चंदन लागवडीवर सरकारी परवानगी आणि सबसिडी

3

चंदन लागवडीसाठी  सरकारी अथवा संस्थेची परवानगी घ्यायची गरज पडत  नाही.  परन्तु शेतकऱ्याने शेतात चंदन  लागवड केल्या नंतर तलाठी अधिकाऱ्याकडून सातबारावर नोंद करून घेणे आवश्यक आहे. तसेच तोडताना फोरेस्त डिपार्टमेंट(Forest Dept.) ची परवानगी घ्यावी लागते. सरकार कडून हेक्टरी रू. 45,000 अनूदान 3 टप्यात दिले जाते. अधिक माहिती साठी तालूका कृषी अधिकारी यांना भेटावे. त्यांना माहिती नसल्यास, वन औषधी महामंडळ, साखर संकूल, पूणे यांच्या कडे संबंधित G.R.मिळेल.

लागवड क्षेत्र

चंदन शेती  लागवडी साठी कुठल्याही  राज्यातील जमिन लागवड योग्य आहे. फक्त पाण्याचा निचरा होणारी जमिण असने फायदेशीर ठरते.. चंदन ही परोपजिवी असल्यामूळे त्याला सोबत दूसरे झाड लावावेच लागते. मिलिया डूबिया, डाळिंब ई. चालतात.

रोपांचे सरासरी भाव

मार्केट

6 इंच ते एक फूट 30-50 रू.

1.5 ते 2 फूट 50-90 रू.

होलसेल

2 फूट 35-36 रू फक्त

मिलिया डूबिया मार्केट 20-30

होलसेल 14-16 रू.

लागवड पद्धत

सर्वसाधारण पणे चंदन ची झाडे लावताना  10×10 वर लागवड करावी लागते आणी मधल्या पाच फूटा मध्ये कुठल्यहि पिक घेऊ शकतो उदा. डाळींम किव्हा मिलिया डूबिया चे पिक घेऊ शकतो.. एकरी 435 चंदन आणी 435 दुसरी झाडे लागतात. प्रथम 1×1 चा खड्डा करून, त्यात कंपोस्ट टाकून मग रोप लावावे. ही जंगली शेती असल्यामूळे नंतर फवारणी खताची गरज नाही. वर्षातून दोनदा निंबोळी खत द्यावा आणी सूरवातिचे तिन वर्ष ड्रिप ने पाणी द्यावे लागेल.

उत्पन्न

चंदनाचे एक झाड साधारणतः 12-14 वर्षा मध्ये 15-25 कि. ग्रा. पर्यंत गाभा निघतो. त्याचा सरासरी आजचा भाव रू. 7000 किलो आहे. मिलिया डूबिया पासून प्लायवूड बनते. त्याचे एक झाड सरासरि 5 years मध्ये रू. 7,000-10,000 ला विकले जाते.

विक्री आणि उत्पन्न

विक्री साठी “मैसूर सँडल” यांच्या कडे खूप डिमांड आहे. पण मागणिच्या फक्त 2% पूरवठा होतो. तसेच आपण दुसऱ्या कंपन्यांना पण चंदन पुरवठा करू शकतो किव्हा स्वताः ऊत्पादन कंपनी टाकू शकता. सरकार चंदन तेल उत्पादनासाठी सबसीडी देते.
अश्या प्रकारे जर चंदन शेती केल्यास भरपूर उत्पन व नफा मिळू शकतो.

 

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

https://whatsapp.heeraagro.com

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

3 Comments
  1. Anonymous says

    3

  2. Anonymous says

    0.5

  3. Nikhil Hire says

    Please send GR

Leave A Reply

Your email address will not be published.