प्रत्येक कुटुंबाच्या आहारात गवार या शेंगवर्गीय भाजीला अनन्यसाधारण महत्व आहे. या पिकाच्या कोवळ्या शेंगांचा भाजीसाठी उपयोग केला जातो. गवार शेंगातील सुकलेल्या बियांचा उसळ म्हणून नाश्ता किंवा भाजीसाठी उपयोग करतात. ग्रामीण तसेच अलीकडे शहरी भागातही गवारला लोकप्रिय पीक म्हणून पसंती मिळत आहे. महाराष्ट्रात सुमारे 8910 हेक्टर क्षेत्रावर या पिकाची लागवड होते. तर देशातील गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश ही राज्य जनावरांसाठी हिरवा चारा, हिरवळीचे खत म्हणून वापरकरताना आढळतात. गवारीच्या पिकापासून निघणार्या डिंकाला मोठी मागणी असल्यामुळे परकीय चलन मिळवून देणारे पीक म्हणूनही गवार शेंगाकडे पाहिले जाते. गवारीच्या शेंगांमध्ये फाँस्फरस, चुना, लोह आदी खनिजे आणि अ, ब, क जीवनसत्वे बर्याच प्रमाणात असतात. गवारीच्या डिंकाचा कागद, कापड, सौंदर्य प्रसाधने आणि स्फोटकांमध्ये उपयोग केला जातो.
गवार हे उष्ण हवामानातील पीक असून सरासरी 18 ते 30 अंश सेल्सिअस तपमानास हे पिक चांगल्याप्रकारे उत्पन्न मिळवून देते. खरीपातील उष्ण व दमट हवेमुळे झाडांची वाढ चांगली होते. त्यामुळे हिवाळी हंगामात या पिकांची लागवड फायदेशीर ठरत नाही. हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाऊ शकते. पाण्याचा चांगला निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत या पिकाची वाढ चांगली होते. जमिनीचा सामू 7.5 ते 8 च्या दरम्यान असल्यास पिकाची वाढ चांगली होते.
गवारीची लागवड खरीप व उन्हाळी हंगामात केली जाते. उन्हाळी हंगमास गवारीची लागवड जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात करतात. बियांचे प्रमाण हेक्टरी 14 ते 24 किलो बी लागवडीस पुरेसे असते. बियाण्यास पेरणीपूर्व 10 ते 15 किलो बियाण्यात 250 ग्रॅम रायझोबियम चोळावे. जमिनीची प्रत व हवामानानुसार दोन ओळीतील अंतर 45 ते 60 सेंमी ठेवावे आणि झाडातील अंतर 20 ते 30 सेंमी ठेवावे. काही शेतकरी 45 सेंमी पाभारणे बी पेरून नंतर सारा यंत्राने सारे पडतात किंवा 45 द 60 सेंमी अंतरावर स-या पडून सरीच्या दोन्ही बाजून दोन झाडातील अंतर 15 ते 20 सेंमी राहील या अंतरावर दोन दोन बिया टोकतात. गवार हे शेंगवर्गातील कोरडवाहू म्हणून पिक घेतल्यास त्यास खताची फारशी जरुरी भासत नाही. बागायती पिकास लागवडीपूर्वी 50 किलो नत्र, 60 किलो पालाश द्यावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास पाणी द्यावे. या पिकला पाणी माफक प्रमाणत लागते, परंतु फुले आल्यापासून शेंगाचा बहार पुरण होइपर्यंत नियमित पाणी देणे गरजेचे आहे. पेरणीनंतर 10 ते 20 दिवसांनी रोपांची विरळणीकरून जोमदार व उत्तम वाढीतील अशा अंतराने रोपे ठेवावीत. 3 आठवड्यांनी खुरपणी करून तण काढून टाकावे. दुसरी खुरपणी तणांचे प्रमाण पाहून करावी.
गवार शेंग पिकाची विविध वाणं आहेत. त्यांत पुसा सदाबहार, पुसा नावबहार, पुसा मोसमी, शरद बहार यांचा समावेश आहे.
या पिकावर भुरी हा बुरशीजन्य रोग पडतो. झाडाच्या पानांच्या दोन्ही बाजूवर कळपात डागांनी होऊन नंतर संपूर्ण पान पांढरे होते. हा रोग खोड आणि शेंगावरही पसरतो. यावर उपाय करण्यासाठी 50 ग्रॅम ताम्रयुक्त औषध कॉपर ऑक्झीक्लोराईड 25 ग्रॅॅम 10 लिटर पाण्यात मिसळून 8 ते 10 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 फवारण्या कराव्यात.
तसेच मर हा बुरशीजन्य रोगही या पिकाला सतावतो. या रोगाची लागण झालेले झाड कोलमडून जाते. प्रथमत: झाड पिवले पडते. बुंध्याजवळ अशक्त बनते. याचा बंदोबस्त करण्यासाठी बियाणास प्रति किलो 4 ग्रॅम थायरम चोळावे. रोगट झाडाभोवती बांगडी पद्धतीने ताम्रयुक्त औषधाचे द्रावण 8 ते 10 सेंमी खोल माती भिजेल असे ओतावे. या पिकावर मावा व तुडतुडे या किडींचाही प्रादुर्भाव होतो. या किडींचा बंदोबस्त करण्यासाठी पिकावर डायमेथोएट 30 ईसीक 1.5 मिली किंवा मोनोक्रोटोफाँस 36 डब्लूसी किंवा मिथिलडिमेटॉन 25 ईसी 2 मिली प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे. भाजीसाठी हिरव्या कोवळ्या पण पूर्ण वाढलेल्या शेंगांची नियमित तोडणी करावी. शेंगा जास्त दिवस झाडावर राहिल्यास त्यात रेषांचे प्रमाण वाढते आणि साल कठीण होऊन त्या लवकर शिजत नाहीत. शेंगाची तोडणी 3 ते 4 दिवसांतून करावी. सर्व साधारणपणे हिरव्या शेंगाचे हेक्टरी 100 ते 200 क्विंटल उत्पादन मिळते.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादीं ची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
https://whatsapp.heeraagro.com
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!