औषधी वनस्पती ओळख

1

   फार  पूर्वीपासून मनुष्य आपल्या शरीर स्वास्थ्य टिकवण्यासाठी, रोग किंवा अनेक व्याधींपासून मुक्त होण्याकरीता अन्न, वस्त्र, निवारा अशा मुलभूत गरजांबरोबर वनस्पतींचा औषधी म्हणून उपयोग करत आलेला आहे. फार पूर्वीपासून भारतामध्ये आदिवासींच्या औषधींच्या पद्धतीमध्ये वनस्पतींचा वापर होत आलेला आहे, तसेच अनेक प्रचलित आयुर्वेद, युनानी, सिद्धा इ. औषधींच्या पद्धतीमध्ये वापर करण्यात आलेला आहे. भारतात औषधी वनस्पतींच्या पद्धतीमध्ये ६००० एवढ्या निरनिराळ्या प्रजातींची नोंद ठेवलेली आहे. मानव-वनस्पती संबंधित शास्त्राच्या संशोधनामुळे दिवसेंदिवस औषधी वनस्पतींच्या यादीत वाढ होत आहे.

सेंद्रिय पद्धतीने औषधी वनस्पतींची लागवड :

वनौषधी ह्या औषधासाठी पिकविल्या जात असल्याने त्या रासायनिक खते, कीडनाशके याशिवाय तयार करणे आवश्यक आहे. सेंद्रिय शेती करण्याचे फायदे अनेक आहेत. सेंद्रिय शेती केल्यामुळे जमिनीची धूप कमी होते, जमिनीच्या जलसंधारण क्षमतेत वाढ होते,

 • औषधी वनस्पतीची लागवड या घटक योजनेअंतर्गत समूह पद्धतीने औषधी वनस्पतींची लागवडीस प्रोत्साहन देण्यात येत आहे. औषधी वनस्पतींच्या लागवडीकरिता प्रजातीनिहाय प्रकल्प खर्चाच्या २० टक्के, ५० टक्के व ७५ टक्के एवढे वित्तीय साह्य देय आहे.
 • औषधी वनस्पती पिकांची लागवड प्राधान्याने समूह पद्धतीने करण्यात यावी. समूह निश्चिअती करण्याकरिता औषधी वनस्पती पिकांचे किमान दोन हेक्टार क्षेत्र असावे. यामध्ये साधारणपणे कमीत कमी पाच शेतकऱ्यांचा व जास्तीत जास्त तीन गावांचा समावेश असावा.
 • वैयक्तिक शेतकरी सदर घटक योजनेचा लाभ घेऊ इच्छित असल्यास त्याचे लागवडीसाठीचे प्रस्तावित क्षेत्र कमीत कमी ०.२० हेक्टतर असणे आवश्यवक आहे. समूह हा शक्यधतो औषधी वनस्पती प्रजातीनिहाय असावा. प्रजातीनिहाय समूह शक्य् नसल्यास २ ते ३ प्रजातींचा समावेश असलेल्या एकत्रित लागवडीचा समूह करावा व त्याचे क्षेत्र सलग असावे.

 

औषधी वनस्पती लागवडीसाठी जमिनीची निवड :

जमीन, हवामान आणि पीक व्यवस्थापन यावर झाडांची वाढ अवलंबून असते.  औषधी वनस्पतीची योग्य जमीन, हवामान व व्यवस्थापन यातील आवश्यक तो बदल करून लागवड केली तर ती किफायतशीर होते. जमिनीची निवड करतांना वनौषधीच्या मुळाच्या वाढीचा आणि जमिनीतील विविध थरांचा अभ्यास करणे आवश्यक असते. जमिनीचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म विचारात घेऊन जमिनीवर लावण्याच्या वनौषधीची निवड करावी.

