उदगीर/प्रतिनिधीउदगीर महसूल मंडळातील शेतकर्यांसाठी इस्त्राईल सरकार, महाराष्ट्र शासन, कृषी विभाग व दैनिक सकाळच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण राज्यभर शेतकर्यांसाठी महाराष्ट्र कौशल्य विकास प्रकल्पाचे आयोजन केले आहे.उदगीर महसुल मंडळ, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाकडील प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (mssds ) यांचेव्दारे सिमँसिक इंटरनॅशनल इंटरडिसिप्लीनरी लर्निंग सेंटर, पुणे (siilc ) व पेलेडियम कन्सल्टींग इंडिया प्रा. लि. नवी दिल्ली (pcipl ) यांच्या सहकार्याने छत्रपती राजाराम महाराज उद्योजकता व कौशल्य विकास अभियान या कौशल्य विकास प्रकल्पात शेती विषयक सर्व प्रकारच्या पिकांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच केंद्र व राज्य सरकार, केंद्र व राज्य कृषी विभागाकडून शासनाकरवी राबविण्यात येणार्या विविध शासकिय व निमशासकीय अनुदानीत योजनांची माहिती, विविध शेतीविषयक प्रकल्प व कशा प्रकारे लाभ घ्यावा, यासंदर्भातही मोलाचे मार्गदर्शन तीन दिवशीय शेतकरीवर्ग प्रशिक्षण केंद्रात दिले जाणार आहे. तसेच सोयाबीन, तूर, हरभरा, ऊस, ज्वारी, व इतर सर्व पिकाचे उत्पादन कसे वाढेल, कोणकोणते बि-बियाणे व खते यांचा वापर कशा पध्दतीने करून शेतीतील पिकांचे जास्तीत जास्त उत्पादन वाढीकरिता कृषी तंत्रज्ञानाचा वापर करणे बाबत कृषीतज्ञ यांचे मोलाचे मार्गदर्शन दिले जाणार आहे.आपला शेतीतील कृषी उत्पादन माल कसा, कधी विकायचा, सर्व पिकांच्या वाणाची माहिती, गटशेतीची माहिती, आदी शेती विषयक माहिती देण्यासाठी आंतरराष्ट्रीय, देशपातळीवरील तथा महाराष्ट्र राज्यातील कृषीतज्ञ व पुण्यातील, नामवंत मंडळी येणार आहेत. या विकास प्रकल्पात येणार्या प्रत्येक शेतकर्यांना महाराष्ट्र शासनाचे प्रमाणपत्र, रूपये दोन लाखांचे अपघात विमा कवच आणि तीन दिवसासाठी भत्ता म्हणून 464 रूपये मिळणार आहेत. सहभागी शेतकर्यांचा रूपये 2 लाखांचा मोफत अपघात विमा काढण्यात येणार आहे. या प्रकल्पात सहभागी शेतकर्यांना तीन दिवशीय शेतकरी प्रशिक्षण वर्ग दररोज बायोमँट्रिक पध्दतीने होणार असून या तीन दिवसीय प्रशिक्षण वर्गातील आधारित प्रश्नांची परीक्षा घेतली जाणार आहे. यात पास होणार्या शेतकर्यांना दै. सकाळच्यावतीने दैनिक सकाळ, दैनिक अॅग्रोवन पेपरला यशोगाथा, लेख, बातम्यांव्दारा खंबीरपणे उभे राहून साथ दिली जाणार आहे. या प्रकल्पात सहभागी होण्यासाठी खालील गावातील शेतकर्यांनी संपर्क करावा.उदगीर महसूल मंडळात येणारी गावे :-उदगीर महसूल मंडळ उदगीर, निडेबन, माळेवाडी, कौळखेड, लोणी, सोमनाथपूर, मलकापूर, हकनकवाडी, तिवटग्याळ, बनशेळकी, मादलापूर, नागलगाव.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादीं ची माहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
https://whatsapp.heeraagro.com
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!