कमी खर्चात जास्त उत्पन्न घेण्याचे तंत्र शेतकर्‍यांनी जाणून घ्यावे

0
कृषी विज्ञान केंद्राच्या स्वच्छता जनजागृती पंधरवडा समापन प्रसंगी कृषी शास्त्रज्ञाचे 
शेतीत मोठा भांडवली खर्च करून उत्पन्न घेण्यापेक्षा कमी खर्चात अधिकाधिक उत्पन्न कसे घेता येईल, याचे तंत्र शेतकर्‍यांनी जाणून घेतले पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर करून अल्प खर्चात दुप्पट उत्पनाचे तंत्र शिकून घ्या असे आवाहन वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ निलेश म्हस्के यांनी केले. महात्मा गांधी मिशन कृषी विज्ञान केंद्रातर्फे दि. 16 ते 31 डिसेंबर या कालावधीत स्वच्छता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. 31 डिसेंबर रोजी याचे समापन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
भारतीय कृषी अनुसंधान केंद्र, नवी दिल्ली यांनी निर्धारित केलेल्या सूचनेनुसार हा स्वछता पंधरवडा साजरा करण्यात आला. या पंधरवड्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. दि. 16 डिसेंबर रोजी एम. जी. एम. चे सचिव अंकुशराव कदम, एम. जी. एम. हिल्सचे संचालक राजेंद्र रेड्डी यांच्या उपस्थितीत एम.जी.एम हिल्स, गांधेली प्रक्षेत्रात वृक्ष लागवडीने करण्यात आला. यानंतर दि. 17 आणि 18 डिसेंबर रोजी कार्यालयातील दस्तऐवज, स्टोअरची स्वच्छता, मोडके फर्निचरचे व्यवस्थापन करण्यात आले. कृषी विज्ञान केंद्राच्या इमारत व आजूबाजूच्या परिसराची  स्वच्छता करण्यात आली. दि. 19 ते 27 या कालावधीत कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रातील दत्तक घेतलेल्या गावात समविष्ट असलेल्या भिंदोन आणि पळसवाडी  येथे  एम. जी. एम. कृषी जैव तंत्र महाविद्यालयाच्या रा. स. यो. स्वयंसेवकांच्या मदतीने गावातील सार्वजनिक मंदिर परिसर, प्राथमिक शाळा, सांडपाणी नाल्या तसेच स्वच्छता जनजागृती विषयक पथनाट्य सादर करण्यात आले. गावकर्‍यांच्या मदतीने जमलेल्या कचर्‍यावर प्रक्रिया करण्याचे प्रात्यक्षिक आणि चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली. यासोबतच राष्ट्रीय कृषी दिवसाच्या निमित्ताने एमजीएमच्या रुख्मिणी हॉल येथे कृषी मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी माजी मंत्री आणि एम. जी. एम. चे अध्यक्ष कमलकिशोर कदम, राष्ट्रीय सामाजिक कार्यकर्त्या मेघा पाटकर, प्रा. देसरडा यांनी यावेळी शेतकर्‍यांशी संवाद साधला.
स्वच्छता उपक्रमात पुढे क्लीन इंडिया संघटनेच्या सहकार्याने मनपा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला भेट देत प्रक्रिया समजावून घेतली. दि. 30 डिसेंबर रोजी पळसवाडी येथे पंचायत समिती सदस्य युवराज डेंगळे यांच्या उपस्तिथितीत सभागृह आणि स्मशान परिसराची स्वच्छता करत पंधरवड्याची कार्यपूर्ती करण्यात आली.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ निलेश मस्के आणि विषय विशेषज्ञ काकासाहेब शुकसे यांनी अधिक माहिती दिली. कृषी विज्ञान केंद्रातर्फे चालवण्यात आलेल्या रेशीम, मोसंबी पिकाच्या निकोप वाढीसाठी रंगपूर लाईम या नव्या वाणाबद्दल, कलकत्ता पानमळा मुक्त शेळीपालन, मुक्त कुक्कुटपालन,  हायड्रोपोनिक्स चारा, संस्थतर्फे चालवण्यात येणार्‍या पशुवैद्यकीय रुग्णवाहिकेबद्दल त्यांनी माहिती दिली. पंधरवडा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम एम. जी. एम. चे सचिव अंकुशराव कदम  यांच्या मार्गदर्शनाखाली एमजीएम हिल्सचे संचालक राजेंद्र रेड्डी, संशोधन प्रमुख आणि वरिष्ठ संशोधक एन.एम.मस्के, कार्यक्रम समन्वयक काकासाहेब शुकासे, पीक संरक्षणचे टी.बी. चव्हाण, व्ही. डी. देशमुख, माती परीक्षक एस. एस. वाघ, गृहविज्ञानच्या वैशाली देशमुख, प्रक्षेत्र व्यवस्थापक बालाजी भोसले, लॅब असिस्टंट दीप पाटील, संगण्क सहायक आनंद कदम, लेखापाल विक्रम कदम, विनायक कदम आदींनी परिश्रम घेतले.

 

सदर सत्रासाठी आपण ही आपल्या कडील माहिती / लेख इतर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी [email protected] या ई-मेल आयडी वर किंवा   8888122799 या नंबरवर पाठवू शकतात. आपण सादर केलेला लेख / माहिती आपले नाव व पत्त्यासह प्रकाशित केली जाईल

Leave A Reply

Your email address will not be published.