• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 3, 2021
  • Login
Krushi Samrat
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी
No Result
View All Result
Krushi Samrat
No Result
View All Result
Home शेती

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

Team Krushi Samrat by Team Krushi Samrat
October 22, 2020
in शेती
0
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी
Share on FacebookShare on WhatsApp

बदलत्या जागतिक परिस्थितीत राज्यातील शेती शाश्वत व शेतकरी संपन्न होण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. येणारा खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात आल्याचे सांगताना शेतकरी बांधवांनी आता पारंपरिकतेच्या जोखडातनू बाहेर येत उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन कापूस – सोयाबीन- धान आदी पिकांची फेरपालट करून मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवडी सह फायदेशीर शेती करावी असे आवाहन कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी केले.

एकात्मिक उद्यान पिके विकास अभियाना अंतर्गत उद्यानविद्या विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला व सुपारी तथा मसाला पिके संचालनालय, कालीकत, केरळ (केंद्रीय कृषि तथा शेतकरी विकास मंत्रालय, भारत सरकार) यांचे संयुक्त विद्यमाने कृषी महाविद्यालय अकोलाच्या समिती सभागृहात आयोजित “शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पती लागवड : अद्यावत उत्पादन तंत्रज्ञान” या अतिशय महत्वाचे विषयावरील दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे उद्घाटन प्रसंगी डॉ. भाले बोलत होते.

कृषि विद्यापीठाने संशोधनाच्या दिशा बदलल्या असनू शेतकऱ्यांच्या शेतावर आता प्रयोग करण्यात येत असनू त्यांचा फायदा कमी कालावधीत नवीन पिक वान आणि तंत्रज्ञान संशोधनासाठी होणार असल्याचे सागंतांना डॉ. भाले यांनी खारपाणट्ट्यात ज्वारीचे सह ओवा, सोप, जिरे आदी पिक चांगले येत असनू विदर्भातील शेतकरी आमच्या कृषी विज्ञान केंद्रांच्या सहकार्याने ओवा, जिरे, सोप, अद्रक, हळद मोठ्या प्रमाणात घेत आहेत तथा दुध व दुग्धपदार्थ निर्मिती तंत्रज्ञान आता महिंलानी आत्मसात केले असनू शेती पूरक व्यवसायांची मोठ बांधत फायद्याची शेती दृष्टीपथात आली असल्याचे त्यांनी सभागृहाला सांगितले.

शेतकरी कष्टाळू असनू त्यांना फक्त योग्य दिशादर्शन आवश्यक असल्याचे नमदू करताना डॉ. भाले यांनी करडई सारखी पिके आता पुन्हा घेणे आवश्यक असल्याचे सांगत गाव पातळीवर छोटे छोटे तेल काढणी यंत्र उभे करून पिक बदलासह कौशल्यविकास व मुल्यवर्धन आणि उपउत्पादने घेत ग्रामोद्धार साधता येईल व याकरिता शेतकऱ्यांची पंढरी असलेल्या कृषि विद्यापीठाला वेळोवेळी भेटी देत शंका समाधाना सह नव तंत्रज्ञान स्वीकारावे असेही प्रतिपादन त्यांनी केले व गुजरात, राजस्थान यांचे बरोबरीने मसाला पिकाखलील क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहू असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

सुपारी तथा मसाला पिके संचालनालय, कालीकत, केरळचे उपसंचालक डॉ. बाबुलाल मीणा यांनी मसाला पिके संचालनालयाच्या कार्यपद्धती विषयी व राबविण्यात येत असलेल्या विविध योजनाविषयी सविस्तर माहिती देतांना कसदार जमीन व सिंचनासाठी पाणी उपलब्ध नसताना राजस्थान मसाला पिके घेण्यासाठी अग्रेसर राराहू शकतो तर जमीन व पाणी संपन्न महाराष्ट्राला या क्षेत्रात क्रांती करता येईल असा आशावाद व्यक्त केला

Tags: Farmingमसाला पिकेसुगंधी वनस्पती
Team Krushi Samrat

Team Krushi Samrat

Related Posts

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण
शेती

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे
शेती

रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे

October 16, 2020
परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास
शेती

परतीच्या पावसाने हिरावला शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास

October 16, 2020

About us

Krushi Samrat

कृषी सम्राट हा शेतकऱ्यांसाठी शेतकरी पुत्राने सुरु केलेला एक समूह आहे. आपल्या शेतकऱ्यांना जगभरातील शेतीविषयी माहिती मोफत मिळावी हाच यामागचा एक उद्देश आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अवजारे
  • आयुर्वेदिक नुस्खे
  • कायदा
  • कृषीसम्राट सल्ला
  • तंत्रज्ञान
  • प्रेरणा
  • प्रेरणादायक गोष्टी
  • बातम्या
  • यशोगाथा
  • व्हिडिओ
  • शासकीय योजना
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • हवामान
  • हिन्दी

Recent News

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

लसून लागवडीसाठी जाणून घ्या अनुकूल हवामान व विविध वाण

October 22, 2020
शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

शाश्वत शेतीसाठी मसाला पिके व सुगंधी वनस्पतीची लागवड करावी

October 22, 2020
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • होम
  • शेती
  • शेतीपुरक उद्योग
  • शासकीय योजना
  • यशोगाथा
  • कायदा
  • अवजारे
  • तंत्रज्ञान
  • हवामान
  • व्हिडिओ
  • हिन्दी

© 2020 Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In