कोंबड्यांना द्या पर्यायी खाद्य घटक

0

कुक्कुट खाद्यामध्ये मका व सोयाबीनचा ऊर्जा व प्रथिनांचा मुख्य स्रोत म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या खाद्य घटकावरील ताण कमी करण्यासाठी त्यास पर्याय म्हणून असणारे खाद्य घटक उपयोगात आणणे जरुरीचे आहे. त्यासाठी काही पारंपरिक खाद्यघटकांचा सहजपणे कुक्कुटखाद्यात समावेश करता येतो. 
डॉ. मुकेश कापगते, डॉ. मयूर विसपुते

कुक्कुट पालनामध्ये ६५ ते ७० टक्के खर्च हा खाद्यावर होत असतो. अपारंपरिक खाद्य घटकांची किंमत त्यांच्या उपलब्धतेवर, अवलंबून असते. मका व सोयाबीनच्या कमी उपलब्धतेमुळे स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध असणाऱ्या खाद्य घटकांचा वापर करणे अपरिहार्य ठरते. विभिन्न पीक पद्धती व हवामानामुळे विविध अपारंपरिक खाद्य घटक उपलब्ध होतात. परंतु, खाद्य घटकांची पोषकता, आहार उपयुक्तता, त्यांचा सुरक्षित स्तरावर आहारातील समावेश व त्यातील अपायकारक घटकांबद्दल विश्‍वसनीय माहितीचा अभाव यामुळे हे घटक कमी प्रमाणात वापरले जातात. त्यासाठी पारंपरिक खाद्यघटकातील अपायकारक घटक कमी करण्याच्या प्रक्रिया जाणून घेऊन पारंपरिक घटकांचा कुक्कुटखाद्यात सुरक्षित अंतर्भाव करावा.

हि माहिती आपण  www.krushisamrat.com वर वाचत आहात.

१. ज्वारी : 
– कुक्कुट खाद्यात मक्यानंतर ज्वारी हे तृणधान्य वापरतात. 
– ज्वारीमध्ये ०.२ ते २.० टक्के टॅनिन हा घटक असतो. जो कोंबड्यांसाठी अपायकारक असतो. पांढऱ्या रंगाच्या ज्वारीच्या वाणामध्ये टॅनिनचे प्रमाण कमी असते तर लालसर रंगाच्या ज्वारीमध्ये टॅनिनचे प्रमाण जास्त असते. 
– ज्वारीचे लेअर कोंबड्यांच्या वाढीच्या अवस्थेत मक्याला पर्याय म्हणून वापरली जाऊ शकते.
– अलीकडच्या काळात ज्वारीचे पिवळे वाण विकसित झाल्यामुळे कुक्कुट खाद्यात ज्वारीचा समावेश मक्याच्या ७५ टक्के इतका यशस्वीरीत्या करता आला. 
– ज्वारीतील टॅनिनचे प्रमाण ०.५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास आहारातील प्रथिनांची उपलब्धता कमी होते व पक्ष्यांची वाढ खुंटते. यासाठी ज्वारीतील टॅनिन कमी करण्यासाठी विविध पद्धती विकसित करण्यात आल्या आहेत.

२. गहू : 
– तुटलेला, जाडा – भरडा, निष्कृष्ट दर्जाचा किंवा चांगल्या दर्जाचा गहू कुक्कुट आहारात वापरता येतो. 
– अरॅबिनोझायलान्स हा अपायकारक पदार्थ पक्ष्यांच्या आतड्यांमध्ये इतर अन्नद्रव्यांच्या शोषणास बाधा निर्माण करते. काढणीच्या हंगामानंतर लगेचच गव्हाचा वापर पक्ष्यांच्या खाद्यात केल्याने त्याचा काही भाग पक्ष्यांच्या चोचीला चिकटून बसतो व चोचीचा काही भाग कुजला जाऊ शकतो. 
– अरॅबिनोझायलान्समुळे लहान पिल्ले गव्हाचा प्रभावीपणे वापर करू शकत नाही. 
– गव्हाचा पक्षांच्या खाद्यामध्ये समावेश करण्यापूर्वी गहू जाडेभरडे दळणे व त्यात ५ टक्के तेलरहित—भाताचा कोंडा मिसळणे गरजेचे आहे. 
– खाद्यामध्ये गव्हाचा समावेश असेल तर अरॅबिनोझायलान्स या अपायकारक पदार्थांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी झायलानेज या विकाराचा समावेश करणे फायदेशीर ठरत आहे.

