाल्यावर (जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात) ३ टक्के पोटॅशिअम नायट्रेटची (१३:०:४५) फवारणी करावी. पुन्हा ही फवारणी २० दिवसांनंतर करावी. या फवारणीमुळे फळे लवकर तयार होतात, प्रतदेखील सुधारते.
रोग व्यवस्थापन :
पिंक रोग या बुरशीजन्य रोगामुळे पांढ-या रंगाचे ठिपके फांद्यावर पडतात. या रोगाची लागण झालेला भाग कापून टाकावा. त्या भागाला बोडरेपेस्ट लावावी. सुमारे ७-८ वर्षानंतर उत्पादनाला सुरुवात होते. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात फुले येण्यास सुरुवात होते. फळे मार्च ते जून महिन्यात काढणीस तयार होतात. हिरवा रंग जाऊन लाल रंगाची फळे मिळतात. चांगल्या वाढलेल्या आणि योग्य निगा राखलेल्या झाडापासून १००-१५० किलोपर्यंत पिकलेली फळे मिळतात.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.