अर्थसंकल्पाच्या पूर्वीच मोदी सरकारनं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. मोदींच्या मंत्रिमंडळानं किमान आधार मूल्य (MSP) वाढवण्यास मंजुरी दिली आहे. धान्याची प्रति क्विंटल MSP 85 रुपयांनी वाढवली आहे. आता मका, बाजरी, शेंगदाणा, तुरीच्या MSPमध्ये वाढ करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी जुलैमध्ये मोदी सरकारनं 10 वर्षांतली किमान आधार मूल्यात सर्वात मोठी वाढ केली होती. सोयाबिनच्या किमतीतही 311 रुपये प्रतिक्विंटल वाढ करण्यात आली आहे. तर सूरजमुखीच्या किमतीत 262 रुपये क्विंटलची वाढ केली गेली आहे. तूरडाळीच्या किमतीत 125 रुपये प्रतिक्विंटल, उडिद डाळीच्या किमतीत 100 रुपये प्रतिक्विंटलची वाढ केली आहे.
गेल्या अनेक काळापासून शेतकरी एमएसपीमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहेत. शेतकऱ्यांना आधार मूल्यात कमीत कमी दीड पट फायदा मिळाला पाहिजे, अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.