माजलगाव / प्रतिनिधी
शिवसेनेच्यावतीने मराठवाडा संपर्क नेते खासदार चंद्रकांत खैरे, बीड जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर मोरे, जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी दुष्काळग्रस्तांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक जानेवारी मंगळवारपासून तालुक्यातील ग्रामीण भागात दुष्काळ दौरा सुरू केला आहे. अन्याय करणार्या पेक्षा, अन्याय सहन करणारा दोषी असे सांगत शेतकर्यांनो अन्याय सहन करू नका असे अवाहन दौर्या दरम्यान सरवर पिंपळगाव येथे शुक्रवार रोजी बैठकी प्रसंगी बोलताना केले.
तालुक्यातील सरवर पिंपळगाव येथे मुक्काम करून सोमठाणा, आडोळा, गंगामसला, छोटेवाडी गावात जाऊन शेतशिवाराची पहाणी करून येथील ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. यामध्ये गावातील हातपंप बंद, वीजपुरवठा खंडित, पाण्याअभावी ऊस वाळत आहे माञ तिन्ही कारखाने कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करायचे सोडुन कार्यक्षेत्राबाहेरील ऊस गाळपास प्राधान्य देत असल्याचे यावेळी बोलताना शेतकर्यांनी सांगितले. राजकीय प्रस्थापितांचे वर्चस्व कारखान्यावर असल्यामुळे ते मनमानी करत आहेत, हा अन्याय सहन करू नका असे अवाहन त्यांनी केले. तसेच गावातील हातपंप तात्काळ दुरूस्ती तसेच वीज पुरवठा लवकरात लवकर सुरूळीत करण्याचे आश्वासन तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी दिले.