शेती हा खरे तर आपला प्रमुख व्यवसाय आहे; परंतु ग्रामीण भागातील तरुण आज शेतीला सोडचिठ्ठी देऊ पाहत आहे. वास्तविक शेतीत मोठ्या प्रमाणावर रोजगाराची क्षमता आहे, तसेच नियोजनबद्ध व आधुनिक तंत्राचा वापर करून बाजारपेठेचा कानोसा घेऊन शेती केल्यास त्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. केवळ शारीरिक कष्ट नको म्हणून आज ग्रामीण भागातील तरुण शहराकडे धाव घेत आहेत. विशेषत: शहराजवळच्या भागातील लोकांनी शेती न विकता त्यावर जर भाजीपाला, फुले, धान्य, पिके घेतली तर त्यांना मोठा आर्थिक नफा मिळू शकतो. शिवाय त्यांची जमीन त्यांच्याकडे राहते. तरुणांचा शहराकडील जाणारा लोंढा थांबतो तो वेगळाच.
निसर्गाच्या अवकृपेने अथवा इतर कोणत्याही कारणाने (जसे- पिकांवरील रोग, शेतीचा वन्य प्राण्यांद्वारे विध्वंस) कोरडवाहू अथवा सिंचनाचे अंतर्गत असणाऱ्या शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची हमी नसल्यामुळे, शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचे साधन म्हणून,करणे शक्य असणाऱ्या व्यवसायांना शेतीपूरक व्यवसाय असे म्हणतात. या अशा व्यवसायांद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधरविण्यास मदत होते.
- शेतीपूरक परंपरागत व्यवसाय :
दुग्ध व्यवसाय
शेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय हा पूर्वीपासूनच परंपरागत चालत आलेला महत्वाचा व्यवसाय आहे. दुग्ध व्यवसायासाठी प्रामुख्याने संकरीत गाई गावठी दुधाळ गाई आणि दुधाळ म्हशी पाळल्या जातात. प्रचलित पद्धतीने दुग्ध व्यवसाय करण्यापेक्षा आधुनिक तंत्राने व्यापारीदृष्ट्या हा व्यवसाय केला असता निश्चितपणे शाश्वत धंदा असून, आर्थिकदृष्ट्या चांगला परवडतो.
आहारदृष्ट्या प्रत्येकाला प्रतिदिनी ३०० मि.ली. दुधाची गरज भासते. वाढत्या लोकसंख्येला दुधाचं उत्पादन वाढणं फारच गरजेचं आहे. आपल्याकडे गाईपासून ४५% तर म्हशीकडून ५२% दुध मिळते. पण यात सध्या तरी उलटे चित्र दिसू लागले आहे. दुधामध्ये पाणी, कर्बोदक, स्निग्धांश, क्षार, जीवनसत्व, भरपूर प्रमाणात असल्यानं दुध हे पूर्णान्न आहे. गाईच्या १ लिटर दुधातून ६०० किलो कॅलरीज, तर म्हशींच्या १ लिटर दुधापासून १००० किलो कॅलरीज मिळतात. दुधापासून अनेकविध पदार्थ तयार करता येतात. अशा या फायदेशीर धंद्यासाठी काही आवश्यक बाबी असाव्या लागतात.
कुक्कुट पालन
कोंबडी पालनाचा व्यवसाय सुद्धा कोंबड्या मोकळ्या सोडून किंवा पिंजर्यात बंद करून अशा दोन्ही पद्धतीने करता येतो. मोकळ्या कोंबड्या साधारणपणे देशी वाणाच्या, गावरान असतात. त्या मोकळ्या सोडल्यामुळे मांजरासारखे प्राणी किंवा घार, गिधाड असे पक्षी यापासून त्यांना धोका असतो. परंतु गावरान कोंबड्यांमध्ये त्यांच्यापासून स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता असते. त्यामुळे गावरान कोंबड्या मोकाट सोडल्या तरी चालतात. घरच्या परसामध्ये किंवा अंगणात, घराच्या आसपास अशा दहा-वीस कोंबड्या पाळल्या की, त्या स्वत:चे अन्न स्वत: शोधून खातात. दहा माद्यांमागे एखादा कोंबडा असला की, कोंबडींना पिलेही होतात आणि त्यांची पैदास वाढत राहते. कोंबडी पालनामध्ये व्हाईट लेगहार्न किंवा अन्य काही नवनव्या जातींच्या कोंबड्या मात्र मोकाटपणे पाळता येत नाहीत. त्यांच्यासाठी पिंजरा तयार करावा लागतो. कारण या कोंबड्यांमध्ये स्वत:चे संरक्षण करण्याची क्षमता नसते. जर्सी गायींप्रमाणेच या सुधारित जातीच्या कोंबड्या प्रकृतीने नाजूक मात्र जास्त अंडी देणार्या असतात. त्यांची काळजी घ्यावी लागते, वेळेवर औषधपाणी करावे लागते. पण एवढी काळजी घेतली की, त्या भरपूर अंडी देतात.
