महाराष्ट्रात कापूस बियाणे विक्रीस २५ मे ला सुरुवात

0

पूर्व हंगामी कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची कापूस बियाणे खरेदी करताना फसवणूक होऊ नये व काळा बाजार थांबावा यासाठी महाराष्ट्र शासनाने कापूस बियाणे शेतकऱ्यांना २५ मे पासून विक्री करण्याचे नवीन आदेश नुकतेच जारी केलेत. बियाणे उत्पादकांनी बियाणे वितरक व विक्रेते यांच्याकडे बियाणांचा पुरवठा सुरु केला आहे.

राज्यात सुमारे ४२ लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड अपेक्षित आहे. पूर्वहंगामी कापूस लागवड विदर्भ, मराठवाडा, खान्देश , नगर, मालेगाव (जि. नाशिक) भागात अनेक शेतकरी करतात. पूर्वहंगामी लागवडीस २५ मे नंतर सुरवात केली जाते. कापूस लागवडीत जळगाव जिल्हा राज्यात या हंगामात सर्वात पुढे राहणार असून, सुमारे पाच लाख १९ हजार हेक्‍टरवर लागवड अपेक्षित आहे. यात सुमारे ८० ते ८५ हजार हेक्‍टरवर पूर्वहंगामी कापसाची लागवड अपेक्षित आहे. या पाठोपाठ यवतमाळ व विदर्भातील इतर जिल्हे कापूस लागवडीत अग्रेसर आहेत.

जळगाव जिल्ह्यात गोदामांमध्ये सुमारे अडीच लाख पाकिटे बियाणे दाखल झाले असून, काही कंपन्यांनी आपल्या वितरकांकडे हे बियाणे पाठविले आहे.  त्याची विक्री २५  मे पासून करणे बंधनकारक आहे. लागवड १ जूनपासून करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

काळाबाजार रोखण्यासाठी बदलला निर्णय

गुलाबी बोंड अळीला रोखण्यासंबंधी कापूस बियाणे १ जूनपासून शेतकऱ्यांना विक्री करण्याचे आदेश शासनाने बजावले होते. आपल्याकडे बियाणे मिळणार नाही म्हणून खानदेशातील शेतकरी गुजरातेत जाऊन कापूस बियाण्यांची खरेदी करीत होते. यामुळे काळाबाजार व फसवणूक हे प्रकार याची शक्‍यता लक्षात घेता शासनाने कापूस बियाणे २५ मे पासून विक्री करण्याचे आदेश नुकतेच जिल्हा परिषदेतील कृषी विकास अधिकारी कार्यालयास प्रशासनाला दिले आहेत.

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.