• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 21, 2021
  • Login
Krushi Samrat
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
Krushi Samrat
No Result
View All Result
Home शेती

राज्यातील जमिनी नापीकी होण्याची प्रमुख कारणे

जमिनीची नापीकी

Team Krushi Samrat by Team Krushi Samrat
May 29, 2019
in शेती
0
राज्यातील जमिनी नापीकी होण्याची प्रमुख कारणे
Share on FacebookShare on WhatsApp
  • रासायनिक खते व कीटनाशके यांचा अतिरेकी वापर करण्यामुळे
  • पाण्याचा अतिरिक्त वापर
  • सेंद्रिय खतांचा अभाव
  • पिकांची फेरपालट न करणे
  • जास्त उत्पादन देणाऱ्या पिकांच्या वाणांचा वाढता वापर

भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारताची अर्थव्यवस्था ही कृषी क्षेत्रावर आधारित आहे. साहजिकच भारतीय समाज जीवनात शेतीला पर्यायाने शेतकऱ्यांना अनन्यसाधारण महत्व आहे. भारतात कृषी संस्कृती ही पारंपारिक असली तरी स्वातंत्र्यानंतर झालेल्या हरितक्रांतीमुळे भारतात आधुनिक शेतीला खऱ्या अर्थाने चालना मिळाली.सातत्याने वाढत जाणाऱ्या लोकसंख्येची भूक आपल्याला मर्यादित शेती क्षेत्रातूनच भागवावी लागेल. जमिनीच्या आरोग्याबाबत शेतकऱ्यांमध्ये व्यापक प्रबोधन हवे. त्याकरिता कृषी विभाग, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे याद्वारे प्रशिक्षण कार्यक्रमांवर भर द्यावा लागेल.अलीकडे बदलत्या हवामानात पिकांचे उत्पादन आणि उत्पादकता शेतकऱ्यांच्या हाती राहिली नाही. त्यातच त्यांच्या पायाखालून हळूहळू जमीनही सरकत चालली आहे, ही बाब अतिगंभीर म्हणावी लागेल.

पिकांच्या उत्पादनासाठी जमिनीतून अन्नद्रव्यांची उचल होते. जमिनीत अन्नद्रव्यांचे कमी होणारे प्रमाण भरून काढण्याकरिता योग्य खते आणि अन्नद्रव्यातील समतोलता साधणे महत्त्वाचे असते. मात्र याचा आपल्याला विसरच पडलेला दिसतो. एकीकडे संकरित व सुधारित वाणांच्या लागवडीमुळे प्राथमिक, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची उचल वाढली, तर दुसरीकडे वर्षानुवर्षे एक पीक पद्धतीचा अवलंब, अमर्याद पाण्याचा वापर, शेणखताचा अपुरा पुरवठा, सेंद्रिय कर्बाचे जमिनीतील कमी होत असलेले प्रमाण, रासायनिक खतांचा असंतुलित वापर, जैविक आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये वापराचा अभाव आदी कारणांमुळे जमिनीची सुपीकता आणि उत्पादकताही कमी होत आहे. त्यापुढीलही टप्पा म्हणजे जमिनीचे आरोग्य बिघडत चालले आहे.

प्राथमिक, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचा संतुलित वापर हा पिकांची उत्पादकता आणि गुणवता वाढीबरोबर एकमेकांस पूरक ठरतो. शिवाय जमिनीचे आरोग्यही टिकून राहते. नत्र, स्फुरद, पालाश या प्राथमिक अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढीसाठी जस्त आवश्‍यक आहे.

स्फुरद जास्त झाले, तर जस्त आणि लोह ही सूक्ष्म अन्नद्रव्ये जमिनीत असूनही ती पिकांना उपलब्ध होत नाहीत. याकरिता भविष्यात सर्व शेतकऱ्यांकडून माती परीक्षण अहवालानुसारच रासायनिक, सेंद्रिय, जैविक खतांचा संतुलित वापर व्हायला हवा. शेतकऱ्यांना जमिनीची आरोग्य पत्रिका देण्याकरिता शासन स्तरावर जमिनीचे नमुने घेऊन तपासणी चालू आहे.

 

यातील त्रुटी दूर करून या कामास गती मिळायला हवी. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात त्याच्या जमिनीची आरोग्य पत्रिका असायला हवी. जमिनीच्या प्रकारानुसार पीक पद्धतीची शिफारस तज्ज्ञांकडून व्हायला हवी आणि पिकांच्या गरजेनुसारच संतुलित खतांचा वापर होईल ही काळजी सर्वांनी घ्यायला हवी. भविष्यात जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी हे गरजेचेच आहे. अनेक प्रगत देश पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी जमिनीची सुपीकता वाढविण्यावर भर देत आहेत. आपण किमान जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवण्याकरिता तरी प्रयत्न वाढवायला हवेत.