शेळी पालन
शेळी पालन करण्याचे तीन प्रकार आहेत. परंपरागत पद्धत, अर्धबंदिस्त पद्धत आणि बंदिस्त पद्धत. परंपरागत पद्धतीत शेळ्यांना चरण्यास मोकळे सोडले जाते. त्यांच्यामागे एखादा गुराखी असतो आणि तो दिवसभर त्यांना लोकांच्या बांधांना, कुपाट्यांना आणि कुरणांमध्ये चारून संध्याकाळी घरी आणतो. मग दुसर्या दिवशी सकाळी चरायला सोडेपर्यंत त्यांना काही खाऊ घालण्याची गरज पडत नाही. अशाच पद्धतीने आपल्या राज्यात शेळ्या मोठ्या प्रमाणावर पाळल्या जात आहेत. परंतु या पद्धतीत काही ङ्गायदे आहेत आणि काही दोषही आहेत. ङ्गायदा असा की, या पद्धतीत चारा-पाण्यावर काही खर्च होत नाही. त्यामुळे नफ्या-तोट्याचा काही प्रश्नच नसतो. मात्र या पद्धतीने ङ्गार मोठ्या प्रमाणावर शेळ्या पाळता येत नाहीत. एखाद्या सुशिक्षित शेतकर्याला शेळी पालनाचा उद्योग ङ्गार मोठ्या प्रमाणावर करून तीन-चारशे शेळ्या पाळायच्या असतील तर त्याला ही मोकाट पद्धत काही उपयोगाची नाही. त्यामुळे बंदिस्त शेळीपालन ही पद्धत आता पुढे आली आहे. जसे आपण कोंबड्या पाळतो आणि त्यांना एका पिंजर्यामध्ये कायम कोंडून ठेवून तिथे त्यांना चारा-पाणी देतो. तशाच पद्धतीने काही विशिष्ट प्रकारचा गोठा तयार करून त्यात शेळ्या कायमच्या ठाणबंद ठेवल्या जातात.
- शेती पुरक इतर व्यवसाय
परसबाग
या भागात परसबागेचे महत्व, जागेची निवड तसेच कोणत्या मोसमात कोणत्या भाज्या लावाव्यात यासंबधी माहिती दिली आहे.
ऑईस्टर मशरूमचे उत्पादन
या भागात ऑईस्टर मशरूमच्या उत्पादनाविषयी माहिती दिली आहे. जसे हंगाम, त्याचे बिजन कसे करावे, जागा, इ. विषयी माहिती दिली आहे.
सुक्या/वाळलेल्या फुलांचे उत्पादन
या भागात सुक्या वाळलेल्या फुलांचे उत्पादन कसे करावे, त्याचे काय फायदे आहेत तसेच ते कश्या पद्धतीने करावे यासंबधी माहिती दिली आहे.
मधमाशी पालन
मधमाशी पालनाचे फायदे, आणि उत्पादन प्रक्रियेतील विविध घटक तसेच मधमाशांच्या प्रजाती यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.
मधमाशी ग्रीक बास्केट पोळे
या विभागात मधासाठी ग्रीक बास्केट पोळे कसे तयार करावे / त्याही बांधणी कसी असावी यासंबधी माहिती दिली आहे.
बोरांपासून कँडी बनवणे
या विभागात शेती पूरक व्यवसायांतर्गत बोरांपासून गोळ्या / कँडी कशी बनवावी यासंबधी माहिती दिली आहे.
तुती उगविण्याची नवीन पध्दत
रेशीम कीटक-संगोपनात, रेझ्ड किंवा फ्लॅट बेड पध्दतीचा वापर करून तुतीच्या बालवृक्षाचे व्यावसायिक उत्पादन करण्यासंबधीची माहिती यामध्ये दिली आहे.
रेशीम कीटक पालन : जोपासना
रेशीम किड्यांच्या संगोपनाच्या पहिल्या दोन चरणांना चौकी म्हणतात. जर चौकी किड्यांचे संगोपन नीट झाले नाही, तर नंतरच्या चरणांत पैदास नासायची शक्यता असते.
कोश उत्पादनाचे अर्थशास्त्र
या विभागात एका एकर शेतीमध्ये कोश / तुती साठी किती खर्च येतो आणि उत्पन्न किती मिळू शकते याचा ताळेबंद दिला आहे.
तुती लागवड व रेशीम कीटक
या विभागात तुतीची लागवड आणि रेशीम कीटकांचे पालन कसे करावे यासंबधी माहिती दिली आहे.
शेती, हवामान, शासनाच्या विविध योजना, जोडधंदे, शेती उत्पादने इत्यादींचीमाहिती Whats app वर विनामुल्य मिळवण्याकरीता कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा.
https://whatsapp.heeraagro.com
मंत्र आधुनिक शेतीचा ! मित्र आधुनिक शेतकऱ्यांचा !!
सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी krushisamrat1@gmail.com या ई-मेल आयडी वर किंवा 8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल.