रब्बी हंगामात ‘मोहरी’चे पीक फायद्याचे

0

रब्बी हंगामात मोहरी हे गहू, हरभरा आणि जवस या पिकांमध्ये आंतर किंवा मिश्र पीक म्हणून घेण्यात येते. मोहरी हे तेलबियातील महत्त्वाचे असून कमी पाण्यामध्ये, कमी खर्चात चांगले उत्पादन मिळते. पिकाच्या उत्पादनामध्ये मोहरी या पिकाचा जगात व भारतात दुसरा क्रमांक लागतो.

खरीप हंगामामध्ये झालेल्या पावसाचा खरीप पिकांसोबत रब्बी पिकांनाही फायदा मिळतो. रब्बी हंगामात मोहरीची वेळेवर पेरणी केल्यास जमिनीतील ओलाव्याचा फायदा घेता येईल. हे तेलबियातील महत्त्वाचे, कमी खर्चाचे पीक आहे. आजही या पिकाच्या एकूण क्षेत्रामध्ये प्रामुख्याने राजस्थान, मध्य प्रदेश, उतर प्रदेश, हरियाना, पश्चिम बंगाल, आसाम आणि गुजरात या सात राज्यांचा एकूण ९०% वाटा आहे. मात्र, अलीकडे बहुतांश भारतामध्ये हे पीक घेतले जाते.

शेतीविषयक अपडेट्स व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

या पिकाची योग्य वेळी पेरणी केली तर कीड आणि रोगांचा कमी प्रादुर्भाव होतो. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांनी प्रती हेक्टरी १२ क्विंटल उत्पादन देण्याची क्षमता असलेले टी. ए. एम. १०८-१ हे वाण विकसित केले आहे. महाराष्ट्रात खरीप हंगामातील सोयाबीन पिकानंतर रब्बीमध्ये मोहरी पिकाची लागवड करता येईल. मोहरी पीक मध्यम खोल जमीन किंवा खारवट जमिनीत घेऊ शकतो. मोहरी हे परंपरागत गहू, हरभरा पिकाच्या तुलनेत खर्च व नफा या दृष्टीने चांगले पर्यायी पीक ठरू शकते.

मोहरीच्या बियांमध्ये ३२ ते ४० % तेलाचे प्रमाण असते. उत्तर भारत आणि पश्चिम बंगाल येथे मोहरीचे तेलाचा वापर अधिक आहे. त्या तुलनेत महाराष्ट्रातील स्वयंपाकात त्याचा फारसा वापर होत नाही. मोहरी बुरशीविरोधक असल्याने लोणची टिकवण्याकरिता व चवीसाठी लोणच्यामध्ये मोहरीची पूड घातली जाते. मोहरीच्या कोवळ्या हिरव्या पानाची भाजी आरोग्याला उत्तम असते. त्यात मुबलक प्रमाणात मॅग्नेशिअम तसेच ‘अ’ आणि ‘क’ ही आवश्यक जीवनसत्वे असतात.

शेतीविषयक अपडेट्स व्हाट्सअँपवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.