कोकणच्या हापूसला ‘जीआय टॅग’

0

कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्हा तसेच आजूबाजूच्या परिसरातील  हापूस  आंब्यावर शेवटी  जीओग्राफिकल इंडिकेशन टॅगची (GI टॅग) मोहर बसली  आहे. त्यामुळे  हापूसचं मूळ कोकणच असल्याचं व तसेच तिथे पिकणारा हापूस आंबा खरा हापूस असल्यावर शिक्कामोर्तब केला गेला.
एखाद्या उत्पादनाचे भौगोलिकदृष्ट्या मूळ स्थान दर्शविण्यासाठी जीआय टॅग  वापरला जातो. असे केल्याने संबंधित उत्पादानाचा दर्जाचेही मापदंड ठरत असतात. या अगोदर महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, बनारसी साडी,  दार्जीलिंगचा चहा, जयपूरची निळी पोटरी, तिरुपतीचे लाडू यासह भारतातील ३२५ उत्पादनांना जीआय टॅग मिळालेला असून त्यात आता फळांचा राजा म्हणजेच कोकणातील हापूसलाही स्थान मिळाले आहे. हापूसला भौगोलिक मानाकन म्हणून बौध्दिक संपदा कायद्यांतर्गत जाहिर झाले आहे. केंद्रीय आद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभागाने मानांकनाची अधिकृत घोषणा केली. या मानांकनामुळे हापूस आब्यांची ओळख आता जागतिक पातळीवर अधोरेखित करण्यात आली आहे. कोकणला याचा मोठा आर्थिक फायदा होणार आहे. आंबा बागायतदार शेतकरी तसेच आंबा व्यापारात गुंतलेल्या सर्वच घटकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी नुकताच हापूसच्या जीआय टॅगचा लोगो आणि टॅगलाइनचे उद्घाटन केले. जीआय टॅगमुळे मूळ उत्पादनाला व त्याच्याशी संबंधित घटकांना योग्य मोबदला मिळण्यास हातभार लागेल. आजवर भारतातील अनेक उत्पादनांना जीआय टॅग प्रदान करण्यात आला असून त्यातून एकप्रकारे उत्पादन प्रक्रियेत सहभागी असलेल्या घटकांना हमीच मिळाली आहे,

हापूसची निर्यात वाढ

हापूस आंबा महाराष्ट्रातील कोकण विभागात पिकणारा जगप्रसिद्ध आहे. देशात तर आहेच तसेच परदेशातही हापूसला मोठी मागणी आहे. जगातील सर्वाधिक लोकप्रिय फळांमध्ये हापूसचा समावेश आहे. कोरिया, युरोप, जपानमध्ये हापूसची आतापर्यंत मोठ्या प्रमाणात निर्यात होत होती आणि आता अमेरिका व ऑस्ट्रेलियातही हापूसची निर्यात सुरू झाली आहे.

कायद्याचे संरक्षण

कोकण आणि आसपास भागातील आंबे वगळता जीआय टॅगमुळे इतर कोणत्याही आंब्यांना आता हापूस असे संबोधता येणार नाही किंवा त्यांची विक्री करताना हापूस असा उल्लेख करता येणार नाही. या अगोदर  हापूस आंबा म्हणून कर्नाटक, आंध्र प्रदेश किंवा गुजरातचा आंबाही सरसकट विकला जायचा. अस केल्याने  ग्राहकांची फसवणूक तर होत होतीच शिवाय कोकणातील हापूस उत्पादकांचेही नुकसान होत होते. त्यावर कायदेशीर कारवाई करणे शक्य होत नव्हते. हापूस आंब्याला आता भौगोलिक मानांकन मिळाल्यामुळे यापुढे अशी फसवणूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाही करता येणार आहे.

३१ उत्पादनांना जीआय टॅग महाराष्ट्रात

आजपर्यंत भौगोलिक देशातील ३२५ उत्पादनांना मानांकन प्राप्त झाले आहे. यामध्ये ३१ उत्पादनांचा महाराष्ट्रातील  समावेश आहे. या उत्पादनांत आजरा घनसाळ, सोलापुरी चादर, नाशिकची द्राक्षे,  सोलापुरी टॉवेल, उपडा जमदानी साडी, पुणेरी पगडी, पैठणी साडी, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, , वारली पेटिंग, कोल्हापुरी गुळ, तांदूळ, वायगाव हळद, मंगळवेढा ज्वारी, भीवापूर मिरची, सिंधुदुर्ग व रत्नागिरी कोकम, वाघ्या घेवडा, नवापूर तूरडाळ, आंबेमोहर तांदूळ, वेर्गुला काजू, सांगली मनुका, लासलगाव कांदा, डहाणू घोळवड चिक्कू, बीडचे सिताफळ, जालन्याचे गोड संत्री, जळगावची केळी, मराठवाड्याचे केसर आंबे, पुरंदरचे अंजीर, जळवागचे वांग्याचे भरीत, सोलापूरचे डाळिंब, नागपूरची संत्री, करवत काटी साडी आणि आता कोकणच्या जगप्रसिद्ध  हापूस आंब्यास भौगोलिक मानांकन जाहीर झाले असून खूप मोठी चांगली बाब आहे.

 

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

https://whatsapp.heeraagro.com

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.
Leave A Reply

Your email address will not be published.