मक्यावर प्रक्रिया करून विविध प्रकारची औद्योगिक उत्पादने बनवली जातात. त्यासाठी प्रामुख्याने दोन प्रकारची प्रक्रिया केली जाते. कोरडी प्रकिया आणि ओली प्रक्रिया.
१) कोरडी प्रक्रिया :
मका धन्यावर कोरडी प्रक्रिया प्रामुख्याने दोन प्रकारे केली जाते.
अ) अंकुरविरहीत प्रक्रिया आणि ब) अंकुरसहीत प्रक्रिया
अंकुरविरहीत प्रक्रियेमध्ये मक्यावर करण्यात येणाऱ्या पुढील प्रक्रियेपूर्वी त्यामधील अंकुर बाजूला काढला जातो आणि उरलेल्या भागापासून कणी, रवा, पीठ, पोहे, पशुखाद्य इ. बनविले जाते. अंकुर आधीच बाहेर काढलेमुळे यातील तेलाचे प्रमाण कमी होऊन हे पदार्थ जास्त दिवस टिकतात. स्वतंत्र केलेल्या अंकुरापासून उत्तम प्रतिचे तेल पुन्हा प्रक्रिया करून काढले जाते. अंकुरसहित प्रक्रीयेमध्ये मक्यातील अंकुर बाजूला न काढता तो भरडला जातो आणि त्यापासून तेलमुक्त पीठ आणि पशुपक्षी खाद्य तयार केले जाते. परंतु यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असल्याने हे पीठ जास्त दिवस टिकत नाही.
2) ओली प्रक्रिया :
मका धान्यावर ओली प्रक्रिया करून त्यापासून स्टार्च, साखर आणि तेल काढले जाते. या उद्योगांची सुरुवात १८४९ पासून झाली. अलीकडच्या काळामध्ये या उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे मका धान्यास सतत मागणी वाढत आहे. याचा परिणाम म्हणून मक्याला पूर्वीपेक्षा चांगला भाव मिळू लागला आहे. ओल्या प्रक्रीयेमध्ये मका स्वच्छ करून तो २४ ते ३६ तास ५०० से. तापमानाच्या ०.१ ते ०.२ टक्के सल्फर डाय ऑक्साईड मिश्रित पाण्यामध्ये भिजवला जातो. सल्फर डाय ऑक्साईडमुळे मका फुगून मऊ होतो. असा मकानंतर भरडून ( मिलिंग ) त्यामधून अंकुर बाजूला काढले जातात. हे अंकुर वाळवून त्यावर पुन्हा प्रक्रिया करून त्यापासून कच्चे तेल काढले जाते. हे तेल नंतर रिफाइंड करून उत्तम प्रतिचे खाद्य तेल तयार होते. तेल काढल्यानंतर राहिलेला भाग पेंड म्हणून वापरला जातो. ओल्या प्रक्रियेतून स्टार्च, तेल आणि प्रथिने प्रामुख्याने वेगळी केली जातात आणि त्यांचा विविध उत्पादनामध्ये वापर केला जातो. या प्रक्रियेत सर्वसाधारण ६६ ते ६८ टक्के स्टार्च उत्पादन होते. पेंड प्रक्रियेसाठी वापरलेले पाणी आणि तंतुमय पदार्थ एकत्र करून ग्लुटेन फीड ( पशुपक्षीखाद्य ) तयार केले जाते. यामध्ये २१ टक्के प्रथिने असतात शिवाय मक्यामध्ये असणारे क्झांथोफील नावाचे पिवळ्या रंगाचे द्रव्य ह्या ग्लुटेन खाद्यामध्ये मोठ्या प्रमाणात असते. अशा प्रकारचे खाद्य कोंबड्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. कारण ह्या द्रव्यामध्ये कोंबड्याच्या अंड्याचा बलक आणि कातडीस उपयुक्त असणारा पिवळा रंग प्राप्त होतो. पिवळ्या रंगाच्या मक्यामध्ये हे प्रमाण जास्त असते म्हणून मका आधारीत कारखाने पिवळा मका प्रामुख्याने वापरतात.
येथे आम्ही वरील मुद्द्याची थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. भविष्यात अश्याच प्रकारच्या विविध माहिती याच वेगवेगळ्या मार्गाने आम्ही आपल्याला देणार आहोत तरी तुम्ही आमच्याशी जुळू शकतात.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
http://whatsapp.heeraagro.com/
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!