गुलकंद हा गुलाबपाकळ्या आणि खडीसाखर याचे मिश्रण करून तयार झालेला पदार्थ आहे. घरच्या घरी आपण हा पदार्थ तयार करू शकतो. या पदार्थास आयुर्वेदात फार महत्व आहे. गुलाबशेती करणाऱ्यांसाठी तसेच बेरोजगारांसाठी गुलकंदनिर्मिती हा एक जोडधंदा किंवा रोजगाराचा एक पर्याय आहे. गुलाब फुलांचा उपयोग हार बनविण्यासाठी तर होतो शिवाय गुलकंद, गुलाबपाणी, अत्तर, गुलाब तेल, उदबत्ती बनविण्यासाठी देखील केला जातो. गुलकंद करण्यासाठी देशी जातीच्या लाल फुलांचा वापर करावा. याचबरोबरीने एव्हान, क्रिमझन ग्लोरी हार्ट थ्रॉब, ब्ल्यू मून, मॉन्टेझुमा, हैद्राबादी गुलाब या सुवासिक फुलांच्या जाती आहेत.
गुलकंद बनविण्याची कृती:-
साहित्य :-
गुलकंद तयार करण्यासाठी 1) गुलाब पाकळ्या, 2) खडी साखर, 3) प्रवाळ पिष्ठी इत्यादी साहित्य लागतात.
कृती :-
1) गुलकंद करण्यासाठी देशी जातीच्या लाल फुलांचा वापर करावा. म्हणजे गुलकंदाला चांगला रंग व सुगंध येतो. देशी गुलाबांना जेवढा सुगंध असतो, तेवढा सुगंध विदेशी गुलाबांना नसतो.
2) प्रथम पूर्ण उमललेल्या निरोगी फुलांच्या पाकळ्या वेगळ्या काढून घ्याव्यात. पाकळ्यांचे बारीक तुकडे करावेत. एक किलो खडी साखर या प्रमाणात एक थर पाकळ्या आणि एक थर खडी साखर असे काचेच्या बरणीत भरावे.
3) काचेची बरणी उन्हात 4 ते 5 दिवस ठेवावी. उन्हामुळे साखरेचे पाणी झाल्यावर त्यामध्ये या पाकळ्या मुरतात. असा हा चविष्ट गुलकंद 21 ते 25 दिवसांत खाण्यासाठी तयार होतो.
गुलकंदाचे फायदे:-
- गुलकंद हा एक उत्तम पाचक पदार्थ आहे. उष्णतेपासून होणारे विकार, ताप, रक्तपित्त, कांजिण्या, शारीरिक कमजोरी अशा विकारांवर गुलकंद हे एक रामबाण उपाय आहे.
- गुलकंद हे कांतिदायक तृष्णाशामक म्हणून ओळखल्या जाते.
- गुलकंदामध्ये 10 टक्के प्रवाळ मिसळून वाढत्या वयाची मुले आणि शारीरिकरित्या दुर्बल असलेल्यांना गुलकंद खाऊ घातल्यास हे शक्तिवर्धक म्हणून कार्य करते.
महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.