गुलाब शेतीचे नियोजन

2

भारतामध्ये काश्मिरहिमाचलप्रदेशगुजरात यासह महाराष्ट्रात मुंबईपुणेकोल्हापूरसांगलीसोलापूरसाताराजळगावधुळेनाशिक ह्या परिसरात निर्यात योग्य फुलांची लागवड करण्यास संधी आहे. कारण येथे वाहतुकीची साधने ( रेल्वेरस्ते ) उपलब्ध आहेत. तसेच अनुकुल स्थानिक भौगोलिक स्थितीहवामानजमीनपाणी येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. प्रामुख्याने गुलाब शेती पुढील हेतूने केली जाते :
१. लांब दांड्याची फुले मोठ्या शहरातून विक्रीसाठी व परदेशी निर्यातीसाठी.
२. गुलाबापासून गुलकंदगुलाबपाणीअत्तरे बनविण्यासाठी. 
३. नविन जाती निर्माण करण्यासाठी 
४. संशोधनासाठी ५. परिसरातील शोभा वाढविण्यासाठी ६. छंद म्हणून

लागवड करण्यापूर्वी
१. लागवडीचा हेतू ठरविणे
२. अशा क्षेत्रात कोण शेती करतात त्याची माहिती मिळवणे
३. उत्पादन कधी मिळणार व तोपर्यंतचा प्राथमिक खर्च भांडवलाची तरतूद
४. पैदास करताना लागणारी प्राथमिक तांत्रिक माहितीमजूरकुशल कामेहत्यारेअवजारे इत्यादिंची तयारी करणे.
५. विक्री कोठे व किती करणार व मालास मागणी कशी आहे. ( प्राथमिक बाजारपेठ संशोधन )इत्यादीवर माहिती मिळवणे.
६. महत्त्वाची गोष्ट – फुलांचे उत्पादन दर्जेदार असले पाहिजे. फुलोत्पादन नाशवंत मालात मोडते. दर्जेदार फुलांना मागणी सातत्याने असते व त्याची किंमत चांगली येते अन्यथा उत्पन्न शून्य मिळेल व तोटा होईल.

लागवडीचा आराखडा
१. उत्तम निचऱ्याची आणि ७ -० पेक्षा कमी सामू (पीएच) असलेली जमीन निवडावी.
२. चर पद्धतीने लागवड करून शक्यतो दक्षिणोत्तर घ्यावी.
३. चरी व्यवस्थित खताने भरून घ्याव्यात.
४. कलमे तयार करून लागवड करावी.
५. बाजारात मागणी असलेल्या गुलाब जातीचे ३ – ४ प्रकारच लावावेत.
६. योग्य वेळी लागवड केल्यास फायदा होऊ शकतो.
७. दोन चरीत किमान १.७५ मीटर अंतर ठेवून चरीची रुंदी ५ .० से. मीटर व खोली ४६ से. मीटर.
८. लागवड प्रत्येक चरीत दुहेरी ओळ ३८ से. मीटर अंतर राखून करावी.
९. चरीत दर हेक्टरी पुढील खते वापरावीत 
• 
कंपोस्ट खत ३ ट्रकलोड
• 
७.१०.५ – २ टन
• 
डी.ए.पी. २५० किलो,
• 
मँग्नेशिअम सल्फेट ५० किलो,
• 
जीवाणू खत ५ किलो,
• 
१० टक्के बी. एच. सी ५० किलो.
१०) लागवड हंगाम – जानेवारी किंवा जून किंवा ऑक्टोबर महिना.

गुलाबापासून तयार करा गुलकंद

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

2 Comments
  1. Anonymous says

    5

  2. […] गुलाब शेतीचे नियोजन […]

Leave A Reply

Your email address will not be published.