भारतातील सर्वात मोठा मत्स्यबीज बाजार
आपणांस आम्ही जी माहिती देणार आहोत ती म्हणजे देशातील सर्वात मोठा मत्स्यबीज बाजार याबद्दल.
मत्स्यशेतीमध्ये मत्स्यबीजाला फार महत्त्व आहे. मत्स्यशेतीचे संपूर्ण अर्थकारण या मत्स्यबीजावरच अवलंबून असते. कारण आपण जे मत्स्यबीज तलावात सोडतो त्यांच्या गुणवत्तेवरच ठरतं की त्या मत्स्यबीजाची वाढ कशी होईल, त्याची प्रतिकारक क्षमता किती आहे, जर या सर्व गोष्टी योग्य असतील तर आपले उत्पादन वाढून चांगला फायदा होतो.
आज आपणांस आम्ही माहिती देणार आहोत मत्स्यबीज बाजारपेठ :
हा बाजार जवळपास 40 वर्षापूर्वी सुरु झाला. या बाजाराचे नाव “राजेंद्र मत्स्यबीज बाजार” असे असून हा बाजार “पश्चिम बंगालमधील नैहाटी” मध्ये भरतो. या बाजाराचे अजून एक वैशिष्ट्ये असे आहे कि, हा बाजार 2 वाजता सुरु होतो आणि 5 वाजेपर्यंत संपतो. पण या 3 तासांमध्ये दररोज तेथे 3 ते 5 करोड रुपयांचा मत्स्यबीजांचा व्यवसाय होतो. ह्याच बाजारामधून संपूर्ण देशामध्ये मत्स्यबीजाचा जास्तीत जास्त पुरवठा होतो. बाजारामध्ये मत्स्यबीजाचे व्यवहार मोठमोठ्या भांड्यांमध्ये होतात. व व्यापारी मात्र ते मस्त्यबीज इतर ठिकाणी पाठवण्यासाठी त्याची वेगळी Packing करतो. ह्या बाजारातील मत्स्यबीज देशातील बाजारपेठेत सर्वात चांगल मानलं जाते. या व्यवसायामुळे नैहाटी बाजारपेठेत एक नवीन रोजगार उपलब्ध झाला. भारतीय कार्प (कटला, रोहू, मृगळ) या प्रकारच्या जातीचे मत्स्यबीज तेथे मिळते. हा बाजार मत्स्यबीजांच्या व्यापारामध्ये प्रसिद्ध आहे. पण शेतकऱ्यांमध्ये तितकासा प्रसिध्द नाही. म्हणूनच आम्ही आपल्याला ही माहिती देत आहोत कारण या बाजारामध्ये जे मत्स्यबीज मिळते त्याची गुणवत्ता चांगली आहे. तसेच बाजारपेठेपेक्षा कमीतकमी किंमतीत मासे उपलब्ध होतील. याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल कारण किंमती मध्ये 4 ते 5 पट फरक पडतो. आपल्याकडील शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योग करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादीं ची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
https://whatsapp.heeraagro.com
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!
4.5