मागील लेखाहून पुढे आता अधिक विस्ताराने जाणून घेवूयात आंतर मशागतीतील इतर प्रकारां विषयी —
मातीचा भर देणे किंवा बांधणी –काही विशिष्ट पिकांमध्ये ( भुईमूग, बटाटा, उस, हळद) मातीचा भर देणे किंवा बांधणी करणे हे एक महत्वाचे आंतरमशागतीय काम आहे. पिक उगवणीनंतरविशिष्ट कालावधीनंतरपिकाच्या दोन ओळीत डवरे किंवा रिजर( उसामध्ये) चालवूनपिकाच्या जमिनीलगतच्या भागावर मातीची भर द्यावी.त्यामुळे पिकास आधार मिळतो आणिजमिनीत वाढणाऱ्या भागाची ( बटाटा, हळदशेंगा) वाढचांगली होण्यास मदत होते.
पिकांमध्ये आच्छादन टाकणे–जमिनीची धूप कमी करण्यासाठी,जमिनीतील ओलावा दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी, तसेच तण नियंत्रणकरण्याच्या दृष्टीने जमिनीवर विविध पदार्थांचे आच्छादन करणे हापर्याय ठरू शकतो. आच्छादनासाठी गहू / धानाचा भुसा किंवा ज्वारी, मका, कापूस यांची धसकटे व अवशेष यांचा वापर करावा. कमी क्षेत्रावर महत्वाच्या पिकांसाठी प्लास्टिक फिल्मचा सुद्धा मल्च म्हणून वापर करता येतो. आच्छादन कुजल्यानंतर त्यापासून पिकांस सेंद्रिय पदार्थ उपलब्ध होतात. प्रामुख्याने उसामध्ये ५ – १० से.मी. उंच उसाच्या पाचटाचे आच्छादन वापरल्यास तणांचा बंदोबस्त होतो.
खुरपणी( निंदणी ) व डवरणी –खुरपणी व निंदन हि शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आंतरमशागतीची कामे आहेत. निंदणीचे काम त्रासदायक, वेळखाऊ व खर्चिक असते. त्यामुळे जमिनीचा प्रकार, मजुरांची उपलब्धता आणि मजुरीचा दर या बाबींचा विचार करून खुरपणीचे योग्य नियोजन करावे.उदा: लाल जमिनी लवकर कडक होतात व म्हणून त्यात काळ्या जमिनीच्या तुलनेत अधिक मजूर लागतात. विविध पिकांचा कालावधी, पिक व तण स्पर्धेचा कालावधी व पिकाचा प्रकार यानुसार २ ते ३ वेळा खुरपणी करावी.
डवरणीच्या कामाचे नियोजन सुद्धा योग्य प्रकारे केल्यास पिक उत्पादन वाढीस त्याचा फायदाच होतो. पिकाच्या दोन ओळीतील अंतर जास्त असल्यास डवरणीचे काम खोल करता येते व दीर्घकाळ करणे शक्य होते. शेतात हराळी व लव्हाळा या सारखी तणे असल्यासडवरणीचे काम निट करता येत नाही. त्यामुळे इतर वार्षिक तणांचे नियंत्रण होण्यासअडथळा निर्माण होतो म्हणून या बहुवार्षिक तणांचे योग्य वेळी नियंत्रण करावे. तणे एक ते दोन पाने असतांना डवरणी करून नष्ट करावीत कारण अशावेळी तणांच्या बियांतीलअन्नसाठा संपुष्टात आलेला असतो व ते मशागतीस लवकर बळी पडतात. तणे उंच वाढू दिल्यास त्याचे तुकडे होऊन त्यापासून नवी रोपटे तयार होतात ( उदा: विंचू, उंदीरकानीव हराळी ) डवरणी फार खोल करू नये कारण डवरणी खोल केल्यास पिकांच्या मुळांनाइजा पोहचते तसेच पिक उंच झाल्यावर फांद्या तुटून नुकसान होते तेंव्हा डवरणीचे काम जमिनीत योग्य ओलावा असतांना व पिक वाढीची अवस्था लक्षातघेवून करावे. जमीन कडक असल्यास डवऱ्याला दातेरी पास लावावीव अकोला हो चा वापर करावा म्हणजे डवरणीचे काम खोल करणे शक्य होते.डवरणीमुळे पिकांच्या मुळांच्या कार्यकक्षेत हवा खेळती राहते व पिकांना ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो व पिक उत्पादनावर अनुकूल परिणाम होतो.
उगवण पश्चात तण नाशकांचावापर:- मजुरांची उपलब्धता नसणे तसेच सततचा पाऊस इत्यादी कारणांमुळे खुरपणी व डवरणी हिआंतरमशागतीची कामे करणे शक्य होत नसल्यास पिकांनुसार उगवणपश्चात तणनाशकांचा वापर करून तणांचा बंदोबस्तकरता येऊ शकतो. सोयाबीन, कपाशी, तेलबियापिके, ऊस व इतर कडधान्यपिकांमध्ये अशाप्रकारच्या उगवण पश्चात तणनाशकांचावापरशेतकरी सध्या करत असून त्यासाठी तांत्रिक सल्ला घेऊनच तणनाशकांची फवारणी करावी.तणनाशक फवारणीची योग्य वेळ, पिकांची व तणांची अवस्था, तणनाशक व पाण्याचे प्रमाण इत्यादी बाबींचा विचार करूनच तणनाशकांचा वापर करावा.
वरील विवेचनावरून असेलक्षात येते कि पिकातीलआंतरमशागत अनेक दृष्टीने व विशेषतः तण नियंत्रणासाठी महत्वाची असते.
या पुढील भागात जाणून घेऊ काही महत्वाच्या खरीप पिकांतील आंतरमशागतीविषयी……
( क्रमशः)

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.