गांडूळ खत : शेतीस वरदान

0

गांडूळला शेतकऱ्याचा मित्र म्हटले जाते. गांडूळ जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातात आणि खाल्यानंतर त्यांच्या शरिराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग बाहेर टाकतात त्यालाच गांडूळ खत म्हणजेच व्हर्मी कंम्पोस्ट म्हणतात

भारत देशात रासायनिक खताचे आगमन व त्याचा वापर होण्यापूर्वी शेतकरी शेणखत, कंपोस्ट खत, गाळाचे खत, निरनिराळ्या पेंडींचा वापर, पिकाची फेरपालट यांच्याद्वारे जमिनीची सुपीकता टिकवून ठेवत असे. कालांतराने शेतकरी रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करू लागले व त्यामुळे त्याचा दुष्परिणाम पिकावर तसेच जमिनीत दिसून येऊ लागला. त्यामुळे शेतकरी, पाणी, प्राणी, पक्षी, मानवी आरोग्य व गांडूळ मित्रांचे अस्तित्वच धोक्यात आले.


गांडूळाची ओळख :-
गांडूळ हा प्राणी शेतकऱ्याला नविन नाही. मराठीत त्याला गांडूळ, दानवे, वाळे, केचवे, शिदीड, काडू अथवा भूनाग असे म्हणतात. कंपोस्ट खड्डयात, उकिरड्यात किंवा शेतात सर्वत्र हा प्राणी आढळून येतो. परंतु हल्ली शेतातून त्याचे अस्तित्त्व नष्ट झालेले आहे. त्याची प्रमुख कारणे बेसुमार रासायनिक खतांचा वापर, मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर आणि सेंद्रिय खताचा कमी वापर ही होत. गांडूळ दंडगोलाकार असून, गांडूळाचा रंग तांबूस, तपकिरी, लालसर असतो. गांडूळाचे श्वसन त्वचेमार्फत होते. त्यासाठी त्वचा ओलसर असावी लागते.

गांडूळाचा जीवनक्रम :-
गांडूळ हा उभयलिंगी प्राणी आहे. गांडूळ हा प्राणी बीळ करून राहणारा आहे. बिळात राहून सतत तोंडावाटे माती व सोबत येणारा सेंद्रिय पदार्थ गिळून विष्ठा बाहेर टाकतात. सेंद्रीय पदार्थ हे गन्दुलाचे मुख्य अन्न होय. म्हणून ते मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय पदार्थ खातात. इतर गांडुळे माती खातात तेव्हा त्या मातीतील सेंद्रिय पदार्थ त्यांना मिळतात. गांडूळामुळे जमिनीची सुपीकता वाढते, कारण जमिनीतील खनिज नत्राचे प्रमाण वाढते आणि तो नत्र पिकांना मिळतो. गांडूळाच्या शरीराच्या कोरडया वजनाच्या ७२% प्रथिने असतात. मेलेल्या गांडूळाचे शरीर जमिनीत कुजल्यानंतर पिकांना नत्र मिळतो.

 

गांडुळखताचे फायदे :-
1. जमिनीचा पोत सुधारतो.
2. मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो.
3. गांडुळाच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते.
4. जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
5. जमिनीची धूप कमी होते.
6. बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते.
7. जमिनीचा सामू (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो.
8. गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात.
9. गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामूळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात.
10. जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत भरमसाठ वाढ होते.
11. ओला कचरा व्यवस्थापन पण होते.
12. मातीचा कस टिकून राहतो
13. या खतामुळे मातीमधील सूक्ष्मजीव टिकून राहतात.
जागेची निवड व बांधणी:-
गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. तसेच खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत, कारण या झाडाची मुळे गांडुळखतामधील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळखत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असल्याने त्यासाठी छप्पर तयार करून घ्यावे.गांडूळ खत निर्मितीसाठी इसिनीया फेटीडा ही जात सगळीकडे मोठया प्रमाणात वापरली जाते.https://krushisamrat.com/vermicompost-fertilizer-using-sugarcane-powder/

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.