फळप्रक्रिया

1

फळपीक हे अधिक फायदेशीर होण्यासाठी फळांचे प्रक्रियायुक्त पदार्थ जास्त उपयुक्त ठरतात. फळप्रक्रियाद्वारे फळांसारख्या नाशवंत अशा शेतमालाचं टिकाऊ पदार्थांत रूपांतर करता येतं.

फळांचा उपयोग करुन टिकाऊ असे रस, पेये, सरबत, जाम, जेली, मार्मालेड, मुरंबा, पिकवलेली फळ, हवाबंद डब्यातली फळं, चटणी सॉस, लोणची, फळ सुकवून त्यापासून सुकी फळं, सुक्या फोड़ी, सुकी फळं पावडर तसंच वाईन्स आणि व्हीनेगर असे अनेक विविध पदार्थ तयार करता येतात.

फळप्रक्रिया पदार्थ तयार करण्यासाठी खुपशा अनुदानित सवलतीही आहेत. निर्यातीला खुप मोठा वाव आहे. म्हणून फळप्रक्रियेकड़े आपण सर्वांनी जास्त लक्ष द्यायला हवं. रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग लागवडीद्वारे फलोत्पादन विकास योजनेत आंबा, चिक्कू, बोर, पेरू, डाळीब, नारळ, द्राक्ष, काजू, अंजीर, आवळा, फालसा, कोकण, चारोळी, लिची, संत्रा, मोसंबी, फणस,चिंच, सीताफळ, कवठ, जांभूळ, अननस, अशा अनेक फळांचा समावेश आहे.या विविध फळांचे परिक्षण करुन प्रक्रिया पदार्थ तयार करता येतात.

 

रस, पेये, सरबते :

ज्या फळांत भरपूर रस असतो, त्यापासून हे पदार्थ तयार करता येतात. आंबा फळांची साल काढून आमरस तयार करता येतो.मशिनच्या सहाय्याने कोकम, जाम्भळाचा रस काढता येतो. संत्रा, मोसंबी, पपनस, डाळीबदाने, फालसा, बोर, पेरू, कागदी लिम्बू या फळांचा रस काढता येतो. पोटैशियम मेटाबाय सल्फाईड अगर रसरंगीत असल्यास सोडियम बेन्साईट या रासायनिक परिरक्षक पदार्थांचा वापर करुन रस नैसर्गिक अवस्थेत बाटल्यात भरून टिकवून ठेवता येतो.कही रसांत साखर, सिट्रिक असिड, पाणी स्वादकाचा वापर करुण पेये बनवता येतात.

फळ रसाचा स्कवौझ :

आंबा, जांभूळ, फालसा, डाळीब, संत्रा, मोसंबी, बोर, कोकम या फळांचा रस कमीत कमी २५% तसेच सिट्रिक आम्ल, साखर आणि पाणी याचं प्रमाणबद्ध मिश्रण करुन स्कवौझ बनवितात.  स्कवौझ पावडर पोटैशियम मेटाबाय सल्फाईड अगर सोडियम बेन्साईट या रासायनिक संरक्षकाचा वापर करुन तो बाटल्यास भरून ठेवता येतो.

 

फळांची डबाबंदी :

हवाबंद डब्यात साखरपाक सिट्रिक आम्ल यांचा योग्य प्रमाणात वापर करुन आंब्याच्या फोड़ी, पेरूच्या फोड़ी, संत्रा-मोसंबीच्या फोड़ी, केळी-अंजीर लिची बोरे, आवळा, सीताफळाचा गर, डाळीब दाणे, आंबागर, इ. पदार्थ टिकवून ठेवता येतात.

 

जैम, जेली, मार्मालेड तयार करणे :

फळे, साखर, सिट्रिक आम्ल आणि गरजेप्रमाणे पेक्टिन याचं प्रमाणबद्ध मिश्रण आटवून रबड़ीसारख्या घट्ट केलेल्या पदार्थास जाम म्हणतात. खास करुन आंबा, चिक्कू, जांभूळ, सीताफळ, रामफळ, लिची, फणस, अंजीर यांचा जाम तयार करता येतो.

जेली तयार करण्यासाठी वापरायच्या फळांमध्ये पेक्टिनचं प्रमाण चांगलं असावं लागतं.पेरू आणि कवठ या फळांपासून जेली तयार करता येते.

जैम अगर जेलीमध्ये त्या त्या फळांच्या सालीचा किस अगर तुकडे मिसळल्यास मार्मालेड टायर होते.

 

मुराम्बे आणि पिकवलेली फळे :

फळे स्वच्छ करून त्यांना बोचुन फळाचं आणि साखरेचं प्रमाण ४५:५५ ठेवून आवळा आणि बोरांचे मुरम्बे तयार करता येतात. पाकांत फळांचे लहान लहान तुकडे करून टाकले असता बोर, पपईपासून टूटी-फ्रूटी तयार करता येतात.

 

फळं सुकविणे :

द्राक्ष अंजीर ही उन्हात वाळवन्याची प्रथा फार पुरातन काळातली आहे. बेदाणा याच पद्धतीने तयार करतात. कच्च्या आंब्याची साल काढून फोड़ी करून त्या वाळवतात. त्याची पावडर ‘आमचूर’ म्हणून विविध खाद्यपदार्थात वापरतात. डाळीबाचे दाणे वाळवून त्यापासून किस, बोरकूट तयार करतात. आवळा फळांचे तुकडे करून वाळवून सुपारी करतात. मसाले, मिरचीपूड आणि व्हीनेगर वापरून चटण्या, सौसस, लोणची तयार करता येतात.

 

अशा प्रकारे वेगवेगळ्या फळांचा सुयोग्य पद्धतीने वापर करून फळप्रक्रिया उद्योग सुरु करून दोन पैसे जास्त मिळविता येतात.

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.

1 Comment
  1. […] फळप्रक्रिया […]

Leave A Reply

Your email address will not be published.