ठिबक सिंचनाद्वारे बागायती पिकांसाठी विद्राव्य खते देण्याच्या सुधारीत पध्दती

0

ठिबक सिंचनाद्वारे खते देताना प्रमाणबद्ध आणि मात्राबद्ध पद्धतीने देता येतात. पिकांना खात पुरवठा ही केवळ अनुभवसिध्द किंवा सखोल शास्त्रीय प्रयोगाच्या सहाय्याने वापरता येते. प्रमाणबद्ध पद्धतीमध्ये खत देण्याची तीव्रता खत देण्याच्या संपूर्ण कालावधीमध्ये स्थिर राहते. उदा. एक लिटर खत द्रावण आणि 100 लिटर पाणी या पद्धतीमध्ये खतमात्रा तीव्रतेच्या स्वरूपात म्हणजेच “पीपीएम” मध्ये मोजली जाते. मात्राबद्ध पद्धतीमध्ये खताची तीव्रता बदलत राहते. ठिबक सिंचनाद्वारे खत मिश्रित व खत विरहित पाणी पिकाच्या मुळांशी सतत दिले जाते. या पद्धतीमध्ये खतमात्रा कि. ग्रॅम/हेक्‍टर या स्वरूपात मोजली जाते. सखोल शास्त्रीय पद्धतीत मात्र पिकांची अन्नद्रव्यांची गरज व जमिनीचा कस यासारख्या घटकांचा विचार केला जातो.

पिकांची अन्नद्रव्यांची गरज व पुरवठा:-

पिकांना अन्नद्रव्यांची गरज, अन्नद्रव्ये पुरवठा करण्याची ताकद, विविध सिंचन पद्धती जमिनीतून खते उचलण्याची पिकांची कार्यक्षमता व अपेक्षित उत्पादन यासारख्या महत्वाच्या घटकांवर पिकांना देण्यात येणाऱ्या अन्नद्रव्य खतांचा नियंत्रित दर जास्तीत जास्त प्रमाणात अवलंबून असतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन प्रत्येक पिकांसाठी विविध जमिनीत खताच्या शिफारशी करणे गरजेचे असते. ज्यावेळी पिकांच्या योग्य वाढीसाठी लागणाऱ्या अन्नद्रव्यांचा पुरवठा जमिनिद्वारे होत नाही त्यावेळी गरज असलेल्या अन्नद्रव्यांची पिकांची मागणी पूर्ण करण्यासाठी नियंत्रित खत पिकला पुरवणे गरजेचे असते.

जमिनीतील अन्नद्रव्यांची पिकाद्वारे होणारी उचल :-

पिकाला देण्याची अन्नद्रव्यांची पुरेशी मात्रा ठरविण्यासाठी पिकाने जमिनिद्वारे केलेली अन्नद्रव्यांची उचल या तत्वाचा वापर करणे नेहमीच फायदेशीर ठरते. पिकाने उचललेल्या अन्नद्रव्याचा वापर वनस्पतीजन्य वाढीसाठी व फलधारणा होण्यासाठी प्रामुख्याने केला जातो.

ठिंबक सिंचनाद्वारे पाणी आणि खतांच्या वापराची कार्यक्षमता वाढविण्यासाठी विद्राव्य खतांचा वापर करणे अधिक फायद्याचे आहे. विद्राव्य खते उपलब्ध होत नसल्यास पारंपरिक खतापैकी युरिया, पांढरा पोटॅश किंवा चांगल्या प्रतीचा म्युरेट ऑफ पोटॅश पाण्यात संपूर्ण विरघळत असल्यामुळे ठिबक सिंचनातून द्यावा. पिकांना खताची मात्रा ठरविण्यापूर्वी जमिनीचे माती परीक्षण करणे गरजेचे असते. जमिनीचा सामू विद्युत वाहकता तसेच जमिनीमध्ये उपलब्ध नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांचे प्रमाण लक्षात घ्यावे व त्यानुसार विद्रव्य खताची मात्रा ठरवणे आवश्यक असते.

ठिबक सिंचनाद्वारे खतांची मात्रा अनेक वेळा विभागून देता येते. खते एक दिवसाआड देणे शक्य नसल्यास आठवड्यातून/पंधरवड्यातून एकदा द्यावीत. यामुळे खताची वापर कार्यक्षमता वाढून उत्तम व दर्जेदार उत्पादन मिळण्यास मदत होते.

 

जमिनीतून मिळणारी अन्नद्रव्ये :-

  1. ९:१९:११ : यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश ही अन्नद्रव्ये समप्रमाणात आहेत. या ग्रेडला स्टार्टर ग्रेड असेही म्हणतात. यातील नत्र ह्या अमाईड, अमोनिकल व नायट्रेट या तिनही स्वरूपात असतो. प्रामुख्याने पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत शाखीय वाढीसाठी या ग्रेडचा उपयोग होती. पीक संरक्षणासाठीं वापरता येते.

 

  1. १२:६१:०:यामध्ये अमोनिकल नत्र कमी असून पाण्यात विरघळणा-या स्फुरदाचे प्रमाण जास्त असते. नवीन मुळांच्या तसेच फळफांद्याच्या वाढीसाठी या खताचा उपयोग होतो, याला मोनो अमोनियम फॉस्फेट म्हणतात. कॅल्शियमयुक्त खते वगळता सर्व विद्राव्य खतांबरोबर मिसळून वापरता येते. नवीन मुळांच्या जोमदार वाढीसाठी तसेच फुलांच्या पूर्ण वाढीसाठी व तुरे येताना उपयुक्त असते.

