माजलगाव धरणात पंधराशे एकरवर गाळपेरा -राजेेंद्र मस्के
बीड / प्रतिनिधी
ज्या ज्या वेळी टंचाई परिस्थिती निर्माण होते त्या-त्यावेळी यशवंत सेवाभावी संस्थेने पशुधन आणि शेतकरी जगविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याही वर्षी राज्यात आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ आहे. शेतकर्यांना आपले पशुधन जगविणे अवघड झाले आह, अशा परिस्थितीत गाळपेर्याच्या माध्यमातून चारा निर्मिती केली जात आहे. यासाठी यशवंत सेवाभावी संस्थेने पंधराशे एकर वर गाळपेरा सुरू केला असल्याचे राजेंद्र मस्के मित्रमंडळाचे सर्वेसर्वा मस्के यांनी सांगितले.
माजलगाव धरणाच्या बुडीत क्षेत्रात राज्यातील पहिल्या गाळपेर्याच्या उपक्रमास राजेंद्र मस्के यांच्या हस्ते सुरुवात झाली यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यात चार्याचा प्रश्न गंभीर झाल्याने प्रशासनाने शेतकरी व सेवाभावी संस्थांना गाळपेर्याच्या माध्यमातून चारा निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. स्वतः जिल्हाधिकारी यांनी यासाठी बैठक घेतली. या पार्श्वभूमीवर यशवंत सेवाभावी संस्थेने माजलगाव धरणाच्या बुडीत क्षेत्रातील पंधराशे एकर क्षेत्रात कार्य करण्याचा निर्णय घेतला. सोमवार 31 रोजी राजेंद्र मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत गाळपेरा घ्यायला सुरुवात झाली. यावेळी पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.पांडूळे, वडवणीचे तहसीलदार पवार, माजलगावचे तहसीलदार एन.जी.झंपलवाड, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.संतोष पालवे, वडवणीचे गट विकास अधिकारी कांबळे मॅडम, जिल्हा कृषी अधिकारी साळवे, माजी सभापती संदिपान खळगे, वडवणी चे नगरसेवक महादेव जमाले, प्रल्हाद धनगुडे, माजी नगरसेवक संजय नलावडे, माजी नगरसेवक शहाजी गायकवाड, सुधाकर चव्हाण, सरपंच वसंत गुंदेकर, डॉ.किशोर कागदे, सरपंच गणेश साबळे, देवगावचे सरपंच मुकूंद सुरवसे, देवडीचे सरपंच जालिंदर झाटे, माजी पं.समिती.सदस्य मच्छिंद्र झाटे, सरपंच बालासाहेब राऊत, बालासाहेब बादाडे, भागवत आंबूरे, भगवान बादाडे, पसरपंच लालासाहेब पन्हाळे, उपसरपंच सचिन आगाम, उपसरपंच बाळासाहेब गात, सरपंच गोखर घाडगे, माजी सरपंच ज्ञानेश्वर सुरवसे आदी उपस्थित होते.
बीड शहर बनणार स्वच्छता मॉडेल – नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर
बीड/प्रतिनिधी
स्वच्छता सर्वेक्षणाच्या अनुषंगाने बीड नगरपरिषदेला स्वच्छता मॉडेल बनवण्यासाठी गारवेज क्लिनीकच्या माध्यमातून जनजागृती राबवण्यात येणार असून हागणदारी मुक्तीसाठी बीड न.प.ला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नुकतेच सन्मानीत केले आहे. स्वच्छता सर्वेक्षणामध्येही बीड न.प.चा देशातील पहिल्या 10 क्रमांकात स्वच्छता मॉडेल म्हणून समावेश व्हावा यासाठी नागरीक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना आदिंनी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी केले आहे.
न.प.च्या सभागृहात स्वच्छ सर्वेक्षण 2019 यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्याधिकारी धनंजय जावळीकर, सभापती मुखीद लाला, न.से.विनोद मुळूक, गारबेज क्लिनिकचे प्रविण नायक, नंदकिशोर गांधी, सुजाता गुरू, प्रगती तिवारी नायक, जलील खान पठाण, सभापती सादेक भाई आदिंची उपस्थिती होती. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर म्हणाले, केंद्र सरकारच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरू असून या योजनेत बीड न.प.ला 2016 पासून समाविष्ट करून घेतली आहे. योजनेसाठी 8 कोटी 96 लक्ष रूपये निधी मिळाला असून यामध्ये स्वच्छतेच्या दृष्टीने ज्या-ज्या मशीनरीची खरेदी आवश्यक आहे ती केली जाणार असून कचर्यांची विल्हेवाट सायंटिफीक लँड फिल साईड तयार करण्यात येणार आहे. ओला आणि सुका कचरा वेगळा करून त्यापासून विविध वस्तू तयार करण्यात येणार आहेत.या शिवाय अॅप च्या माध्यमातून विविध सेवा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.