कपिल आकात यांचे आवाहन
परतूर / प्रतिनिधी
सध्या निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची सर्वाधिक झळ शेतकर्यांना बसत आहे. ही बाब लक्षात घेऊन पत्रकारांनी आपल्या वर्तमानपत्रात दुष्काळी परिस्थिती आणि शेतकर्यांचे प्रश्न प्राधान्याने मांडावेत, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती कपिल आकात यांनी केले.
दर्पण दिनानिमित्त आयोजित पत्रकारांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. बाबासाहेब आकात पतसंस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक विजय राखे, व्यवस्थापक शिवाजीराव ढगे यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती. आकात पुढे म्हणाले की, परतूर-मंठा तालुक्यासह संपूर्ण जालना जिल्ह्यात सध्या भयावह दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांनी दुष्काळी परिस्थिती आणि शेतकर्यांना भेडसावणारे विविध प्रश्न आपल्या लेखणीतून मांडण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
आकात पतसंस्थेची दिनदर्शिका आणि लेखनी भेट देऊन सर्व पत्रकारांचा यथोचित सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक विजय राखे यांनी केले. यावेळी पत्रकार एम. एल. कुरेशी, अजय देसाई, शेषराव वायाळ, बालाजी ढोबळे, सर्फराज नायकवडी आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन व आभार योगेश बरीदे यांनी केले. स्व. बाबासाहेब भाऊ आकात हे दरवर्षी 6 जानेवारी रोजी दर्पण दिनानिमित्त पत्रकारांच्या सत्काराचा पहिला कार्यक्रम घ्यायचे. ही परंपरा अनेक वर्ष अविरतपणे सुरू होती. बाबासाहेब भाऊ आकात यांच्या अकाली निधनानंतर त्यांचे चिरंजीव कपिल आकात यांनी ही परंपरा सुरू ठेवली आहे.
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल