जनुकीय परीवर्तीत पिके

0

जनुकीय परीवर्तीत (GM) बियाणे किंवा रोप हे दुसऱ्या रोप, प्राणी अथवा सूक्ष्मजीव यांचे जनूक अनैसर्गिक पद्धतीने मिसळून तयार केले जाते. भारतात हे तंत्रज्ञान 1997 पासून आले. तसे पाहता हे तंत्रज्ञान एक वरदानच होते. म्हणजे या तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उत्पादन देणाऱ्या, रोगाला थोपवू शकणाऱ्या, कमी पाण्यात तग धरू शकणाऱ्या बियाण्याची निर्मिती करता आली. काही प्रमाणात हे प्रयोग यशस्वी देखील झाले. उदा. B.T. (Bollworm Tolerent) कापसाच्या बियाण्यामुळे बोलवर्म या अळीपासून बचाव झाला आणि म्हणून कापसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

1982 साली सर्व प्रथम तंबाखू या पिकाचे GM पिक घेतले गेले. आणि 1987 साली Plant Genetic System या कंपनीने GM बियाण्याची निर्मिती सुरू केली. सुरूवातीपासूनच GM पिके ही वादाच्या भोवऱ्यात राहिलेले आहे. संपूर्ण जगात या बाबतीत एकमत नाही आहे. ते मग देशांतील सरकार असोत, शास्त्रज्ञ असोत, NGO असोत अथवा स्वयंसेवी संस्था असोत, यात GM पिकाबाबत, त्याच्या परिणामांबाबत, त्याच्या Side Effects बाबत एकमत नाहिये. काही संशोधानामध्ये असे दिसून आले आहे की GM पिकांमुळे निसर्ग, पर्यावरण, कृषी, पशूपक्षी व मानव जातीच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. GM बियाणे किंवा रोपांची निर्मिती अनैसर्गिक असल्याने सेंद्रिय शेतीत त्यांच्या वापरावर बंदी आहे. त्याअधिक, GM पिक असलेल्या 1 किलोमीटर त्रिज्येतील पिक हे सेंद्रिय म्हणून गणले जात नाही.

 

GM पिक किंवा अन्न का नको?

१) GM पिकांमध्ये अनैसर्गिक पद्धतीने दुसऱ्या प्राणी सूक्ष्मजीव अथवा पिकांचे जनूक मिसळले जाते. म्हणजे कापसावरील बोंड अळी नियंत्रणासाठी जमीनीतील सूक्ष्मजीवाचे जनूक वापरले जाते, टोमॅटोची साल जाड करण्यासाठी डुकराचे जनूक वापरले गेले. अशा पिकांमुळे हवा तो बदल झालाच पण पिकावरील किड व रोग मोठ्या प्रमाणावर वाढले. एका संशोधनानुसार ९७% शेतकरी आत्महत्या या BT कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या होत्या.

२) GM पिकावर येणाऱ्या रसशोषक किडींमुळे उदा. मधमाशी, फळमाशी. GM पिकाचे जनुक दुसऱ्या पिकावर अथवा तणावर अथवा फळपिकावर मिसळते. यामुळे असे तण लवकर वाढते आणि त्यावर नियंत्रण मिळवणे जिकरीचे होते.

३) वेगवेगळ्या ठिकाणी GM अन्न सेवनामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

४) काही संशोधनानुसार GM पिकामुळे दुसऱ्या वनस्पती वर नपुंसकत्व आल्याचे आढळून आले आहेत.

५)  अजूनही पुर्णपणे एकमत असलेले GM पिक तयार नाही त्यामुळे याचा Side Effect होणार नाही हा दावा कोणीच करू शकत नाही.

 

भारतात GM पिकाची स्थिती

भारत सरकार ने अजूनही GM पिकाला पुर्णपणे मान्यता दिलेली नाही. याबाबत सत्ताधारी पक्षाचे असे विचार आहेत की जोपर्यंत सर्वमान्य GM पिक येणार नाही तोपर्यंत भारतात बंदी च राहील. सत्ताधारी पक्षाचे Think Tank रा. स्व. संघ सुरवातीपासूनच GM पिकाच्या विरोधातच राहिलेले आहे. त्यामुळे हे सरकार असेपर्यंत तरी GM पिकाला मान्यता मिळणे कठीण आहे.

 

 

– भावेश सोमाणी

  ८३२९२१५४९०

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.