 

  1. ०:५२:३४ : फुले लागण्यापूर्वी आणि लागल्यानंतरच्या काळात हे खत उपयुक्त आहे. फळांची योग्य प्रकृती आणि रंगासाठी हे खत वापरले जाते. या खितास मोनोपोटॅशियम फॉस्फेट म्हणतात. पाण्यात १oटक्के विद्राव्य खतामध्ये ५२ टक्के स्फुरद व ३४ टक्के पालाश आहे.

 

  1. १३:०:४५ : या खतास पोटॅशियम नायट्रेट म्हणतात. यात नत्राचे प्रमाण कमी व विद्रव्य पालाशचे प्रमाण जास्त असते. पीक/फळ प्रकृती अवस्थेत या खताची आवश्यकता असते. फळधारणा व त्याची वाढ होत असताना फवारावे. यामुळे फळांचा आकार व त्यातील साखरेचे प्रमाण वाढते. हे खत जड धातू व क्लोराईड्स विरहित आहे.

 

ठिबक सिंचन संचाची उभारणी व घटक

ठिबक सिंचन संच उभारणीपूर्वी जमिनीची पूर्वमशागत करावी. उभी/आडवी नांगरट व वखराच्या पाळयाव्दारे जमिन भुसभुसीत करावी. भुसभुसीत जमिनीत ठिबक सिंचनाचे पाणी योग्यरितीने पसरते. पिकाच्या लागवडीच्या अंतरानुसार ठिबक सिंचन संचाचा आराखडा व उभारणी करावी. ठिबक सिंचन संचाची निवड करतांना तडजोड करु नये. संचामध्ये नळयाव्यतिरिक्त फिल्टर, खते देण्याची यंत्रणा व प्रेशर गेज हे महत्वाचे घटक जरुर जोडावेत. ओळीतील प्रत्येक झाडाला पाणी देण्यासाठी ठिबक तोटीचा वापर केला जातो. ठिंबक तोट्या दोन प्रकारच्या असतात. (इनलाइन व ऑनलाइन) सर्व कमी अंतराच्या पिकांसाठी इनलाइन ठिंबक नळया वापरल्या जातात. इनलाइन नळ्यावर १g ते ७५ सें.मी. इतक्या अंतरावर तोट्या बसविलेल्या असतात. गरजेनुसार नळ्या/लॅटरल (तोट्यासह)ची मागणी विक्रेत्याकडे संच बसविण्यापूर्वीच करावी लागते. म्हणजे त्या सहज उपलब्ध होवू शकतात. ऑनलाइन तोट्या या साध्या लॅटरलवर छिद्रे करून बाहेरून बसविल्या जातात. ऑनलाइन तोट्या पाहिजे त्या अंतरावर बसविता येतात. दोन तोट्यामधील अंतर पिकाच्या व जमिनीच्या प्रकारानुसार निवडावे, पिकाच्या ओळीतील व दोन झाडातील अंतर आणि लागवड पध्दत यानुसार तोट्यामधील अंतर ठरविता येते.

पाण्यातून वाळूचे, मातीचे व रेतीचे कण येत असल्यास हे कण संचात जावून ठिबक तोट्या बंद पडू शकतात. जुन्या बोअरवेल किंवा नवीन खोदलेल्या विहिरीतील पाण्याद्वारे असे कण येत असतात. यासाठी हायड्रोसायक्लॉन फिल्टर वापरावा.

ठिबक सिंचनाद्वारे खते देण्याची यंत्रणा

खताची टाकी (फर्टिलायझर टॅंक)

यामध्ये एक स्टीलची/ लोखंडी टाकी फिल्टरच्या पुर्वी (इनलेटला) जोडलेली असते. या टाकीचे कार्य व रचना सोपी असते. या टाकीमध्ये खताचे द्रावण किंवा विद्राव्य खते ठिबक सिंचनामधून पाण्याबरोबर दिली जातात. खताच्या टाकीची क्षमता ६० लिटरपासून १oo लिटरपर्यंत असते. फक्त टाकीमधील पाणी उलट प्रवाहाच्या दिशेने विहीर, तलाव, नदी इ. पाण्याच्या स्रोतामध्ये मिसळू नये, यासाठी वितरण नळीवर नॉन रिटर्न व्हॉल्व्ह (झडप) बसविणे आवश्यक आहे. फर्टिलायझर टॅंकद्वारे खते देण्याची पध्दत सर्वात सोपी असली तरी त्यामुळे सर्व झाडांना समप्रमाणात खते दिली जात नाहीत.

व्हेन्च्युरी :

व्हेन्च्युरीच्या सहाय्याने खते देणे ही सर्वात योग्य, कार्यक्षम, लहान, खात्रीशीर व सोपी पध्दत. व्हेन्चूरी हे अत्यंत सोपे व योग्य साधन असून सर्वसाधारण शेतक-यांना परवडण्यासारखे आहे. याचा उपयोग खते देण्यासाठी व आम्ल व क्लोरीन प्रक्रिया करण्यासाठीही केला जातो. व्हेन्चूरी ही फिल्टरच्या पुर्वी बसवून यामध्ये पाणी देण्याच्या मुख्य पाईपला व्हेन्चूरी जोडली जाते. खतमिश्रीत पाण्यात व्हेन्चूरीचे एक टोक सोडून दुसरे टोक मुख्य पाईपला जोडतात. मुख्य पाईपवरील व्हॉल्वच्या सहाय्याने दोन्ही बाजूने पाण्याच्या दाबामध्ये फरक निर्माण केला जातो.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.