रोटाव्हेटर हे ट्रॅक्टरचलित यंत्र असून बहुपयोगी आहे. या यंत्राच्या सहाय्याने कमी वेळात कमी शक्ती वापरून जास्तीचे काम करता येते. हे यंत्र ट्रॅक्टरच्यापीटीओ शाफ्टच्या चक्राकार गतीने मिळणारी शक्ती वापरून कार्य करते.
रोटाव्हेटरचा उपयोग :-
रोटाव्हेटरचा उपयोग मका, ज्वारी, तंबाखू, ऊसवइतर जवळपास सर्वच पिकांसाठी केला जातो.रोटाव्हेटरच्यानांग्यानेपिकांचे अवशेष, धसकटे, वमुळ्याचा बारीक भुगा करता येतो.हे सर्व घटक जमिनीत मिसळून त्यापासून आपणास मशागतीबरोबर सेंद्रिय पदार्थाचे विघटन झपाट्याने होण्यास मदत होते. आंतरमशागतीची कामे नांग्यांची संख्या कमी करून आवश्यकतेनुसार पिकांच्या ओळीतून करता येतात. जमिनीमध्ये टाकलेली विविध प्रकारची खते रोटाव्हेटर चालवूनयोग्य खोलीवर व समप्रमाणात जमिनीत मिसळून देता येतात. फळबागेमध्ये या यंत्राने विविध प्रकारची आंतरमशागतीची कामे करून झाडास एक प्रकारची उकरी देता येते. या यंत्राने भातशेतीमध्ये चिखलणीची कामे करता येतात. तसेच, तण नियंत्रणाकरिता याचा उपयोग मोठ्या प्रमाणात करता येतो.रोटाव्हेटरने ढेकळे बारीक होऊन मशागत एकसारखी होते.
मशागतीची गुणवत्ता :-
रोटर जर हळूहळू फिरत असेल, तर रोटरला जोडलेलीपाती जमिनीचा मोठा काप घेतात. त्यामुळे मोठ्या आकाराची ढेकळे तयार होतात. याउलट, वेगाने फिरणाऱ्या रोटरमुळेबारीक स्वरुपाची मशागत होते. सामान्यतः रोटरची गती २४० ते ३०० फेरे प्रति मिनिट एवढी ठेवली जाते. ट्रॅक्टरच्या इंजिनाची गती व रोटाव्हेटरच्या रोटरची गती स्थिर ठेवल्यास मशागत बारीक स्वरुपाची होते. १५ ते २० से.मी पर्यंत खली मिळविण्यासाठी ट्रॅक्टरची गती ४ ते ५ कि.मी प्रति तास ठेवावी. मशागतीची खोली रोटाव्हेटरच्या पट्ट्या खाली – वर करून बदलता येते.
रोटाव्हेटरचे कार्य :-
१) प्रोपेलर शाफ्ट :- रोटरला फिरवण्यासाठी चक्रीय गती आवश्यक असते. हि चक्रीय गती ट्रॅक्टरच्या पीटीओ शाफ्टपासूनरोटाव्हेटर पर्यंत वाहण्याचे कार्य प्रोपेलर शाफ्ट करतो.
२) गिअर बॉक्स :– रोटरची गती कमी जास्त करण्यासाठी या गिअर बॉक्सचा वापर केला जातो.
३) साईड बॉक्स :- पीटीओ शाफ्टच्या विशिष्ट गतीला रोटाव्हेटरमध्येप्रथम गिअर बॉक्समध्ये कमी केल्यानंतरदुसऱ्यांदा हि गती साईड ड्राईव्ह मध्ये केली जाते.साईड ड्राईव्ह मध्ये गिअर चक्रीय गती करण्याचे उद्दिष्ट साधले जाते.
४) नांग्या किंवा पाते :- रोटाव्हेटरची पाती फ्लांजवर जोडलेली असतात. पाती गरजेनुसार कमी –जास्त करता येतात. साधारणतः एका फ्लांजवर २४ ते ३० नांग्या असतात. यांची जोडणी विशिष्ट वक्राकार पद्धतीने केलेली असते. फ्लांज चक्राकार फिरणाऱ्या शाफ्ट वर बसवलेली असतात. नांग्या बोथट झाल्या किंवा तुटल्या तर त्या पुन्हाबसविता येतात. नांग्या या विशिष्ट एल-सी आकाराच्या असतात, तसेच लांब दांडीच्या किंवा सरळ दांडीच्या नांग्या विविध प्रकारच्या व आवश्यक त्या मशागतीसाठी वापरता येतात.
रोटाव्हेटर यंत्राची जोडणी :-
- यंत्र जोडत असतांना ते सपाट जमिनीवर ठेवावे.
- रोटाव्हेटर यंत्र मध्यापासून समान अंतरावर ठेवावे.
