मेथी लागवड

3

हिरव्या पालेभाज्यांमध्ये सर्व महत्वाचे पोषक घटक असल्याने शरिराची वाढ तसेच चांगल्या आरोग्यासाठी त्या महत्वाच्या असतात. हिरव्या पालेभाज्या कॅल्शिअम, बीट कॅरोटीन आणि क जीवनसत्वाचा समृध्द स्रोतदेखील आहेत. रोजच्या जेवणात हिरव्या भाज्या समाविष्ठ केल्यामूळे अशक्तपणा टाळता येऊ शकतो आणि उत्तम आरोग्याला चालना मिळते. मेथीमध्ये असलेल्या विविध गुणधर्मांमुळे मेथीला शहरी भागात चांगली मागणी आहे. हे पाहता शहरालगतच्या भागात मेथीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मेथीची पाने आणि देठ भाजीसाठी तर बियांचा वापर मसाल्यामध्ये आणि लोणच्यात जास्त प्रमाणात केला जातो. मेथीमध्ये ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्वे तसेच प्रथिने, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम, लोह पुरेशा प्रमाणात असतात. मेथीमध्ये विविध औषधी गुणधर्म आहेत. मेथी ही पाचक असून यकृत व प्लिहा यांची कार्यक्षमता वाढविते. त्यामुळे पंचक्रियेची कार्यक्षमता वाढते.

 • हवामान

मेथीचे पीक खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात घेता येते. मेथी हे थंड हवामानातले पीक असले तरी उष्ण हवामानातही चांगले येते. विशेषतः कस्तुरी मेथीला थंड हवामान मानवते.

 • जमीन

मध्यम ते कसदार, पाण्याचा उत्तम निचरा होणारी व जमीनीचा सामू ६ ते ७ च्या दरम्यान असलेली जमीन मेथीला जास्त मानवते. गाळाच्या जमिनीत मेथी उत्तम प्रकारे येते.

 • सुधारित जाती

१. मेथी नं. ४७

२. पुसा अर्ली बंचिंग

३. आर. एम. टी – १

४. कस्तुरी

 • लागवड

लागवडीसाठी ३ x २ मीटर आकाराचे सपाट वाफे करून बी टोचून किंवा २० ते २५ सेंमी अंतरावर ओळीतून पेरावे. हेक्टरी ३५ ते ४० किलो बी लागते.

 • पाणी नियोजन

पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. पाणी हिवाळ्यात ८ ते १० दिवसांनी व उन्हाळ्यात ४ ते ५ दिवसांनी पाणी द्यावे. पावसाळ्यात गरजेप्रमाणे पाणी द्यावे.

 • खत व्यवस्थापन

हेक्टरी १० ते १२ बैलगाड्या शेणखत ४० किलो नत्र, ४० किलो स्फुरद आणि ४० किलो पालाश द्यावा. लागवडीनंतर ४० किलो नत्र प्रति हेक्टर द्यावे. पेरण्याचा वेळी १० किलो बियाणास २५० ग्राम रायझोबियम चोळल्यास उत्पादनात वाढ होते.

 • आंतरमशागत

मेथीवर १ टक्के युरियाची फवारणी केल्यास पिकाची वाढ चांगली होते. आवश्यकतेनुसार पिकातील तण काढून शेत तणमुक्त ठेवावे.

 • काढणी

बी पेरल्यानंतर ३०-४० दिवसात मेथी काढता येते. संपूर्ण रोपटे मुळापासून उपटून काढतात. किंवा जमिनीलगत कापून काढता येते. कस्तुरी मेथीचे जास्त खोडवे घेता येतात. पूर्ण वाढलेली कोवळी मेथी काढावी. काढणीस उशीर झाल्यास पाने कडवट होतात. भाजीच्या जुड्या बांधून विक्रीस पाठवाव्यात.

 • उत्पादन

देशी मेथीचे उत्पादन दर हेक्टरी १० ते १२ टन मिळते, कस्तुरी मेथीचे ६ ते ७ क्विंटल बियाणे मिळते.

 

➡️➡️➡️ शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.

 

https://whatsapp.heeraagro.com

 

मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.
3 Comments
 1. Anonymous says

  5

 2. Anonymous says

  1

 3. Anonymous says

  4

Leave A Reply

Your email address will not be published.