हि माहिती आपण  www.krushisamrat.com वर वाचत आहात.

३. भाताची कणी : 
– भाताची कणी लहान मांसल पक्ष्यांमध्ये १० टक्के तर मोठ्या मांसल पक्ष्यांमध्ये २० टक्के या प्रमाणात वापरता येते. भाताच्या कणीमध्ये अपायकारक घटक नसतो.

४. बाजरी : 
– मका व ज्वारी यांच्या तुलनेत बाजरीमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. प्रभावी परिणामासाठी बाजरीचा मक्याच्या ३० टक्केपर्यंत अंतर्भाव करू शकतो. 
– बाजरीवर कठीण तंतुमय आवरण असल्याने त्याची उपलब्ध ऊर्जा मक्याच्या तुलनेत कमी असते, त्यामुळे पक्षी खाद्यातील बाजरीचा समावेश मर्यादित आहे.

हि माहिती आपण  www.krushisamrat.com वर वाचत आहात.

५. ओट : 
– ओटमध्ये तंतुमय पदार्थांचे प्रमाण जास्त (१०-१२ टक्के) असल्याने ओट चा कुक्कुट खाद्यामध्ये मर्यादित समावेश केला जातो. ओटमध्ये बीटा- ग्लूकॅन्स हा अपायकारक पदार्थ आढळतो. 
– बीटा – ग्लूकॅन्समुळे अन्नद्रव्यांची उपलब्धता सुधारते व पक्ष्यांचे उत्पादन वाढवण्यास मदत होते.

६. भाताचा कोंडा : 
– भाताचा कोंडा साधा व तेलरहित असा दोन प्रकारांत मिळतो. साध्या भाताच्या कोंड्यात ऊर्जेचे प्रमाण जास्त असते तर तेलरहित भाताच्या कोंड्यात ऊर्जेचे प्रमाण कमी असते. 
– तेलरहित भाताचा कोंडा वापरल्याने खाद्यात धुळीचे प्रमाण वाढते व त्याची रुचकरता कमी होते. ही समस्या कमी करण्यासाठी खाद्यामध्ये ….चरबी किंवा उसाची मळी मिसळावी. 
– भाताच्या कोंड्यामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असल्याने जास्त काळ साठवणूक केल्यास भात कोंड्याचा कुबट वास येतो. 
– भात कोंड्यामध्ये दळलेल्या टरफलांची भेसळ केली जाते, त्यामुळे त्यात तंतुमय पदार्थ व रेती यांचे प्रमाण वाढते.

हि माहिती आपण  www.krushisamrat.com वर वाचत आहात.

७. गवार कोर्मा / चुरा : 
– यामध्ये प्रथिनांचे प्रमाण ४०-४२ टक्के असते. तसेच ट्रीप्सिन इनहिबिटर, हिमॅग्लुटिनिन आणि युरिएज हे अपायकारक पदार्थ असतात. 
– अपायकारक पदार्थ कमी करण्यासाठी गवार कोर्म्याला गरम शेक देणे गरजेचे आहे. याचा उपयोग २.५ ते ५ टक्के पर्यंत कुक्कुट खाद्यात केला जाऊ शकतो.

टीप – वरील खाद्य घटक तज्ञांच्या सल्ल्यानेच कोंबड्यांना द्यावेत.

संपर्क : डॉ. मुकेश कापगते, ९५३६१०४९०८ 
(केंद्रीय पक्षी संशोधन संस्था, इज्जतनगर, बरेली, उत्तर प्रदेश)

महत्वाची सूचना :- सदरची माहिती हि कृषी सम्राट यांच्या वैयक्तिक मालकीची असून आपणास इतर ठिकाणी ती प्रसारित करावयाची असल्यास साभार सौजन्य:- www.krushisamrat.com असे सोबत लिहणे गरजेचे आहे.

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.