• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 25, 2021
  • Login
Krushi Samrat
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
Krushi Samrat
No Result
View All Result
Home शेती

खतांची गुणवत्ता कशी ओळखाल ?

Girish Khadke by Girish Khadke
September 13, 2019
in शेती
0
खतांची गुणवत्ता कशी ओळखाल ?
Share on FacebookShare on WhatsApp

पिकांच्या चांगल्या उत्पादनासाठी आणि जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी अनेकदा शेतकरी वर्ग रासायनिक खतांचा वापर करतात. खरतर सुपीक जमिनीमध्ये पुन्हा पुन्हा पीक उत्पादन घेतल्यामुळे हळू-हळू जमिनीची सुपीकता (उत्पादन क्षमता) कमी होऊ लागते. म्हणून जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी वेळोवेळी माती परीक्षण केले पाहिजे. 

सरकारने सुद्धा मृद आरोग्य पत्रिकेच्या माध्यमातून, मातीमध्ये किती प्रमाणात पोषक घटक आहेत आणि त्यांच्यात काय कमी आहे तसेच कोणते खत कसे आहे आणि त्यांची गुणवत्ता व क्षमता कशी वाढवावी तसेच त्याबद्दल जाणून घेणे किती महत्वाचे आहे? या बद्दल माहिती दिली आहे. 

आजपासून चार ते पाच दशकापूर्वी जमिनीची सुपीकता खूप जास्त होती, त्यामुळे योग्य व पुरेसे प्रमाणात पिकांना पोषकद्रव्ये मिळत होती. परंतु, आता अधिक उत्पादन देणार्‍या जातींचा वापरामुळे आणि अयोग्य माती व्यवस्थापनामुळे मातीची प्रजनन क्षमता कमी होण्यास सुरुवात झाली आहे. पिकास कोणत्या प्रकारची खते आवश्यक आहेत, त्याचे गुणधर्म काय आहेत आणि त्याची उत्पादन क्षमता कशी वाढवायची याविषयी संपूर्ण माहिती इथे दिली जात आहे ज्यामुळे शेतकर्‍यांना त्याचा फायदा होऊ शकेल.


कोणत्याही पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी खालील दिलेल्या अन्नद्रव्यांची आवश्यकता असते

– प्रमुख अन्नद्रव्ये: नत्र (N2), स्फुरद (P2O5) व पालाश (K+)
– दुय्यम अन्नद्रव्ये: कॅल्शियम (Ca2+), मॅग्नेशियम (Mg2+) व गंधक (SO42)
– सूक्ष्म अन्नद्रव्ये: लोह (Fe+), मँगेनीज (Mn2+), कॉपर (Cu+), झिंक (Zn2+), बोरॉन (H3BO3), मॉलिब्डेनम (MoO42) आणि क्लोरिन (Cl-), निकेल (Ni2+)

मुख्यतः नत्राचा पुरवठा करण्यासाठी युरिया, स्फुरदचा पुरवठा करण्यासाठी डीएपी, एसएसपी किंवा एनपीके आणि पालाशचा पुरवठा करण्यासाठी एमओपी किंवा एनपीके चा वापर केला जातो. तसेच जस्त चा पुरवठा करण्यासाठी झिंक सल्फेटचा वापर केला जातो. खतांची गुणवत्ता खालीलप्रमाणे तपासली जाऊ शकते.

यूरिया:-

हा पांढरा रंगाचा चमकदार असतो, यात सामान आकाराचे गोल दाणे असतात. हा पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळतो, पाण्यात विरघळलेल्या द्रावणाला स्पर्श केल्यास थंड लागते, युरियाचे दाणे उन्हात जमिनीवर ठेवल्यास ते वितळते आणि जास्त उन्हात युरियाचे कोणतेही अवशेष राहत नाहीत.

डीएपी:–

डीएपीचे दाणे कठोर, भुरे, काळे किंवा बदामी रंगाचे असतात. डी.ए.पी ची गुणवत्ता ओळखण्यासाठी काही दाण्यांना हातात घेऊन त्यात थोडा चुना मिसळून तंबाकू सारखे रगडल्यावर तीव्र गंध तयार होतो. ज्याचा वास घेणे खूप कठीण असते. याव्यतिरिक्त डीएपीच्या काही दाण्यांना फरशीवर रगडल्यावर ते तुटत नाहीत. जर डीएपीच्या दाण्यांना तव्यावर हळुवार गरम केले असता त्याचे दाणे फुगतात.

