सिंचन पाण्याची प्रत तपासणी

1

सिंचनासाठी पाणी वापरण्यापूर्वी ज्या पाण्याचे पृथ:करण करावयाचे आहे, त्या पाण्याचे साधारणत: 1 ते 2 लिटर पाणी स्वच्छ बाटलीमध्ये घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवावे.
जर वाहत्या पाण्याचा नमुना घ्यायचा असेल ( नदी,ओढा,कालवा ) तर मध्यभागातून घ्यावा. जर नळ किंवा नळी ( पाईप ) मधुन पाण्याचा नमुना घ्यावयाचा असेल तर पहिल्यांदा त्यामधून काही वेळ पाणी बाहेर पडू द्यावे व नंतर नमुना घ्यावा.
विहिरीतून पाण्याचा नमुना घेतांना बाटली पाण्यामध्ये पूर्ण बुडेपर्यंत नेऊन नंतर पाण्याखाली त्याचे बुच काढुन नमुना घ्यावा.
प्रयोगशाळेमध्ये खालील गोष्टींचे पृथ:करण करण्यात येते.
सामू (पी.एच.) PH
विरघळणारे क्षार
कार्बोनेट व बायकार्बोनेट
क्लोराईड
कॅल्शियम
सोडियम
मॅग्नेशियम
नायट्रेट
सल्फेट
बोराॅन

पाण्याची प्रत ठरविताना खालील चार गोष्टी लक्षात घेतात –
बायकार्बोनेटचे प्रमाण ( एच.सी.ओ.3 )
पाण्यामधील मीठ व इतर क्षार ( एस.ए.आर )
एकुण विरघळणारे क्षार ( ई.सी.)
पाण्यामधील बोराॅन व इतर विषारी मूलद्रव्ये (बी.)

या सर्व गोष्टींच्या प्रमाणानुसार पाण्याचे तीन प्रकार केले जातात.
सर्वात चांगले पाणी – हे पाणी कोणत्याही परिस्थीमध्ये व कोणत्याही पिकास वापरण्यास हरकत नाही.
उदाहरणार्थ – कमी प्रतिकारशक्तीच्या पिकांसाठी म्हणजेच हरभरा, द्राक्षे, संत्री, मोसंबी,टोमॅटो,इत्यादी…..
चांगले पण हानिकारक पाणी – ज्या पिकांना क्षार प्रतिकारक शक्ती नाही त्या पिकांना हे पाणी हानी कारक असते.
उदाहरणार्थ – मध्यम प्रतिकारक शक्तीच्या पिकांसाठी भात,ज्वारी,मका,सुर्यफुल, लसूणघास,
बरसीम,करडई, कांदा, गाजर, गहू, बाजरी, गवत इत्यादी…..

3) सर्व पिकांना हानिकारक पाणी – क्षार प्रतिकारक पिके घेऊ शकतात. मात्र इतर सर्व पिकांना ते
हानिकारक असते.
उदाहरणार्थ – बार्ली, शुगर, बीट, कापूस, खजूर, ऱ्होडस, गवत,गहू, इत्यादी…..

पाण्याच्या नमुन्याची तपासणी झाल्यानंतर त्यानुसार पिके निवडावीत. पाण्याचा प्रकार बदलविल्यास अनेक उपाय आहेत ते म्हणजे जमिनीत व पाण्यात जिप्सम मिसळणे, तसेच कृत्रिम रितीने पाण्याचा निचरा करणे,किंवा जमिनीवर भरपुर पाणी साठवून त्यामधील क्षार खाली आणणे. त्याबरोबरच अशा जमिनीमध्ये ताग, धेंचा इ. पिके घेऊन जमिनीची प्रत देखील सुधारता येते.

 

 

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर

जाऊन फॉर्म भरा. https://whatsapp.heeraagro.com

 

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.
1 Comment
  1. Anonymous says

    5

Leave A Reply

Your email address will not be published.