जळगाव : आधीच हवामानातील बदलांमुळे हापूस आंब्याची आवक मंदावन्याची शक्यता असतांना कोरोनामुळे त्यात भर पडल्याने कोकणातील हापूस आंबा बागायतदार आणि व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.
कोरोना संकटामुळे देशभरात लॉकडाऊन झाल्याचा फटका हापूस आंबा बागायतदारांनाही बसत आहे. हापूसच्या हजारो पेट्या सध्या कोकणात पडून आहेत. त्यामुळे आंबा विक्रीबाबत आत्ताच निर्णय न झाल्यास येत्या काळात कोकणातील आंबा बागायतदार भीषण संकटात येण्याची भीती आहे.
कोकणात साधारण ३ ते ४ कोटी डझन हापूस आंबा तयार होतो. परंतु कोरोनाच्या भीतीमुळे मुंबई पुण्यासह देशात आणि परदेशातही हाफूसच्या पेट्यांना मागणी नाही. हापूसच्या एकूण उत्पादनाच्या ४० टक्के आंबा आखाती देशात निर्यात होतो तर ६० टक्के हापूस स्थानिक बाजारात विक्री होतो.