एसएसपी:–

एसएसपीचे दाणे कठोर, दाणेदार, भुरे, काळे आणि बदामी रंगाचे असतात. हे खत पावडरच्या स्वरूपात देखील उपलब्ध असते. एसएसपी या दाणेदार खताचा मुख्यतः डी.ए.पी. आणि एन.पी.के. या मिश्र खतांसारखाच वापर केला जातो. 

एमओपी:–

एमओपी हे सफेद, पांढर्‍या रंगाच्या मिठासारखे आणि लाल मिरचीच्या मिश्रणासारखे असते. याचे दाणे ओलसर केल्यावर एकमेकांना चिटकत नाहीत. हे खत पाण्यात विरघळल्यावर या खताचा लाल भाग पाण्याच्यावर तरंगतो.

झिंकसल्फेट:–

झिंक सल्फेट या खतात मॅग्नेशियम सल्फेटचे प्रमुख मिश्रण असते. भौतिक रूप समानतेमुळे या खताची नकली असली ची ओळख करणे खूप कठीण असते. या खताच्या गुणवत्ता तपासण्यासाठी याच्या मिश्रणात डी.ए.पी चे मिश्रण मिळविल्यावर दाट द्रावण तयार होते. मॅग्नेशियम सल्फेट सोबत असे होत नाही. याशिवाय, झिंक सल्फेटच्या मिश्रणात पातळ दाहक सोडा मिसळल्यावर पांढरे, फिकट तपकिरी द्रावण तयार होते. यात घट्ट दाहक मिसळल्यावर द्रावण पूर्णपणे मिसळून जाते. जर झिंक सल्फेटचच्या ऐवजी मॅग्नेशिम सल्फेट घेतले तर द्रावण विरघळत नाही. 

खतांचा योग्य वापर आणि अधिक उत्पादनासाठी योग्य वेळी संतुलित प्रमाणात खतांचा वापर करणे खूप आवश्यक आहे. प्रयोगानुसार, पिकास जास्तीत जास्त उत्पन्न आणि पोषक तत्वांचा धोका कमी करण्यासाठी आपल्याला खतांची उपयोग क्षमता वाढवणे आवश्यक आहे. खते वापरण्याची क्षमता वाढविण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा.

योग्य खते निवडणे :-

– माती परीक्षणानुसार खत नियोजन करावे. मातीमध्ये ज्या अन्नद्रव्याची कमतरता असेल त्याच अन्नद्रव्यासाठी खत नियोजन करावे. 
– नत्राचा पुरवठा करण्यासाठी निम कोटेड युरियाचा वापर करावा.
– मातीमध्ये स्फुरद कमतरता असल्यास, पाण्यात विरघळणार्‍या स्फुरद युक्त खतांचा वापर करावा.
– कमी कालावधीच्या पिकांना त्वरित अन्नद्रव्य उपलब्ध होण्यार्‍या खतांचा आणि जास्त कालावधीच्या पिकांना हळू-हळू अन्नद्रव्य उपलब्ध होतील अशा खतांचा वापर करावा. जास्त कालावधीच्या पिकांना साइट्रेट विरघळणारे तर कमी कालावधीच्या पिकांना फॉस्फेटिक खतांचा वापर करावा.
– शेतात कोणते पिक घेणार आहेत, त्या आधी त्या शेतात कोणते पिक घेतले होते तसेच त्या पिकात कोणत्या खतांचा किती प्रमाणात वापर केला गेला होता. या गोष्टींचा विचार करून खतांचे नियोजन करावे.
– ओलसर कमी असणार्‍या जमिनीत नायट्रेटयुक्त किंवा नायट्रोजनधारी खतांचा तर सिंचन आणि उच्च पर्जन्य भागात अमोनिकल किंवा अमाईडयुक्त नायट्रोजनधारी खतांचा वापर करावा.
– ओलसर भागात कॅल्शियम तसेच मॅग्नेशियम युक्त खतांचा वापर करावा. कारण अशा भागात मातीत याची कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची कमतरता असते.
– आम्ल युक्त जमिनीत क्षार प्रभाव पसरवणारे नायट्रोजन युक्त खतांचा वापर करावा. तसेच फॉस्फरसच्या पुरवठ्यासाठी फॉस्फेटिकयुक्त मिश्रणाचा वापर करावा.
– वाळूयुक्त जमिनीत जैविक खतांचा अधिकाधिक वापर करा जेणेकरून अन्नद्रव्याचे पोषण होऊन कमीत कमी प्रमाणात नुकसान होईल तसेच अशा जमिनीत नायट्रोजनयुक्त खतांचा वापर करून फवारणी करावी. चिकणी जमिनीत जास्त प्रमाणात जैविक खतांचा वापर केला पाहिजे.