- हायड्रोलिक टॉपलिंक चेनच्या सहाय्याने समान अंतरावर ठेवावी
मशागतीपूर्वीघ्यावयाची काळजी :-
- यंत्र सरळ रेषेमध्ये बसले आहे का ते तपासून पहावे. सर्व नटबोल्ट घट्ट पिळून घ्यावेत.
- यंत्र ज्या निर्मात्याचे आहे, त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार जोडणी करावी. यंत्रास गती देणारे भाग, गिअर इत्यादींचे ग्रीसिंग करून घ्यावे.
- खोली नियंत्रित करणाऱ्या पट्टीद्वारे खली नियंत्रित ठेवावी. यंत्रवापरण्यापूर्वी ते जमिनीवर समपातळीत आहे, याची खात्री करावी.
- रोटाव्हेटर यंत्राचा वेग मध्य ठेवून मशागत पूर्ण होईपर्यंत एकसारखा ठेवावा. यंत्रास गती देणाऱ्या नांग्या फिरत आहेत का, याकडे लक्ष द्यावे.रोटाव्हेटरच्या बेअरिंग व नांग्यांमध्ये कचरा, तणअडकल्यास ते काढावे.
रोटाव्हेटर यंत्राची देखभाल:-
- रोटाव्हेटरच्या फिरणाऱ्या दात्यासाठी जादा शक्तीची गरज असते. ही शक्ती रोटाव्हेटरचा रोटर फिरविण्यासाठी, ट्रॅक्टरला योग्य गती देण्यासाठी; तसेच खोलवर मशागत होऊन माती मिसळण्यासाठी आवश्यक असते. तेव्हा पुरेशा अश्वशक्तीचा ट्रॅक्टर निवडणे गरजेचे असते.
- रोटाव्हेटरचे आयुष्यमान वाढविण्यासाठी व इतर अडचणी कमी करण्यासाठी ट्रॅक्टरचा पी.टी.ओ. शाफ्ट सरळ रेषेत कार्यरत राहील याची दक्षता घ्यावी.
- ट्रॅक्टर व रोटाव्हेटरला जोडणाऱ्या प्रोपेलर शाफ्टची लांबी योग्य प्रमाणामध्ये ठेवावी.
- जेव्हा रोटाव्हेटर उचललेला असेल, तेव्हा युनिव्हर्सल जॉइंटचा कोन 40 अंशांपेक्षा जास्त नसावा. पी.टी.ओ. शाफ्टला योग्य प्रकारे वंगण द्यावे. वंगणाअभावी ट्रॅक्टरच्या पी.टी.ओ. शाफ्टमधील आणि रोटाव्हेटरच्या गिअर बॉक्समधील बेअरिंग्ज आणि सील खराब होणार नाहीत.
दररोजची देखभाल
- संपूर्ण मशिनला वंगण द्यावे व सर्व ग्रीसिंग पॉइंट्सना ग्रीस लावावे.
- रोटाव्हेटरच्या गिअरबॉक्समधील वंगण तेलाची पातळी तपासावी व गरज असल्यास योग्य पातळीपर्यंत वंगण तेल भरावे.
- रोटाव्हेटरच्या रोटावरची नांग्यांची पाती ढिली झालेली नाहीत, तसेच वाकलेली किंवा मोडलेली नाहीत याची खात्री करून घ्यावी; तसेच नांग्यांच्या पुढच्या कडांची झीज तपासावी.
- मशिनचे सर्व नट-बोल्ट्स घट्ट आवळून बसवावेत.
- रोटरच्या बेअरिंगमध्ये काडी-कचरा किंवा तार किंवा इतर काही रोटरसोबत गुंडाळलेले नाही याची खात्री करून घ्यावी.
कालांतराने करावयाची देखभाल
- रोटाव्हेटरच्या रोटरवरील नांग्यांची तपासणी करावी. नांग्यांची पाती वाकलेली असल्यास हूक – पाना वापरून सरळ करावीत. नांग्या खराब झाल्या असल्यास बदलाव्यात.
- रोटाव्हेटरच्या गिअरबॉक्समधील वंगण तेलाची पातळी तपासावी, तसेच सर्व वंगण तेल बाहेर काढून गिअरबॉक्स स्वच्छ करावा व नवीन वंगण तेलाने भरावा.
- रोटाव्हेटरचे चेनकव्हर काढून चेन व स्प्रॉकेट चाकाची झीज तपासावी, तसेच चेनचा ताणही तपासावा व चेनला वंगण द्यावे.
- सर्व बेअरिंग्ज तपासावेत व त्यांना वंगण द्यावे.
- रोटाव्हेटरचा रोटर व रोटरवरील नांग्यांच्या पात्यांची मांडणी तपासावी.
महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.