कापूस खरेदीत शेतकर्‍यांची फसवणूक

0

पोलीस स्टेशनमधूनही काढले बाहेर
जळगाव / प्रतिनिधी
जादा दराने भाव देत असल्याचे आमिष दाखवून व्यापार्‍याने शेतकर्‍यांकडून तोलामागे पाच किलो जास्त कापूस घेतल्याचा प्रकार बुधवारी समोर आल्याने आपण लुबाडले गेलो, असल्याची भावना होऊन शेतकर्‍यांनी संताप व्यक्त करत एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठले. शेतीत राबराब राबून कष्टाने निर्माण केलेला कापूस क्षणात व्यापारी लुटत होता.

काल काही शेतकर्‍यांकडून कापूस व्यापार्‍याने 5 हजार चारशे ते 5 हजार पाचशे रूपयाचा जादा भाव देऊन कापूस खरेदी केला होता. शिरसोली येथील वसंत वाणी यांच्या घरात मंगळवारी 12 क्विंटल 15 किलो कापूस मोजून ठेवला होता. बारी यांचा कापूस व्यापार्‍याने वजन माप करून घेतला असता 8 क्विंटल 99 किलो भरल्याने बारी कुटुंबिय आश्‍चर्यचकित झाले. दरम्यान आज सकाळी हरचंद बारी यांच्याकडील कापूस मोजण्यासाठी व्यापारी आला असता मोजमाप करताना त्यास पकडले. मापात जास्तीचा कापूस दुसर्‍या पोत्यात भरून वाहनात टाकला जात होता. नंतर गावातील व्यापारी प्रशांत काटोले यांच्याकडील वजनकाटा आणून शेतकर्‍यांनी खात्री केली असता व्यापारी 40 किलोमागे 4 ते 5 किलो कापूस जास्त घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यामुळे यापूर्वी या व्यापार्‍याने घेतलेल्या शेतकर्‍यांचीही अशीच फसवणूक केली असावी, असा संशय व्यक्त करत शेतकर्‍यांनी संताप केला.

या शेतकर्‍यांची झाली फसवणूक
व्यापार्‍याने कापूस खरेदी करून त्यांची फसवणूक केल्याची खात्री झाली. त्यात वसंत बारी, गोकुळ भुते, सुरेश बनसोड, रमेश पाटील, अर्जुन खलसे, रघुनाथ बारी, विठ्ठल बारी, आत्माराम बारी, प्रभाकर बारी, अनिल पाटील,विष्णू पाटील, हरिदास काटोले, रामदास बारी, रमेश पाटील, वासुदेव बारी, संजय बारी, भास्कर बारी, देवराज कोळी, रवींद्र कोळी, पंडित बारी, विजय बारी, प्रल्हाद आंबटकर, प्रभाकर आंबरकर, बाबुलाल आंबटकर, सुरेश काटोले, मधुकर आंबटकर, प्रमोद पाटील, विष्णू ताडे, संजय ताडे, बापू पाटील, रवींद्र पाटील या शेतकर्‍यांचा समावेश आहे.

 

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.