शेतमालाला चांगला भाव तरीही शेतकर्‍यांचे रडगाणे

0

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य
परभणी :
राज्यात शेतमालाला भाव देऊनही शेतकरी भाव मिळत नाही, अशी ओरड करतात. शेतकर्‍यांची ही ओरड नेहमीचेच रडगाणे आहे, असे वादग्रस्त वक्तव्य पालकमंत्री तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी परभणीत केले. विशेष म्हणजे शेतकर्‍यांसाठी सुरू करण्यात येणार्‍या आठवडी बाजाराच्या शुभारंभ कार्यक्रमातच पाटील यांची जीभ घसरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजाराचा शुभारंभ रविवारी (दि.13) शहरातील शनिवार बाजारात पालकमंत्री तथा सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री पाटील म्हणाले, शेतमालाला चांगला भाव देण्यात येत आहे. परंतु, राज्यातील शेतकरी मात्र शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून सतत रडगाणे गातात. एकीकडे राज्यातील शेतकरी दुष्काळामध्ये होरपळत असताना शासनाकडून शेतकर्‍यांना आधार मिळणे आवश्यक असताना राज्याच्या एका जबाबदार मंत्र्याने शेतकर्‍यांविषयी असे अपशब्द वापरून एक प्रकारे शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचेच काम केले असल्याचा सूर उपस्थितांमधून उमटला.

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.