कडकनाथ कोंबडी पालन – भाग २

0

घरच्याघरी कमी खर्चात संतुलित खाद्य तयार करण्याचा ठोकताळा

अनु.क्र खाद्य घटक प्रमाण

( टक्के)

सोयाबीन/शेंगदाणापेंड ३५
मका ५५
तेल ०३
मासळी ०५
क्षार मिश्रण ०२

 

कोंबड्यांना अंडी देण्यासाठी लाकडे किंवा पत्र्याचा वापर करून पिंजरा तयार करावा. एक पिंजरा तीन ते चार कोंबड्यांकरिता असावा. अंडीफूट टाळण्यासाठी शिंपला पावडर, स्टोन ग्रीट, चुनखडीडी.सी.पी पावडर ३ ते ४ ग्रम प्रती पक्षी प्रती दिन या प्रमाणात अंडी देण्याच्या काळात वापरावेत. कोंबड्यांना रात्री थांबण्यासाठी ,संरक्षणासाठी पावसापासून संरक्षणासाठी शेडची गरज असते. या शेडमध्ये प्रती पक्षी १.५ ते २.० फुट जागा असावी. वेळोवेळी या शेडची स्वच्छता करावी. कोंबड्यांना बसण्यासाठी तांदूळ भुसा, लाकूड भुसा, शेंगदाण्याची टरफले यांचा उपयोग करावा. शेड कोरडे राहील ह्याची काळजी घ्यावी.

कोंबड्यांचे परजीवींपासून संरक्षणासाठी प्रत्येक दोन तीन महिन्यांनी जंतू निर्मुलन करावे. ४ – ६ आठवडे वयाच्या पक्ष्यांना प्रतिबंधक उपाय म्हणून कोक्सिडीओस्टॅटची मात्रा द्यावी.

परसबागेतील कडकनाथ कोंबडी पालन करणारे व्यावसायिक पुढीलप्रमाणे लसीकरण करतात     

वय

( दिवस )

लसीचेनाव स्ट्रेन मात्रा देण्याचा मार्ग
एक दिवस मरेक्स आजार एच.व्ही.टी ०.२ मि.ली त्व्चेच्या खाली
७-१० दिवस राणीखेत एफ १ / बी१ १ थेंब नाकातून/ डोळ्यातून
१४ दिवस गंबोरो आयबीडी १ थेंब नाकातून / डोळ्यातून
२८ दिवस राणीखेत लासोटा बी १ / एफ१ पक्ष्यांच्या संख्येनुसार पिण्याच्यापाण्यात

 

कडकनाथ कोंबड्यांची घ्यावयाची काळजी

पहिल्या दोन आठवड्यांमध्ये कडकनाथ पिलांमध्ये तापमान नियंत्रणाची व्यवस्था हवी तेवढी विकसित व कार्यरत नसते. त्यामुळे पिल्लांना पहिल्या चार आठवड्यांमध्ये बृडींग करावे लागते. त्याकरिता कृत्रिम उष्णता निर्माण करण्यासाठी बल्ब, ऊष्ण कॉइल, लाकूड, धातूपासून बनविलेले बृडर यांचा वापर करता येतो. बृडींगची व्यवस्था पिंजऱ्यामध्ये किंवा जमिनीवरही करता येते. शेडमध्ये पिल्ले आणायच्या आधी शेड पूर्णतः स्वच्छ करून निर्जंतुक करावे. तसेच पाण्याची, खाद्याची भांडी निर्जंतुक करावीत.