 

शेती व्यवसायामध्ये सुपिक जमिनीस अत्यंत महत्व आहे. म्हणून शेतकऱ्याने आपल्या जमिनी विषयीची सखोल माहिती करून घेणे अत्यावश्यक आहे. आपली जमिन कशी आहे, पाणी कसे आहे त्यानुसार कोणते पीक घेतले पाहिजे. त्या पिकास कोणत्या अन्नद्रव्यांची केंव्हा आणि किती प्रमाणात गरज आहे. जमिनीत किती प्रमाणात अन्नघटक उपलब्ध आहेत. भरपाई कोणत्या खतामधून भागविता येईल याचा विचार करतांना जमिनीचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे. त्याचाही विचार करणे आवश्यक आहे. यशस्वी शेतीचे रहस्य प्रामुख्याने जमिनीतून भरघोस पीक घेणे तसेच जमिनीची उत्पादनक्षमता कायम टिकवून ठेवणे हे आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतजमिनीची आरोग्यापत्रिका तयार करून घेतली पाहिजे. आपले आरोग्य दीर्घकाळ, निरोगी राहण्यासाठी नियमितपणे डॉक्टरांकडे सर्व चाचण्या करून त्याप्रमाणे शरीर सुदृढ ठेवतो, तसेच नियमित माती पाणी परिक्षण ही नियोजनबद्ध, किफायतशीर शेतीची गुरुकिल्ली आहे.

आधुनिक शेतीमध्ये अधिक भांडवल गुंतवावे लागत असल्याने या ठिकाणी माती व पाणी परीक्षणाचे महत्व अन्यन्य साधारण झालेले आहे. माती परिक्षणावर आधारित खत व्यवस्थापन केल्याने खतांच्या मात्रेत बचत तर होतेच त्याचबरोबर प्रमाणशीर खतांची मात्रा देता येते. त्यामुळे जमिनीची सुपिकता वाढविता येते. तसेच जमिनीचे आरोग्य चिरकाल टिकविण्यासाठी सुध्दा मदत होते. जमिनीचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मांचे संवर्धन करावे लागते. शाश्वत शेतीमध्ये पिकांचे फायदेशीर उत्पादन घेऊन सेंद्रिय व रासायनिक खतांचा संतुलित वापर करून जमिनीची सुपिकता टिकविली जाते. ही जमिनीची सुपिकता आजमिविण्यासाठी मातीची तपासणी करणे आवश्यक आहे.

जमिनीत जास्तीत जास्त रासायनिक घटक हे रासायनिक उद्योगांप्रमाणे शेतीसाठी वापरले जातात. जास्त उत्पादन मिळविण्यासाठी शेतकरी हा रासायनिक खते, कीटकणाशके व इतर टाकाऊ पदार्थ जमिनीत मिसळतो त्यामुळे जमिनीचा कस कमी होतो. ती नापीक बनते तसेच जमिनीत शेतीसाठी उपयुक्त असलेल्या सूक्ष्म जीवजंतूंचा नाश होतो. कीटकणाशके ही जमिनीवरून पाण्यात प्रवेश करतात. शेतीतील पिकांमध्ये मिसळतात त्यामुळे शेतीच्या उत्पादनातही रासायनिक अंश मिसळतात. अन्नाद्वारे ते मानवी शरीरात प्रवेश करतात. म्हणजेच शेतीतील रासायनिक द्रव्य पिकांमध्ये उतरतात. कोणत्याही पिकच्या वाढीसाठी नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियम हे तीन महत्वाचे आहे. जगात सर्वच देशांमध्ये रासायनिक खतांचा वापर जास्त केला जातो. कोणत्याही पिकांच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर जास्त केला जातो. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे मृदा नापीक होते. मातीतील पिकांना आवश्यक उपयुक्त जीवजंतु मरून जातात. शेतीतील पिकांना पाणी देताना पिकांसाठी वापरलेली विषारी रासायनिक द्रव्य पावसाच्या पाण्यात मिसळून उतरणे वाहून जातात. व नद्या ओढे, तलाव यांना जाऊन मिळतात त्यामुळे पाणी प्रदूषित होते. भारतात ऊसाच्या पिकाला अति पाणी व अतिरसायनिक खते वापरल्याणे त्या जमिनी नापीक व चोपड बनत चालल्या आहे. कीटकनाशकातील टाकाऊ घटकांमध्ये हायड्रोजन सल्फाइड व सल्फरडाय ओक्साईड हे वायु तयार होऊन जमिनीतून दुर्गंधी येते.

टिकवा जमिनीची सुपीकता.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Tags: Krushi SamratThe main reasons for land breeding in the stateकृषी सम्राटराज्यातील जमिनी नापीकी होण्याची प्रमुख कारणे
Team Krushi Samrat

Team Krushi Samrat

Related Posts

जायद सीजन में भिंडी की खेती 
शेती

जायद सीजन में भिंडी की खेती 

March 12, 2021
लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020

About us

Krushi Samrat

कृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अवजारे
  • आयुर्वेदिक नुस्खे
  • कायदा
  • कृषीसम्राट सल्ला
  • तंत्रज्ञान
  • प्रेरणा
  • प्रेरणादायक गोष्टी
  • बातम्या
  • यशोगाथा
  • व्हिडिओ
  • शासकीय योजना
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • हवामान
  • हिन्दी

Recent News

जायद सीजन में भिंडी की खेती 

जायद सीजन में भिंडी की खेती 

March 12, 2021
उत्पादन में होगा इजाफा – भूमि की तैयारी के लिए करें इन 6 कृषि यंत्रोंसे

उत्पादन में होगा इजाफा – भूमि की तैयारी के लिए करें इन 6 कृषि यंत्रोंसे

March 12, 2021
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In