खताचा वापर कधी आणि कसा करावा ?

– शेणखत, कंपोस्ट खत, हिरव्या खतासारखे सेंद्रिय खते पिक पेरणीपूर्वी शेतात चांगल्या प्रकारे मिसळून दयावे.
फॉस्फेटिक आणि पोटॅशिक खतांची पूर्ण मात्रा पीक पेरणीच्या वेळी शेतात चांगल्या प्रकारे जमिनीत मिसळून दयावे.
– नायट्रोजन, फॉस्फेटिक आणि पोटॅशिक हि खते पेरणीच्या वेळी शेतात 3 ते 4 से.मी. खाली आणि 3 ते 4 सेंमी बाजूला दिले पाहिजे. तसेच फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि जस्त या खतांना नेहमी पिकांच्या मुळांजवळ दयावे.
– खतांना मिश्रणाच्या स्वरूपात उभ्या पिकात फवारणी केल्यास, नायट्रोजन, वायुवीजन, स्थिरीकरण, डिनायट्रिफिकेशन इ. द्वारे होणार्‍या नुकसानापासून वाचविले जाऊ शकते.

खतांचेप्रमाणकसेघ्यावे:-

– भात आणि गहू या पिकांसाठी, जर गहू पिकाच्या शिफारशीनुसार खतांची मात्रा दिली असेल तर भात पिकाच्या पुढील पेरणीसाठी फॉस्फरस आणि पोटॅश या खतांची मात्रा देऊ नये. भात पिकासाठी निमकोटेड आणि जस्तकोटेड नायट्रोजनयुक्त खतांचा वापर करावा.
– रब्बी पिक पेरणीच्या आधी शेतात हिरव्या खतांचे पीक घेतले गेले असेल आणि वेळेवर पीक जमिनीत गाडली गेले असतील तर रब्बी पिकांच्या पेरणीवेळी नत्राची मात्रा प्रति हेक्टरी 40 किलोने कमी करावी.
– जर शेतात शेणखत किंवा कंपोस्ट वापरले गेले असेल, तर पुढील पिकासाठी नंतर 5 किलो, स्फुरद 2.5 किलो आणि पालाश 2.5 किलो प्रती टन या प्रमाणात नत्र, स्फुरद आणि पालाशच्या मात्रेत कमी द्यायला हवे.
– पिकाची योग्य वेळेत पेरणी केल्यास खतांची उत्पादन क्षमता वाढत असते. पिकातील दोन ओळीतील अंतर आणि दोन रोपातील अंतर योग्य ठेवल्यास खतांचा योग्य आणि जास्त पुरवठा होतो.

महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Tags: How do you know the quality of fertilizers?खतांची गुणवत्ता कशी ओळखाल ?
Girish Khadke

Girish Khadke

Related Posts

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे
शेती

रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे

October 16, 2020

ताज्या बातम्या

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

by Team Krushi Samrat
October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

by Team Krushi Samrat
October 22, 2020
रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे
शेती

रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे

by Team Krushi Samrat
October 16, 2020
परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास
शेती

परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास

by Team Krushi Samrat
October 16, 2020
खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव
शेती

खुल्या बाजारात सोयाबीनला मिळतोय अवघ्या दीड हजारांचा भाव

by Team Krushi Samrat
October 15, 2020
कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक
शेती

कमी खर्चात, कमी त्रासात घ्या ‘झेंडू’चे पिक

by Team Krushi Samrat
October 15, 2020
२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित
शासकीय योजना

२०२०-२१ च्या शासकीय खरीप पिकांचे दर निश्चित

by Team Krushi Samrat
October 10, 2020
अतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान
शेती

अतिपाऊस,कीटकांच्या हल्ल्यामुळे सोयाबीनचे मोठे नुकसान

by Team Krushi Samrat
October 10, 2020
करा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न
शेती

करा शेवग्याची लागवड आणि मिळावा चांगले उत्पन्न

by Team Krushi Samrat
October 10, 2020
Prev Next

About us

Krushi Samrat

कृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अवजारे
  • आयुर्वेदिक नुस्खे
  • कायदा
  • कृषीसम्राट सल्ला
  • तंत्रज्ञान
  • प्रेरणा
  • प्रेरणादायक गोष्टी
  • बातम्या
  • यशोगाथा
  • व्हिडिओ
  • शासकीय योजना
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • हवामान
  • हिन्दी

Recent News

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In