पिशोर / प्रतिनिधी
दिगर पिशोर येथे महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यातील शेतकर्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळून घेण्यास सक्षम करणे तसेच व्यवसाय किफायतशीर करण्यास सहाय्य करणे. या उद्देशाने नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प या योजनेबद्दल कृषी विभागातर्फे नुकतेच मार्गदर्शन करण्यात आले.
ही योजना गावस्तरावर राबविण्यात येत असून शेतकर्याचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामसमितीने केले आहे. या योजनेचे अर्ज नागरिकांनी महा-ई-सेवा केंद्रात करावेत असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी सरपंच नारायण मोकासे, कृषी सहाय्यक राजेंद्र पाटील, दीपाली पाटील, रामू नवले, दिलीप नवले, नारायण खडके, गोकुळ डहाके, पांडुरंग नवले यांची प्रमुख उपस्थिती होती.