पहिले तीन ते चार दिवस गादी साहित्य ( litter material )  / भुसा खाऊ नये म्हणून गादी साहित्याचा जमिनीवर २ ते ३ इंचाचा थर तयार करावा व त्यावर पेपर अंथरून त्यावर पिल्ले ठेवावीत. पिल्ले उष्णतेच्या स्त्रोताजवळ राहतील म्हणून चिकगार्डमध्ये ठेऊन खाद्य व पाण्याची भांडी एका आड एक ठेऊन खाद्य व पाण्याची सोय करावी. प्रती १०० पिलांसाठी ६० ते ७० से.मी. आकाराचेआडवे चिक फिडर ठेवावे किंवा २ ते ३ प्लास्टिक उभे ट्युब फिडर ठेवावेत. २ चिक वॉटरर ( पाण्याचे भांडे ) ठेवावेत. वयाच्या ४ ते ६ आठवड्यांपासून त्यांना बाहेर परसबागेत खड्याच्या शोधात सोडून द्यावे. पिलांना बाहेर सोडल्यानंतर पहिले काही दिवस रात्री शेड जवळ परत येण्यासाठी मदत करावी. पिलांचे भक्षक व हिंस्त्र पशुपासून संरक्षण करावे. शेड मध्ये आल्यानंतर त्यांना स्वयंपाक घरातील शिल्लक अन्नपदार्थ, शिल्लक खाद्य व भाजीपाला द्यावा.

पहिल्या ४ आठवड्यात चांगल्या शरीरवाढीसाठी व रोग प्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी संतुलित कोंबडी खाद्य बाजार पेठेत उपलब्ध असलेले द्यावे. त्यामध्ये प्रतिजैविके, कॉक्सियारोधक औषधी व जीवनसत्व असावेत. त्यानंतर तांदूळ, ज्वारी, मका,रागी, बाजरीया अति ऊर्जा स्त्रोतांचा व सोयाबीन, सुर्यफुल, शेंगदाणा पेंड या प्रथिनांच्या स्त्रोतांचा वापर करून कोंबड्यांसाठी खाद्य तयार करता येते. कोंबड्यांना बाहे सोडल्यानंतर अधिक पोषणतत्वांची गरज हि परसबागेत असणारा हिरवा चारा, टाकलेले/ पडलेले धान्य, किडे, किटक, गवत, बिया यांचे प्रमाणावरती अवलंबून असते.

कडकनाथ कोंबडी पालनातील संभाव्य आजारांचा धोका टाळण्यासाठी पुढीलप्रमाणे लसीकरण करणे उत्तम राहील.

अनु.क्र वय रोगाचे नाव लसीचे नाव मात्रा देण्याचा मार्ग
पहिला दिवस मरेक्स हारपेस अर्कीव्हायरस ०.२मि.ली त्वचेखाली
५ -७ दिवस राणीखेत लासोटा बी १ / एफ१ ०.३मि.ली डोळ्यातून
१२-१४ दिवस गंबोरो आयबीडी/ आयबीडी जॉर्ज

स्टॅंडर्ड

१ थेंब डोळ्यातून
२१ दिवस गंबोरो आयबीडी/ आयबीडी जॉर्ज

स्टॅंडर्ड

पक्ष्यांच्या

संख्येनुसार

पाण्यात
२८ दिवस राणीखेत लासोटा बी १ / एफ१ पक्ष्यांच्या

संख्येनुसार

पाण्यात
४२ दिवस राणीखेत एनडी किल्ड ०२५ मि.ली त्वचेखाली
७वा आठवडा देवी फाऊल फॅक्स ०.५मि.ली त्वचेखाली
१४वा आठवडा देवी फाऊल फॅक्स ०.५मि.ली त्वचेखाली
१८वा आठवडा राणीखेत एनडी किल्ड ०.५मि.ली त्वचेखाली
१० ३५वा आठवडा राणीखेत एनडी किल्ड ०.५ मि.ली त्वचेखाली

कडकनाथ कोंबड्यांच्या सरासरी किंमती ( भागानुसार वेगवेगळ्या असू शकतात )

१) उबवणुकीसाठी असणारे अंडे :- रु. ३० ते ७५ प्रती अंडे

२) पिलू :- रु.६५ ते १५० प्रती पिलू

३) मोठी कोंबडी :- रु. ७५०ते १५०० प्रती पक्षी

कडकनाथ कोंबडी पालन – भाग १

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.