जमीन कोणत्या प्रकारच्या खडकापासून निर्माण झाली आहे, त्यात कोणती खनिजे आहेत, यावर मातीचा रंग अवलंबून असतो. जमिनीच्या भौतिक गुणधर्मावरून जमिनीचा प्रकार, पोत, घडण समजते. पाणी तुंबून राहणाऱ्या आणि कमी हवा खेळणाऱ्या जमिनीमध्ये कितीही पोषक द्रव्ये असली तरी अशा जमिनीमध्ये वनौषधी व वनवृक्ष जोमाने वाढत नाहीत.

जमिनीतील आणि खताद्वारे दिलेली द्रव्ये पाण्यात विरघळतात आणि द्रवरुपात वृक्षांच्या मुळावाटे शोषली जातात. वृक्षांनी जरी ही मूलद्रव्ये शोषून घेतली नाहीत तरी ती द्रव्ये जमीन धरून ठेवते. जमिनीच्या पोषक द्रव्ये धरून ठेवण्याच्या क्षमतेला ‘कटायन एक्सेंज’ क्षमता म्हणतात. जमिनीचा हा महत्वाचा गुणधर्म जमिनीचा प्रकार, पाऊस यावर अवलंबून असते.

विविध वनौषधी व वनवृक्षांच्या प्रजाती जमिनीची धूप थांबवितात. विविध कारणांनी पडीक, नापिक झालेल्या जमिनीवर योग्य वनौषधी वृक्ष, प्रजाती लावता येतात. अशावेळी जमीन व प्रजाती यांचा अभ्यास करून तज्ञांच्या सल्ल्याने लागवड केल्यास उत्पन्न चांगले मिळू शकते.

औषधी वनस्पती पिके

 1. औषधी पिके

या विभागात विविध औषधी पिकांविषयी – आवळा, अश्वगंधा, भुई आवळा, पत्थरफोड, इसबगोल, कलीहारी, पिंपळी, सफेद मुसली, सेना शतावरी इ. पिकांविषयी माहिती दिली आहे.

 1. मधुपर्णी

या विभागात मधुपर्णी या औषधी वनस्पती पिकाविषयी माहिती दिली आहे. मधुमेहींसाठी हि एक खूप उपयोगी अशी औषधी वनस्पती आहे.

 1. बहुगुणी आवळा

आवळा तुरट, आंबट चवीचे, हिवाळ्यात येणारे हिरव्या रंगाचे बहुउपयोगी औषधी फळ आहे. जीवनसत्व “क” चे हे भांडार आहे.

 1. नागकेशर लागवड

नागकेशर हा अत्यंत देखणा, मध्यम उंचीचा सदाहरित वृक्ष आहे. या वृक्षाचे खोड एक ते दोन मीटरपर्यंत सरळ वाढते.

 1. बिब्बा

बिब्बा हा मध्यम उंचीचा वृक्ष असून, पाच ते सात मीटरपर्यंत वाढतो.

 1. सुपारी लागवड

सुपारी लागवडीसाठी श्रीवर्धनी ही जात निवडावी. या जातीची सुपारी मोठी असून, तिच्यामध्ये पांढऱ्या गराचे प्रमाण जास्त असून, ही सुपारी मऊ आहे.

 1. अडुळसा वनस्पती

अडुळसा हे सदैव हिरवेगार असणारे, दोन ते तीन मीटर उंच वाढणारे झुडूप आहे.

 1. पानवेल लागवड आणि जाती

पानवेल लागवडीसाठी सुपीक, उत्तम निचरा होणारी जमीन आवश्‍यक आहे. पानवेल लागवडीपूर्वी हिरवळीचे पीक घेतल्यास फायदेशीर ठरते.

 1. शतावरी लागवड

शतावरीची लागवड वर्षभर करता येते.लागवडीसाठी पोयट्याची वाळूमिश्रित जमीन निवडावी.

 1. नागकेशराचे हवे संवर्धन

औषध निर्मिती, सौंदर्य प्रसाधने, साबण उद्योग, इंजिन तेल, इमारती बांधकाम इत्यादींसाठी नागकेशराच्या विविध भागांचा वापर केला जातो.

औषधी वनस्पती लागवड

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

1 Comment
 1. Anonymous says

  5

Leave A Reply

Your email address will not be published.